पुण्यात पूर्ण संचारबंदी नाही, पण बंधनं लागू, आवश्यक गोष्टी आणून ठेवा : म्हैसेकर

"नागरिकांनी पॅनिक होऊ नका. आठवड्याच्या आवश्यक गोष्टी घरात आणून ठेवा. दुकानांमध्ये गर्दी करु नका", असा सल्ला पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर (Deepak Mhaisekar press conference) यांनी पुणेकरांना दिला आहे.

पुण्यात पूर्ण संचारबंदी नाही, पण बंधनं लागू, आवश्यक गोष्टी आणून ठेवा : म्हैसेकर
पुण्यातील एकूण 17 जण नायडू रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यापैकी 5 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहेत, त्यांच्या संपर्कातील 43 जणांवर आरोग्य विभागाचं लक्ष आहे, अशी माहिती पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी दिली.

पुणे : “नागरिकांनी पॅनिक होऊ नका. आठवड्याच्या आवश्यक गोष्टी घरात आणून ठेवा. दुकानांमध्ये गर्दी करु नका”, असा सल्ला पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर (Deepak Mhaisekar press conference) यांनी पुणेकरांना दिला आहे. आज (16 मार्च) झालेल्या पत्रकार परिषदेत दीपक म्हैसेकर यांनी अनेक गोष्टी सांगितल्या. पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या 16 वर पोहोचली आहे. हा आजार पसरू नये यासाठी प्रशासनाकडून अनेक प्रयत्न केले (Deepak Mhaisekar press conference) जात आहेत.

दीपक म्हैसेकर पत्रकार परिषदेत म्हणाले, “नागरिकांनी पॅनिक होऊ नये. आठवड्याच्या आवश्यक गोष्टी घरात आणून ठेवा. दुकानांमध्ये गर्दी करु नका. हे नियम दुकानदारांना सुद्धा लागू आहेत, विनाकारण दुकानात गर्दी करु नका. पुणेकर सुज्ञ आहेत ते प्रतिसाद देतील. एन 95 हा फक्त रुग्ण, डॉक्टर, नर्स यांच्यासाठी मास्क आहे.”

“144 लावणार आहे पण त्यात संचार बंदी नसणार, तर यात काही बंधन असतील. या बंधनांचे जो कुणी उल्लंघन करेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल. पिंपरी चिंचवडमध्ये 144 लागू करण्यात आलं आहे. पूर्ण संचारबंदी नसली तरी काही बंधन घातली आहेत,” असं म्हसैकर यांनी सांगितले.

“पुणे शहरात एकूण 16 रुग्ण झाले. 27 जण निगेटिव्ह आहेत. रात्री विमानाने आलेल्या 99 पैकी 7 जणांनी स्वतः त्रास होत असल्याचं सांगितलं आहे. त्यांना नायडूमध्ये पाठवलं आहे. तिथल्या डॉक्टरांना आवश्यकता वाटत असेल तर त्यांचे नमुने घेतले जातील आणि ते एनआयव्हीकडे पाठवले जातील. गेल्या 24 तासात नव्याने फक्त 1 पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे”, असंही म्हैसेकर यांनी सांगितले.

म्हैसेकर म्हणाले, “उद्योगांनी आपल्या कामगारांना परदेशी पाठवू नये. उद्योगांचे उत्पादन थांबेल असा कोणताही निर्णय घेतलेला नाही. आज सकाळी उद्योजकांसोबत बैठक घेतली. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्या उद्योगांनी वर्क फ्रॉम होम करावं, अश्या सूचना दिल्यात. अन्यथा त्यांना होम कोरेन्टाईन करायला सांगितलं जाईल.”

आपत्ती निवारण निधीमधून सर्व जिल्ह्यांना निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. आज संध्याकाळपर्यंत याचा आदेश अपेक्षित आहे. पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या 125 टीम सर्व्हे करत आहेत. यातून पुणे आणि आवश्यकता वाटल्यास इतर चार जिल्ह्यांना हा निधी दिला जाईल. आतापर्यंत 15803 घरांमध्ये सर्व्हे पूर्ण केला आहे, असं म्हैसेकर यांनी सांगितले.

Published On - 5:15 pm, Mon, 16 March 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI