AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

असली घाण नकोच… अखेर भीमराव कांबळेला फाशी; नरसापूर प्रकरणात कोर्टाचा मोठा निर्णय

Narsapur case Accused Bhimrao Kamble : पुण्यातील नसरापूर प्रकरणात कोर्टाने अखेर निकाल दिला आहे. चिमुकलीला न्याय मिळाला. नसरापूर प्रकरणाने देशभरात खळबळ उडाली होती. अखेर कोर्टाने निकाल दिला.

असली घाण नकोच... अखेर भीमराव कांबळेला फाशी; नरसापूर प्रकरणात कोर्टाचा मोठा निर्णय
Narsapur case Accused Bhimrao Kamble
| Updated on: Jun 29, 2026 | 12:27 PM
Share

Narsapur case Accused Bhimrao Kamble: पुण्यातील भोर तालुक्यामधील नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली होती. आरोपी भीमराव कांबळे याने चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केली. पुणे विशेष न्यायालयाने आरोपी भीमराव कांबळे याला दोषी ठरवले आहे. 1 मे 2026 रोजी आरोपीने हा क्रूर गुन्हा केला होता. याचे सीसीटीव्ही फुटेज देखील पुढे आले. ज्यात आरोपी भीमराव कांबळे हा चिमुकलीला हाताल धरून घेऊन जाताना स्पष्ट दिसले. आरोपीने आपला गुन्हा देखील मान्य केला. त्याच्या कुटुंबियांनी देखील त्याला कडक शासन व्हावे, अशी मागणी केली. आरोपीने खाऊ देण्याच्या बहाण्याने तिच्यावर अत्याचार केला होता. चिमुकलीचा शेणाच्या ढिगाऱ्यात मृतदेह लपवला होता. सीसीटीव्ही आधारे आरोपी भीमराव कांबळे याला पकडण्यात आले होते. कोर्टाने मागच्या सुनावणीत भीमराव कांबळे याला दोषी ठरवले. मात्र, त्याचा निकाल 29 जून रोजी राखीव ठेवला. अखेर या प्रकरणातील निकाल पुढे आला.

कोर्टाने आरोपी भीमराव कांबळे याला कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. दोन्ही बाजूचा निकाल कोर्टाने ऐकून घेतला, असल्याचे न्यायालयाने म्हटले. यादरम्यान न्यायाधीशांनी घटनांचा दाखला दिला. घटना किती जास्त क्रूर आहे, हे समजून घ्यावे, लागेल असे न्यायाधिशांनी सुनावणीदरम्यान म्हटले. यादरम्यान कोर्टाबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त बघायला मिळत आहे.

आरोपी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी चिमुकलीच्या कुटुंबियांनी केली होती. कोर्टात चिमुकलीचे आई वडील उपस्थित होते. आरोपी भीमराव कांबळे याला मृत्यूदंड की, जन्मठेप सुनावणार यावरून गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती, अखेर कोर्टाने नुकताच याबाबत निकाल दिला आहे. आरोपीने आपला गुन्हा देखील मान्य केला.

दोन्ही बाजूंचे निकाल ऐकून घेतल्यानंतर कोर्ट शिक्षेपर्यंत पोहोचत असल्याचे न्यायाधिशांनी म्हटले. या प्रकरणानंतर राज्यभरात मोर्चे निघाले, आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी केली जात होती. कुटुंबियांनीही आक्रमक भूमिका घेतली होती. राज्यातील अनेक बडे नेते चिमुकलीच्या कुटुंबियांच्या भेटीला पोहोचले होते. केसच्या सुनावणीदरम्यान कोर्टाकडून अनेक केसचे दाखले देण्यात आली. अनेक प्रकरणांमध्ये आरोपींना फाशीचा शिक्षा झाल्याचे कोर्टाने नमूद केले. आरोपी विरोधात सबळ पुरावे असल्याचे कोर्टाने नमूद केले. शेवटी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा कोर्टाने सुनावली.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा