AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Deenanath Mangeshkar Hospital : तनिषा भिसे मृत्यू प्रकरणानंतर राज्य सरकारचा धर्मादाय रुग्णालयांसाठी मोठा निर्णय

Deenanath Mangeshkar Hospital : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा उपचाराअभावी मृत्यू झाल्यानंतर राज्य सरकारने धर्मादाय रुग्णालयांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नवे निर्देश जारी करण्यात आले आहेत.

Deenanath Mangeshkar Hospital : तनिषा भिसे मृत्यू प्रकरणानंतर राज्य सरकारचा धर्मादाय रुग्णालयांसाठी मोठा निर्णय
Deenanath Mangeshkar Hospital
| Updated on: Apr 22, 2025 | 10:18 AM
Share

तनिषा भिसे मृत्यू प्रकरणानंतर राज्य सरकारने धर्मादाय रुग्णालयांसाठी नवे निर्देश जारी केले आहेत. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तनिषा भिसे यांना अनामत रकमेअभावी उपचार नाकारण्यात आले होते. यात गर्भवती असलेल्या तनिषा यांचा मृत्यू झाला. महिलेला उपचार नाकारण्याच्या प्रकरणानंतर राज्य सरकारने धर्मादाय रुग्णालयांसाठी नवे निर्देश जारी केले आहेत. यापुढे अनामत रकमेअभावी उपचार नाकारू नयेत, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांवर प्राधान्याने उपचार करण्यात यावेत; तसेच गर्भवतीवरील उपचाराचा आपत्कालीन परिस्थितीत समावेश करावा,’ असे यात प्रामुख्याने नमूद करण्यात आले आहे.

मंगेशकर रुग्णालयात गर्भवती महिलेला दाखल करून घेण्यास टाळाटाळ करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी धर्मादाय सहआयुक्त, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने चौकशी करून अहवाल व निष्कर्ष राज्य सरकारला सादर केले होते. या अहवालातील शिफारशींच्या अनुषंगाने सरकारकडून आठ मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

काय आहेत मार्गदर्शक सूचना?

रुग्णालयात जमा होणारा निर्धन रुग्ण निधी (आयपीएफ) शिल्लक नसल्याच्या कारणामुळे रुग्ण उपचारापासून वंचित राहू नये.

राज्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयांनी महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना, आयुष्मान भारत योजना, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम आदी आरोग्याशी संबंधित सर्व योजना लागू कराव्यात.

आयव्हीएफ खात्याबाबतची अद्ययावत माहिती रुग्णालयांकडून घेऊन ती धर्मादाय आयुक्त यांच्या संकेतस्थळावर नियमितपणे अद्ययावत करण्यात यावी, अशा यात सूचनांचा यात समावेश आहे.

मेडिकल कौन्सिल कधी निर्णय घेणार?

गर्भवतीच्या मृत्यूप्रकरणी दीनानाथ रुग्णालयाप्रमाणेच मणिपाल, सूर्या आणि इंदिरा आयव्हीएफ या रुग्णालयांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे (एमएमसी) अहवाल सादर करावा लागणार आहे.

या सर्व रुग्णालयांचा अहवाल मिळाल्यानंतर अभ्यास करून ‘एमएमसी’ अंतिम निर्णय देणार आहे. गर्भवती मृत्यू प्रकरणी सोमवारी मुंबईत सुनावणी झाली. गर्भवतीच्या नातेवाईकाने त्यांची बाजू मांडली.

ससूनचा अहवाल मेडिकल कौन्सिलला प्राप्त झाला आहे. त्यानंतर या तिन्ही हॉस्पिटलचा अहवाल आल्यानंतर योग्य ते निर्णय मेडिकल कौन्सिल घेणार आहे.

मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.