AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune rape case : पीडित तरुणीच्या नव्या मागणीनंतर पुणे बलात्कार प्रकरणात मोठं ट्विस्ट

काही दिवसांपूर्वी पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात उभ्या असलेल्या बसमध्ये एका तरुणीवर अत्याचार करण्यात आला होता. या प्रकरणात आता पीडित तरुणीनं केलेल्या नव्या मागणीनंतर प्रकरणात मोठं ट्विस्ट आलं आहे.

Pune rape case : पीडित तरुणीच्या नव्या मागणीनंतर पुणे बलात्कार प्रकरणात मोठं ट्विस्ट
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 12, 2025 | 3:17 PM
Share

काही दिवसांपूर्वी पुण्यात एक धक्कादायक घटना घडली होती. बसस्थानकात उभ्या असलेल्या बसमध्ये तरुणीवर अत्याचार करण्यात आला होता. पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात हा प्रकार घडला. या घटनेनंतर राज्यभरात खळबळ उडाली, पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला. दत्तात्रय गाडे असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे, तो पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातील गुणा गावचा रहिवाशी आहे. पोलिसांनी त्याला अटक देखील केली आहे, मात्रा आता पीडितेच्या नव्या मागणीनंतर आता या प्रकरणात मोठं ट्विस्ट आलं आहे.

काय आहे पीडितेची मागणी? 

स्वारगेट बलात्कार प्रकरणात सरकारी वकील म्हणून अजय मिसर यांच्या नावाचा प्रस्तावर सरकारकडे दाखल झाला आहे. पुणे पोलिसांकडून अजय मिसर यांच्या नावाचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. मात्र अजय मिसर यांच्या नावाबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.  मात्र आता पीडित तरुणीकडून सरकारी वकील म्हणून असीम सरोदे यांना नियुक्त करावं अशी मागणी करण्यात आली आहे. परंतु पीडित तरुणीने अर्ज देण्यास उशिर केल्याचं स्पष्टीकरण यावर पुणे पोलिसांकडून देण्यात आलं आहे. त्यामुळे आता या प्रकरणात सरकारी वकील कोण असणार? हे पहाणं महत्त्वाचं असणार आहे.

अशा आवळल्या आरोपीच्या मुसक्या 

स्वारगेट बसस्थानकात उभ्या असलेल्या एका बसमध्ये तरुणीवर अत्याचार करण्यात आला, त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता. त्याला पकडण्यासाठी तब्बल 13 पोलिसांची पथकं तैनात करण्यात आली होती, तो त्याच्या मुळगावी गुणा येथे लपून बसल्याचा संशय पोलिसांना होता. पोलिसांनी आरोपीच्या गावात त्याचा कसून शोध घेतला. त्याची माहिती सांगणाऱ्याला बक्षीस देखील जाहीर करण्यात आलं होतं. अखेर मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या, त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान आरोपीने पीडितेवर दोनदा बलात्कार केल्याचं वैद्यकीय अहवालामधून समोर आलं आहे. मात्र या प्रकरणात आरोपीच्या कुटुंबीयांकडून वेगवेगळे दावे करण्यात येत आहे. या प्रकरणात अद्याप तपास सुरू आहे, आणखी काही महत्त्वाची माहिती समोर येऊ शकते.

Follow Us
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवानाच रद्द केला
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवाना रद्द केला, नेमकं कारण काय?
काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात
Eknath shinde | काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात, 45 सरकारांचा दाखला देत म्हणाले...
शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल
Nagpur Farmer | शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! नागपूरच्या शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल चर्चेत, व्हिडिओ होतोय व्हायरल
राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे...
Rahul Gandhi | राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे परराष्ट्र धोरण नाही म्हणत मोदींवर निशाणा
शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
तू तेव्हा वाचला आहेस, आता वाचणार नाहीस! शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल
MNS Protest | केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल; आंदोलन पेटलं
हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Ramp Walk | हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! आत्मसमर्पित महिला नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन....
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन; रेशीम उद्योगाला मिळणार नवी झेप
राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
Supriya Sule | राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाल्या...
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश