AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुनेत्रा पवारांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे तक्रार, नेमकं कारण काय?

बारामती महापालिकेने केलेल्या क्षेत्रीय कार्यालयांच्या पुनर्रचनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आक्षेप नोंदवला आहे. राजकीय हस्तक्षेपाच्या तक्रारीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाकडून सविस्तर अहवाल मागवला आहे.

सुनेत्रा पवारांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे तक्रार, नेमकं कारण काय?
sunetra pawar devendra fadnavis
| Updated on: Apr 13, 2026 | 8:16 AM
Share

सध्या बारामतीत विधानसभेच्या पोटनिवडणुकीचे वारे वाहत आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या महायुतीकडून अधिकृत उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. त्यातच आता पुणे महापालिका प्रशासनाने केलेल्या क्षेत्रीय कार्यालयांच्या पुनर्रचनेवरून मोठा राजकीय संघर्ष उफाळून आला आहे. याच पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एक तक्रार केली आहे. सुनेत्रा पवार यांनी देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहित विविध आरोप केले आहेत. प्रशासकीय निर्णय प्रक्रियेत राजकीय हस्तक्षेप झाल्याचा गंभीर ठपका ठेवत उपमुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणीही केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

पुणे महापालिका निवडणूक निकालानंतर प्रशासनाने शहरात १५ क्षेत्रीय कार्यालयांची पुनर्रचना केली. परंतु, ही पुनर्रचना करताना प्रशासनाने नागरिकांच्या सोयीपेक्षा राजकीय सोयीला जास्त महत्त्व दिल्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे म्हणणे आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात काही बाबी अधोरेखित केल्या आहेत. सध्या क्षेत्रीय कार्यालयांच्या सीमांमध्ये केलेल्या बदलांमुळे स्थानिकांना दैनंदिन कामकाजासाठी मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. ही पुनर्रचना तांत्रिक निकषांवर नसून ती दिशाहीन आहे, असे सुनेत्रा पवार यांनी पत्रात म्हटले आहे.

या पुनर्रचनेचा सर्वात मोठा फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसला आहे. नवीन रचनेमुळे शहरात एकूण १५ पैकी तब्बल १४ क्षेत्रीय कार्यालयांच्या प्रभाग समित्यांवर भाजपचे निर्विवाद वर्चस्व निर्माण होणार आहे. तर काँग्रेसच्या वाट्याला केवळ एक प्रभाग समिती आली आहे. महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ दुसऱ्या क्रमांकाचे असतानाही त्यांना सत्तेच्या प्रक्रियेतून बाहेर ठेवण्यासाठी प्रशासनाचा वापर करून राजकीय हस्तक्षेप करण्यात येत आहे, असा आरोप सुनेत्रा पवार यांनी केला आहे.

मुख्यमंत्र्यांची तातडीने दखल

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या तक्रारीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेतली आहे. प्रशासकीय पातळीवर झालेल्या या वादाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्र्यांनी नगर विकास विभागाला तातडीने हालचाली करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका आयुक्तांकडून क्षेत्रीय कार्यालयांच्या पुनर्रचनेचा सविस्तर वस्तुस्थितीदर्शक अहवाल मागवला आहे. या अहवालात पुनर्रचना करताना कोणत्या नियमांचे पालन केले, प्रभाग सीमांकन करताना कोणते निकष लावले आणि राजकीय दबावातून हे निर्णय घेतले गेले का, याची सखोल तपासणी केली जाणार आहे.

दरम्यान आगामी काळात मुख्यमंत्र्यांकडे सादर होणारा अहवाल या संपूर्ण वादावर काय भूमिका स्पष्ट करतो आणि त्याचा काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल