
गेल्यावेळी पुणे महापालिकेत भाजपला मोठं यश मिळालं होतं. भाजपचे तब्बल 97 उमेदवार विजयी झाले, तर राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर होतं, राष्ट्रवादी काँग्रेसचे 39 उमेदवार विजयी झाले होते. पुणे महापालिकेच्या वार्ड क्रमांक 39,40 आणि 41 मध्ये एकूण बारा जागा आहेत, या तीनही प्रभागात गेल्यावेळी भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये अतितटीची लढत पहायला मिळाली. प्रभाग क्रमांक 39 मध्ये एकूण चार जागा असून, या प्रभागात धनकवाडी, आंबेगाव पठार या भागाचा समावेश होतो. गेल्यावेळी या प्रभागात तीन जागा या राष्ट्रवादीला तर एक जागा भाजपला मिळाली होती. प्रभाग क्रमांक 40 मध्ये आंबेगाव दत्तनगर आणि कातरज गावठाण या भागाचा समावेश होतो, प्रभाग क्रमांक 40 मध्ये गेल्यावेळी तीन जागा राष्ट्रवादीला तर एक जागा मनसेला मिळाली होती. तर प्रभाग क्रमांक 41 मध्ये कोंढवा बुद्रुक आणि येवले वाडी या भागांचा समावेश होतो. या प्रभागात गेल्यावेळी तीन जागा भाजपला तर एक जागा शिवसेनेला मिळाली होती.
प्रभाग क्रमांक 39 – प्रभाग क्रमांक 39 मध्ये एकूण चार जागा आहेत, त्यापैकी तीन जागा या राष्ट्रवादीला तर एक जागा भाजपला मिळाली होती. प्रभाग क्रमांक 39 मध्ये धनकवाडी आंबेगाव पठार या भागाचा समावेश होतो. गेल्यावेळी प्रभाग क्रमांक 39 अ मधून राष्ट्रवादीचे उमेदवार बाळा धनकवडे हे विजयी झाले होते. तर ब मधून राष्ट्रवादीच्या उमेदवार अश्विनी भागवत या विजयी झाल्या, तर क मधून भाजपच्या उमेदवार वर्षा तपकीर या विजयी झाल्या, ड मधून राष्ट्रवादीचे उमेदवार विशाल तांबे हे विजयी झाले.
सोलापूरात निकालापूर्वीच किरण देशमुखांच्या विजयाचे बॅनर
जळगाव : दोन महिलांना यादीत नाव असूनही मतदान करता आले नाही
BMC Election 2026 Exit Poll Prediction : जेव्हीसीच्या एक्झिट पोलनुसार मुंबईत कोणाला किती जागा?
एक्झिट पोलनुसार मुंबईत शिवसेना ठाकरे गट, मनसेला धक्का
ठाणे मानपाडात मतमोजणी केंद्रावर राडा
राज ठाकरेंच्या जागा कमी येणार, एक्झिट पोलचा अंदाज
प्रभाग क्रमांक 40 – प्रभाग क्रमांक 40 मध्ये एकूण चार जागा आहेत, त्यापैकी तीन जागा या राष्ट्रवादीला मिळाल्या होत्या, तर एक जागा मनसेला मिळाली. प्रभाग क्रमांक 40 मध्ये आंबेगाव दत्तनगर आणि कातरज गावठाण या भागाचा समावेश होतो. प्रभाग क्रमांक 40 अ मधून राष्ट्रवादीचे युवराज बेंद्रे हे विजयी झाले होते, तर प्रभाग क्रमांक 40 ब मधून राष्ट्रवादीच्या उमेदवार अमृता बाबर या विजयी झाल्या, तर क मधून स्मिता कोंढाणे या विजयी झाल्या, तर ड मध्ये मात्र मनसेला यश मिळालं ड मधून मनसेचे उमेदवार वसंत मोरे हे विजयी झाले.
प्रभाग क्रमांक 41 – प्रभाग क्रमांक 41 मध्ये कोंढवा बुद्रुक आणि येवले वाडी या भागांचा समावेश होतो. या प्रभागात गेल्यावेळी तीन जागा भाजपला तर एक जागा शिवसेनेला मिळाली होती. प्रभाग क्रमांक 41 अ मधून भाजपचे उमेदवार विरसेन जगताप हे विजयी झाले होते, तर ब मधून शिवसेनेच्या उमेदवार संगिता ठोसर या विजयी झाल्या, तर क मधून भाजपच्या उमेदवार वृषाली कामठे या विजयी झाल्या होत्या, तर ड मधून भाजपचे उमेदवार राजन टिळेकर हे विजयी झाले.
महत्त्वाच्या लिंक्स
महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स
बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV
महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE