AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात कार चालकाचा निष्काळजीपणा, भयानक अपघातात 4 वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू, 3 ते 4 गंभीर जखमी, CCTV समोर

पुण्यात भयानक अपघाताची घटना घडली आहे... चालकाच्या निष्काळजीपणामुळे एका 4 वर्षीय चिमुकल्याला आपले प्राण गमवावे लागले आहेत, तर या अपघातात 3 ते 4 जण गंभीर जखमी झाले आहेत... संपूर्ण घटनेचा थरार CCTV मध्ये कैद झाला आहे.

पुण्यात कार चालकाचा निष्काळजीपणा, भयानक अपघातात 4 वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू, 3 ते 4 गंभीर जखमी, CCTV समोर
| Updated on: May 17, 2026 | 10:10 AM
Share

पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. खडकवासला गावात एका भरधाव कारने भीषण अपघात केल्याची भयानक घटना घडली आहे. एका बेजबाबदार कार चालकाने आपल्या ताब्यातील ‘टाटा पंच’ कार भरधाव वेगाने आणि हयगयीने चालवून 6 दुचाकी आणि एका रिक्षाला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एका ४ वर्षीय चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, 3 ते 4 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास हा भयानक अपघात झाला. तर घडलेली सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.  यशराज निलेश कांबळे असं अपघातात मृत्यू झालेल्या चिमुरड्याचं नाव आहे. घटलेल्या घटनेमुळे परिसरात संतापाचं वातावरण आहे.

MH 25 BH 6489 क्रमांकाची टाटा पंच कार घेऊन चालक आणि त्याचा साथीदार खडकवासला धरण भागाकडे चालले होते. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि त्याने रस्त्यावरील 6 दुचाकी वाहनांना आणि एका रिक्षाला धडक दिली. या वाहनांना धडक देऊन कार थेट रस्त्याच्या विरुद्ध बाजूच्या दुकानात घुसली. ही धडक इतकी भीषण होती की, यामध्ये दुचाकी वाहनांचे आणि रिक्षाचे प्रचंड नुकसान झालं आहे. तसेच 3 ते 4 नागरिक गंभीर जखमी झाल्याची माहिती देखील समोर येत आहे.

अपघातात गंभीर जखमी झालेल्या 4 वर्षांच्या यशराज कांबळे याला तातडीने सिंहगड रोडवरील जगताप रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचार सुरू असतानाच सायंकाळी 6.40 वाजण्याच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली. यशराज याच्या दुर्दैवी निधनामुळे कुटुंबियांवर मोठा दुःखाचा डोंगर  कोसळला आहे.

घडलेल्या अपघातानंकप पोलिसांनी कार चालत अमोल गोरक्षनाथ गेगडे याला अटक केली आहे आणि मिळालेल्या माहितीनुसार, तो शेतीचा व्यवसाय करतो. अमोल याचा मित्र प्रकाश तात्याराम कोठारे याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. याया दोघांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी त्यांना पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, आरोपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू केली..पुढील तपास नांदेड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

Follow Us
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा
तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; MPSC विद्यार्थ्यांचं
MPSC Protest Pune : तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; तिरडी यात्रेतून MPSC विद्यार्थ्यांचं पुण्यात सरकारविरोधात जोरदार आंदोलन
इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
Viral Video : इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; शिरूरच्या कार्यक्रमातील VIDEO सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं काय घडलं?
महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार
Mahayuti : महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; पुणे शिक्षक मतदारसंघात चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार?
महाराष्ट्रात १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात
Drought : महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट गडद; १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात; सरकारचा मोठा निर्णय काय?