AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात पुन्हा कोव्हिड सेंटर सुरु, 50 टक्के खासगी बेड राखीव, कोरोना थोपवण्यासाठी प्रशासनाने हात आखडले

शहरातील कोरोना रुग्णसंख्येचा वाढता आलेख (Pune Corona Update) पाहता महापालिका सतर्क झाली आहे.

पुण्यात पुन्हा कोव्हिड सेंटर सुरु, 50 टक्के खासगी बेड राखीव, कोरोना थोपवण्यासाठी प्रशासनाने हात आखडले
पुणे महानगरपालिका आणि कोरोना विषाणू
| Updated on: Feb 24, 2021 | 12:16 PM
Share

पुणे : शहरातील कोरोना रुग्णसंख्येचा वाढता आलेख (Pune Corona Update) पाहता महापालिका सतर्क झाली आहे. याच पार्श्वभूमीवर रुग्णांची गैरसोय होऊ नये तसंच त्यांना बेड मिळावे, यासाठी महापालिका पुन्हा कोव्हिड सेंटर (Pune Covid Centre Start) सुरु करणार आहे. (Pune Covid Centre Start, private hospitals Reserve 50 percent beds in the city, orders of Pune Municipal Corporation)

तीन ठिकाणी कोव्हिड सेंटर

पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने पुन्हा डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. काल तर एकाच दिवशी जवळपास कोरोनाचे सातशे रुग्ण आढळून आले. यानंतर महापालिका अगदी अलर्ट झाली आहे. रक्षक नगर, गणेश कला क्रीडा मंडळ, पठारे स्टेडियम या तीन ठिकाणी महापालिका कोव्हिड सेंटर सुरू करणार आहे.

रक्षक नगर, गणेश कला क्रीडा मंडळ, पठारे स्टेडियम या तिन्ही सेंटरवर 500 बेड्स उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे रुग्णांना बेड्स मिळणं सुलभ होणार आहे. येत्या दोन दिवसांत हे सेंटर पुन्हा सुरु करणार असल्याची माहिती महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. आशिष भारती यांनी दिली आहे.

गरज पडल्यास पुन्हा जंबो कोव्हिड सेंटर सुरु करणार

तसंच गरज पडल्यास पुन्हा जम्बो कोविड सेंटरही सुरू करणार असल्याची माहिती अधिकारी डॉ. आशिष भारती यांनी दिली आहे. एकंदरितच कोरोनाला आळा प्रतिबंध घालण्यासाठी पुणे महापालिका अॅक्शन मोडमध्ये आहे.

खासगी रुग्णालयातील 50 टक्के बेड राखीव

पुणे महापालिकेनं खासगी रुग्णालयांना बेडसंदर्भात सूचना देताना शहरातील 50 टक्के बेड राखीव ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले आहेत. खाजगी रुग्णालय प्रमुखांशी झालेल्या बैठकीत पालिका आयुक्तांनी शहारातील रुग्णालयांना अश्या प्रकारच्या सूचना दिल्या आहेत.

खासगी रुग्णालयातील बेडची माहिती डँशबोर्डवर अपडेट करणं बंधनकारक करण्यात आली आहे. तसंच कोरोना रुग्णाला खाजगी रूग्णालयानं प्रवेश नाकारल्यास महापालिका करणार कारवाई आहे. त्यामुळे कोणत्याही कोरोना रुग्णाला नाकारण्याचं धाडस खासगी रुग्णालयांनी करु नये, अशी तंबीच पालिका आयुक्तांनी दिली आहे.

दुसरीकडे खाजगी रुग्णालयातील बेड ताब्यात घ्यायला महापालिकेने सुरुवात केली आहे. वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे पुणे महापालिकेने अलर्ट होत एक पाऊल पुढे टाकलं आहे.

हॉटेल आणि रेस्टॉरंटचा कारवाईचा बगडा सुरु

कोरोनाच्या वाढच्या संसर्गाला नियंत्रित आणण्यासाठी महापालिका आणि पोलिसांनी नियमांचा भंग करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. विना सोशल डिस्टन्सिंग आणि 50 टक्के ग्राहकांना प्रवेश देण्याच्या अटीचे उल्लंघन करणाऱ्या रेस्टॉरंटवर गेल्या काही दिवसांत कारवाई केली जात आहे. तसंच विना मास्क फिरणाऱ्या फिरस्तींवरही महापालिकेने आर्थिक दंडाची कारवाई केली आहे.

(Pune Covid Centre Start, private hospitals Reserve 50 percent beds in the city, orders of Pune Municipal Corporation)

हे ही वाचा :

शहरातील 50 टक्के बेड राखीव ठेवा, खासगी रुग्णालयांना पुणे महापालिकेचे आदेश

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.