AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यातील विद्यार्थिनीला दिवस-रात्र शोधलं; 14 तासानंतर लिफ्टमध्ये सापडली; तपासानंतर कॉलेजचा धक्कादायक कारभार उघड

पुण्यातील विद्यार्थिनीसोबत धक्कादायक प्रकार घडला. तरुणीला दिवस-रात्र शोधलं. त्यानंतरही तरुणी सापडली नव्हती. नंतर 14 तासानंतर ही तरुणी लिफ्टमध्ये सापडली.

पुण्यातील विद्यार्थिनीला दिवस-रात्र शोधलं; 14 तासानंतर लिफ्टमध्ये सापडली; तपासानंतर कॉलेजचा धक्कादायक कारभार उघड
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 21, 2026 | 2:35 PM
Share

विद्येचं माहेरघर मानल्या जाणाऱ्या पुण्यातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील एका नामांकित कॉलेजमध्ये शिक्षण घेणारी 19 वर्षीय विद्यार्थिनी तब्बल १४ तास लिफ्टमध्ये अडकल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अन्न-पाण्याविना ही तरुणी 14 तास लिफ्टमध्ये अडकली होती. रात्रभर शोधाशोध केल्यानंतरही विद्यापीठ प्रशासन आणि तिच्या कुटुंबीयांना देखील विद्यार्थिनी लिफ्टमध्ये अडकल्याचे माहीत नव्हते. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित विद्यार्थिनी बुधवारी दुपारी 3.30 वाजता लेक्चर संपल्यानंतर लिफ्टने निघाली. या लिफ्टमध्ये तरुणी एकटीच होती. या लिफ्टचा अचानक वीजपुरवठा खंडीत झाला. त्यानंतर ही लिफ्ट पाचव्या आणि सहाव्या मजल्यावर बंद पडली. त्यामुळे तरुणी लिफ्टमध्येच अडकून पडली. लिफ्टमधून बाहेर येण्यासाठी तरुणीने जोरजोरात आवाज दिला. परंतु कोणीही मदतीला आलं नाही. कॉलेमधील या प्रकाराने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झालाय. लिफ्ट अडकल्यानंतर लिफ्टमधून बाहेर पडण्याचा इतर पर्याय नव्हता, ही गंभीर बाब चर्चेत आली.

विद्यार्थिनी संपर्काच्या बाहेर गेल्यानंतर कुटुंबातील सदस्य चिंतेत सापडले. कुटुंबीयांनी एकच शोधाशोध करण्यास सुरुवात केली. नातेवाईकांना विचारणा केली. त्यानंतरही तरुणीचा ठावठिकाणा लागला नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी पोलीस स्टेशनला धाव घेतली. यानंतर कॉलेजचे प्रशासकीय कर्मचारी, पोलीस आणि कुटुंबीयांनी रात्रभर शोधाशोध केली. कॉलेजच्या परिसरात  तिचा शोध सुरू होता. त्यात परिसरातील एका लिफ्टमध्ये ही तरुणी आढळून आली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळी इमारतीची लिफ्ट सुरू झाली. त्यानंतर या तरुणीची  सुटका झाली. अन्न पाण्याशिवाय 14 तास लिफ्टमध्ये अडकल्याने तरुणी घाबरली होती.

दरम्यान, आता या घटनेनंतर कॉलेजची सुरक्षा व्यवस्था, लिफ्टची देखभालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करम्यात येत आहे. कॉलेजची आपत्कालीन यंत्रणा देखील कार्यक्षम नसल्याचे समोर आलं आहे. लिफ्टमध्ये विद्यार्थिनीला मदत मिळण्यासाठी कोणतीही यंत्रणा कार्यान्वित का झाली नाही, अस सवाल उपस्थित करण्यात येत आहे. या प्रकरणाची आता कॉलेज प्रशासनाने दखल घेतली आहे. आता या प्रकरणी एक चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. आता समितीकडून घडलेल्या प्रकरणाची तांत्रिक चौकशीसह इतर बाबी समितीकडून तपासल्या जातील. लिफ्टचा जवळपास 5-6 तास वीजपुरवठा खंडीत होता. आता या घटनेनंतर पोलिसांच्या संपर्कात आहे. या प्रकरणी कोणीही दोषी असेल, त्याच्यावर कारवाई केली जाईल, असं कॉलेजच्या अधिकाऱ्याने म्हटलं आहे.

Follow Us
चंद्रभागेच्या वाळवंटात विठ्ठल भक्तांची मांदियाळी; दुष्काळमुक्त....
Kartiki Ekadashi : चंद्रभागेच्या वाळवंटात विठ्ठल भक्तांची मांदियाळी; दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी वारकऱ्यांची प्रार्थना
कष्टाने टोमॅटोची लागवड केली, पण पाण्याअभावी स्वप्नांवर पाणी; बीडमधील..
Beed Farmer Issue : कष्टाने टोमॅटोची लागवड केली, पण पाण्याअभावी स्वप्नांवर पाणी; बीडमधील शेतकरी संकटात
लातूरच्या पाणीप्रश्नावरून अमित देशमुख विरुद्ध नवनाथ बन; रेल्वेने पाणी
Latur Water Issue : लातूरच्या पाणीप्रश्नावरून अमित देशमुख विरुद्ध नवनाथ बन; रेल्वेने पाणी आणण्याच्या मुद्द्यावरून जुंपली
छगन भुजबळ आणि अमोल कोल्हे एकाच मंचावर; ओतूरच्या अधिवेशनात राजकीय चर्चा
Chhagan Bhujbal-Amol Kolhe : छगन भुजबळ आणि अमोल कोल्हे एकाच मंचावर; ओतूरच्या अधिवेशनात राजकीय चर्चांना उधाण
रोहित पवारांचा सुद्धा त्याच VSR कंपनीच्या विमानातून प्रवास, भाजपचा...
रोहित पवारांचा सुद्धा त्याच VSR कंपनीच्या विमानातून प्रवास, पत्रकार परिषद घेऊन भाजपचा मोठा दावा
नाशिकमधील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून संजय राऊतांचा भाजपला टोला...
नाशिकमधील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून संजय राऊतांचा भाजपला टोला; PM मोदींबाबतही मोठा दावा!
नीट पेपरफुटी प्रकरणाला निर्णायक वळण! आज 14 आरोपींवर आरोप निश्चिती...
नीट पेपरफुटी प्रकरणाला निर्णायक वळण! आज 14 आरोपींवर आरोप निश्चिती, दिल्ली कोर्टात महत्त्वाची सुनावणी
रायगडच्या राजकारणात ठिणगी! महेंद्र दळवींचा सुनील तटकरेंना थेट इशारा...
रायगडच्या राजकारणात वादा ठिणगी! महेंद्र दळवींचा सुनील तटकरेंना थेट इशारा, म्हणाले 'उलटी गिनती सुरू'
गोशाळांना मोठा दिलासा! जमीन खरेदी-विक्रीचे नियम बदलले, शासनाचा...
गोशाळांना मोठा दिलासा! जमीन खरेदी-विक्रीचे नियम बदलले, शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुण्यात ठाकरे सेनेच्या नेत्या रेखा कोंडे यांच्यावर हल्ला; जरांगे...
Pune : पुण्यात ठाकरे सेनेच्या नेत्या रेखा कोंडे यांच्यावर हल्ला; मनोज जरांगेंवर गंभीर आरोप!