Pune Election Results 2026 LIVE : पुण्याच्या प्रभाग क्रमांक 37, 38 मध्ये तिरंगी लढत, राष्ट्रवादी भाजपचा विजय रथ रोखणार?

Pune Election Results 2026 LIVE: पुण्याच्या प्रभाग क्रमांक 37 आणि 38 मध्ये गेल्यावेळी तिरंगी लढत पहायला मिळाली, या दोन्ही प्रभागातील एकूण सात जागांपैकी चार जागा या भाजपला मिळाल्या, दोन राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या तर एका जागेवर शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला.

Pune Election Results 2026 LIVE : पुण्याच्या प्रभाग क्रमांक 37, 38 मध्ये तिरंगी लढत, राष्ट्रवादी भाजपचा विजय रथ रोखणार?
Pune Election Results 2026
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jan 16, 2026 | 2:04 PM

गेल्यावेळी झालेल्या पुणे महापालिका निवडणुकीत भाजपला चांगलं यश मिळालं होतं, पुणे महापालिकेत भाजपनं एकहाती सत्ता मिळवली. राष्ट्रवादी काँग्रेसला देखील चांगल्या जागा मिळाल्या होत्या, मात्र दुसरीकडे काँग्रेस आणि शिवसेना यांना या निवडणुकीत अपेक्षित कामगिरी करता आली नाही. पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांत 37 मध्ये अप्पर सुपर इंदिरा नगर या भागाचा समावेश होतो. या प्रभाग तीन जागा असून, त्यापैकी एक शिवसेनेला तर दोन भाजपला मिळाल्या होत्या. तर प्रभाग क्रमांक 38 मध्ये गांधी गार्डन आणि बालाजी नगर या भागांचा समावेश होतो. या प्रभागात एकूण चार जागा असून, इथे भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये काटे की टक्कर पहायला मिळाली होती, दोघांना प्रत्येकी दोन-दोन जागा मिळाल्या आहेत. दरम्यान यावेळी मात्र परिस्थिती वेगळी आहे, यावेळी भाजपासमोर राष्ट्रवादीचं तगडं आव्हान असणार आहे, त्यामुळे यावेळी या दोन्ही प्रभागाचा तसेच पुणे महापालिकेचा निकाल काय लागणार याबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

प्रभाग क्रमांक 37 – प्रभाग क्रमांक 37 मध्ये अप्पर सुपर इंदिरा नगर या भागाचा समावेश होतो. या प्रभागात एकूण 3 जागा आहेत. गेल्यावेळी या प्रभागात एक जागा शिवसेनेला तर दोन जागा भाजपला मिळाल्या होत्या. प्रभाग क्रमांक 37 अ मधून भाजपच्या उमेदवार वर्षा साठे या विजयी झाल्या होत्या, तर प्रभाग क्रमांक 37 ब मधून भाजपच्या उमेदवार रुपाली धावडे या विजयी झाल्या, तर प्रभाग क्रमांक 37 क मधून मात्र शिवसेनेचे उमेदवार बाळा ओस्वाल यांनी विजयाचा गुलाल उधळला.

पुणे महापालिका निवडणूक निकाल

प्रभाग क्रमांक 38 – प्रभाग क्रमांक 38 मध्ये गांधी गार्डन आणि बालाजी नगर या भागांचा समावेश होतो. या प्रभागात एकूण चार जागा आहेत, गेल्यावेळी इथे भाजप आणि राष्ट्रवादी यांना सम समान जागा मिळाल्या होत्या दोन जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले होते, तर दोन जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले होते. प्रभाग क्रमांक 38 अ मधून राष्ट्रवादीचे उमेदवार दत्तात्रय धनकवडे हे विजयी झाले, तर प्रभाग क्रमांक 38 ब मधून भाजपच्या उमेदवार राणी भोसले या विजयी झाल्या होत्या. तर क मधून भाजपच्याच उमेदवार मनिषा कदम या विजयी झाल्या, तर ड मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रकाश कदम हे विजयी झाले.

महत्त्वाच्या लिंक्स

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2026

महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स

बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV

महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE

पुणे महापालिका निवडणूक निकाल 2026 LIVE

Follow Us