AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Medical Student : पुणे पुन्हा हादरलं, 21 वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल, 20व्या मजल्यावरुन…नेमकं कारण काय?

पुण्यातील कात्रज परिसरात 21 वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीचा इमारतीच्या नवव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. माया रेड्डी असं मृत तरुणीचं नाव असून, ती भारती विद्यापीठात एमबीबीएसच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती.

Pune Medical Student : पुणे पुन्हा हादरलं, 21 वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल, 20व्या मजल्यावरुन...नेमकं कारण काय?
Pune medical student Maya Reddy dieImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 09, 2026 | 5:00 PM
Share

पुण्यातील कात्रज परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 21 वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीचा इमारतीच्या नवव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. माया रेड्डी असं मृत तरुणीचं नाव आहे. माया रेड्डी ही भारती विद्यापीठात एमबीबीएसच्या द्वितीय वर्षाला शिक्षण घेत होती, अशी माहिती समोर आली आहे. माया ही मूळची हैदराबाद येथील असल्याची माहितीही समोर आली आहे. तिच्या शिक्षणासाठी ती पुण्यात राहत होती. दरम्यान, कात्रज परिसरातील एका सोसायटीमध्ये ती राहत होती.

नेमकं काय घडलं?

आज दुपारी साधारण एक वाजण्याच्या सुमारास माया रेड्डी हिने राहत्या इमारतीच्या नवव्या मजल्यावरून खाली उडी मारल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेत ती गंभीर जखमी झाली. घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत पुढील तपास सुरू केला आहे. माया रेड्डीने हे टोकाचं पाऊल नेमकं कोणत्या कारणातून उचललं, याचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे. अभ्यासाचा ताण होता का, अथवा यामागे अन्य काही कारण आहे का, हे तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. दरम्यान, या घटनेमुळे भारती विद्यापीठ परिसरातील विद्यार्थ्यांमध्येही हळहळ व्यक्त केली जात आहे. भारती विद्यापीठ पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

पुण्यात आणखी एक आत्महत्या

दरम्यान, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून अधिकारी होण्याचं स्वप्न घेऊन पुण्यात आलेल्या 25 वर्षीय तरुणानेही आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नारायण पेठ भागातून समोर आली आहे. प्रथमेश दिलीप देशमुख असं या तरुणाचं नाव असून तो मूळचा धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील खासापुरी येथील रहिवासी होता. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, आर्थिक विवंचना आणि डोक्यावर झालेलं कर्ज यामुळे प्रथमेशने हे टोकाचं पाऊल उचलल्याचा अंदाज आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करत अधिकारी होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या प्रथमेशच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Follow Us
भाजप मोठ्या तयारीत? केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांच्या...
भाजप मोठ्या तयारीत? केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक
मोठी बातमी! शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीच्या आठवडाभर आधीच... अमित शहा...
मोठी बातमी! शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीच्या आठवडाभर आधीच... शहांचं नाव घेत बड्या नेत्याचं खळबळजनक विधान
कराळे मास्तरांचा पारा चढलाच! थेट बड्या नेत्याचं नाव घेत केला आरोप,
कराळे मास्तरांचा पारा चढलाच! थेट बड्या नेत्याचं नाव घेत केला आरोप, व्हिडीओ व्हायरल
मराठा आरक्षणावर जरांगे पाटलांचा विखेंवर गंभीर आरोप; म्हणाले, वर्षभर...
मराठा आरक्षणावर जरांगे पाटलांचा विखेंवर गंभीर आरोप; म्हणाले, वर्षभर घात केला अन्...
विद्यानंद बापटांनंतर विवेकानंद नावाचा तरुण तुफान चर्चेत; उद्धव ठाकरे..
विद्यानंद बापटांनंतर विवेकानंद नावाचा तरुण तुफान चर्चेत; उद्धव ठाकरेंनी थेट...
3.16 लाख कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप! सामंत, लाडांनी आकडेवारीच सांगितली
Maratha Reservation | मराठवाड्यात 3.16 लाख कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप! उदय सामंत-प्रसाद लाडांनी आकडेवारीच सांगितली
मनोज जरांगेंची पाटलांची प्रकृती खालावली;12 तारखेला अंतरवालीत होणार...
मनोज जरांगेंची पाटलांची प्रकृती खालावली; 12 तारखेला अंतरवालीत होणार बैठक
2009 मधील वसंत डावखरे प्रकरणाचा निकाल लागणार? उद्धव ठाकरे...
2009 मधील वसंत डावखरे प्रकरणाचा निकाल लागणार? उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंचा व्हिसीद्वारे जबाब
जरांगे नावाचं माकड तोंडाला येईल ते बोलतंय! अजय बारस्करांचा जरांगेंवर घ
Ajay Baraskar | जरांगे नावाचं माकड तोंडाला येईल ते बोलतंय! अजय बारस्करांचा मनोज जरांगेंवर घणाघात
धक्कादायक! काठ्या आणि लोखंडी रॉडने मारहाण... अहिल्यानंगरमध्ये थरकाप...
धक्कादायक! काठ्या आणि लोखंडी रॉडने मारहाण... अहिल्यानंगरमध्ये थरकाप उडवणारा प्रकार