पुण्यात म्युकरमायकोसिसचा विळखा, कोरोनामुक्त नागरिकांचं 1 जूनपासून डोअर टू डोअर सर्वेक्षण

पुण्यात 1 जूनपासून कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांचं डोअर टू डोअर जाऊन सर्वेक्षण केलं जाणार आहे. तशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आलीय.

पुण्यात म्युकरमायकोसिसचा विळखा, कोरोनामुक्त नागरिकांचं 1 जूनपासून डोअर टू डोअर सर्वेक्षण
Mucormycosis door to door survey in pune
Follow us
| Updated on: May 26, 2021 | 3:26 PM

पुणे : कोरोनासह आता म्युकरमायकोसीसचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं पुणे महापालिकेनं एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. पुण्यात 1 जूनपासून कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांचं डोअर टू डोअर जाऊन सर्वेक्षण केलं जाणार आहे. तशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आलीय. महापालिकेनं कमला नेहरू रुग्णालयात ओपीडी सेंटर तयार केलं आहे. सर्वेक्षणादरम्यान कुणी म्युकरमायकोसिसची लागण झालेल्या रुग्ण आढळल्यास त्याच्यावर दळवी रुग्णालयात उपचार केले जाणार आहे. त्यासाठी दळवी रुग्णालयात स्वतंत्र वॉर्डही तयार करण्यात आला आहे. महापालिकेचे अतिरुक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी ही माहिती दिलीय. (Door-to-door survey in Pune from June 1 against the backdrop of mucormycosis)

पुण्यात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांमध्ये वाढ दिसून येत आहे. अशावेळी काळ्या बुरशीचा धोका टाळण्यासाठी महापालिका अलर्ट मोडवर आहे. त्याचाच भाग म्हणून 1 जूनपासून संपूर्ण शहरात सर्वेक्षण केलं जाणार आहे. महत्वाची बाब म्हणजे म्युकरमायकोसिसवर उपचार घेणाऱ्या रुग्णांना शहरी गरीब योजनेअंतर्गत उपचारासाठी 3 लाख रुपये आर्थिक मदत मिळणार आहे. तशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी यापूर्वीच दिली आहे.

53 हॉस्पिटलमध्ये 591 रुग्ण सध्या उपचार सुरु

म्युकरमायकोसिसचे बाहेरील जिल्ह्यातील 19 रुग्ण सध्या पुण्यात उपचार घेत आहेत, अशी माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली. जिल्ह्यातील 53 हॉस्पिटलमध्ये 591 रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. गेल्या पाच दिवसात जिल्ह्यात म्युकरमायकोसिससाठी 2860 इंजेक्शनचे वाटप करण्यात आले आहेत. तर जिल्ह्यातील 207 रुग्णांनी आतापर्यंत महात्मा फुले योजनेचा लाभ घेतलाय, असंही त्यांनी सांगितलं.

खासगी रुग्णालयातील लसीकरणाचे दर निश्चित करा

पुणे शहरातील काही खासगी रूग्णालयांमार्फत सध्या कोरोना लसीकरण सुरु आहे. या ठिकाणी वेगवेगळे दर आकारले जात आहेत. शिवाय हे दर 1 हजार 200 रुपयांपर्यंत आकारले जात आहेत. याबाबतच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे खासगी रुग्णालयाकडून होणाऱ्या लसीकरणासाठी समान दर आकारले जावे, अशी मागणी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

पुणे शहरात कोरोना आजाराचा पहिला रुग्ण आढळल्यापासून आज अखेर शासनाकडून येणार्‍या प्रत्येक नियमांचे पालन करून रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यात यश आले आहे. आजच्या स्थितीला शहरात पहिला आणि दुसरा डोस मिळून 10 लाख नागरिकांचे लसीकरण केलं आहे. मात्र महिनाभरात अनेक वेळा शासनाकडून पुणे शहराला लस उपलब्ध न झाल्यानं, अनेक वेळा लसीकरण बंद ठेवावं लागलं. यामुळे नागरिकांच्या रोषाला महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधीना सामोरं जावं लागल्याचं मुरलीधर मोहोळ म्हणाले.

संबंधित बातम्या :

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात आर्थिक दुर्बल व्यक्तींसाठी मोफत लसीकरण, लतादीदींकडून कौतुक

मस्तच! पुणे सावरलं, कोरोना रिकव्हरी रेट 96 टक्क्यावर; ‘ही’ त्रिसूत्री ठरली वरदान!

Door-to-door survey in Pune from June 1 against the backdrop of mucormycosis

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.