पुण्यावरुन वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होणार, राज्यातील या मोठ्या शहरासाठी प्रवासाचा वेळ वाचणार

नागपूर येथून नागपूर-सिकंदराबाद आणि नागपूर-इंदोर, नागपूर भोपाळ अशा तीन वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत. त्यात नव्या दोन वंदे भारत एक्सप्रेसची भर पडणार आहे. नागपूर ते मुंबई आणि नागपूर ते पुणे या दोन्ही मार्गावर प्रवास करणऱ्यांची संख्या ही लक्षणीय आहे.

पुण्यावरुन वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होणार, राज्यातील या मोठ्या शहरासाठी प्रवासाचा वेळ वाचणार
Follow us
| Updated on: Jan 09, 2025 | 4:25 PM

पुणे शिक्षणाचे शहर आहे. तसेच उद्योगाचे शहर झाले आहे. आता पुणे आयटी हब बनले आहे. त्यामुळे पुणे शहरात देशभरातून लोक येत असतात. त्याचवेळी काही दिवसांपूर्वी रेल्वे मंडळाने पुणे शहरातून चार नवीन वंदे भारत एक्स्प्रेस सुरु करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यात पुणे-शेगाव, पुणे-वडोदरा, पुणे-सिकंदराबाद आणि पुणे-बेळगावचा समावेश होता. आता पुणे शहरातून आणखी एक वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होण्याचा हालचाली आहे. नागपूर-पुणे वंदे भारत लवकरच सुरु होण्याची शक्यता आहे.

रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव

नागपूर -पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी पुढे येत आहे. पुढील काही महिन्यांत नागपूर ते पुणे आणि नागपूर ते मुंबई दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस धावण्याची शक्यता आहे. यासंदर्भात एक प्रस्ताव मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळाने रेल्वे बोर्डकडे सादर केल्याची माहिती नागपूरचे नवे नियुक्त डी.आर.एम विनायक गर्ग यांनी दिलेली आहे. त्यांनी नुकताचं पदभार स्वीकारला आहे.

नागपूरवरुन या ठिकाणी बंदे भारत

सध्या नागपूर येथून नागपूर-सिकंदराबाद आणि नागपूर-इंदोर, नागपूर भोपाळ अशा तीन वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत. त्यात नव्या दोन वंदे भारत एक्सप्रेसची भर पडणार आहे. नागपूर ते मुंबई आणि नागपूर ते पुणे या दोन्ही मार्गावर प्रवास करणऱ्यांची संख्या ही लक्षणीय आहे. मात्र,गाड्यांची संख्या मर्यादित असल्याने तीन महिन्यांपूर्वीचे भली मोठी वेटिंग लिस्ट ही तयार झालेली असते. त्यामुळे गरजू प्रवाशांना आगाऊ पैसे खर्च करून खासगी बसचा पर्याय निवडावा लागत आहे.

हे सुद्धा वाचा

यासंदर्भात गेल्या वर्षांपासून नागपूर ते मुंबई व नागपूर ते पुणे या दोन्ही मार्गावर नवीन गाड्या सुरू करण्याची मागणी प्रवाश्यांकडून करण्यात येत होती. त्या अनुषंगाने मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळाने रेल्वे बोर्डाच्या या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्यामुळे त्याबाबत सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे.

'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?
'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?.
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी.
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला.
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका.
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा.
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ.
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री.
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?.
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले...
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले....