AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फक्त 1 प्रश्न अन् बुधवार पेठेतल्या महिलांचं मोठं सत्य उघड; कशामुळे झाली वेश्या व्यवसाय करणाऱ्यांची पोलखोल?

Pune Crime News: पुण्यातून एका धक्कादायक बातमी समोर येत आहे. बुधवार पेठेतल्या महिलांना पोलिसांनी एक प्रश्न विचारला आणि मोठं सत्य समोर आलं, तर जाणून घ्या काशामुळे झाली वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांची पोलखेल?

फक्त 1 प्रश्न अन् बुधवार पेठेतल्या महिलांचं मोठं सत्य उघड; कशामुळे झाली वेश्या व्यवसाय करणाऱ्यांची पोलखोल?
| Updated on: May 13, 2026 | 11:37 AM
Share

Pune Crime News: महाराष्ट्राची सांस्कृतीक राजधानी पुणे याठिकाणी बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरोधात पोलिसांनी कारवाई तीव्र करण्यास सुरुवात केली आहे. नुकताच पुण्यातील प्रसिद्ध रेड लाईट एरिया, बुधवार पेठे येथे फरासखाना पोलिसांनी मोठी कारवाई करत 5 बांगलादेशी महिलांना ताब्यात घेतलं आहे… मिळालेल्या माहितीनुसार, ही कारवाई पोलिसांच्या एका विशेष शोधमोहिमेचा भाग होती, जी रविवार रात्री उशिरापासून सोमवार सकाळपर्यंत राबवण्यात आली.

‘या’ प्रश्नांमुळे झाली पोलखोल…

पोलिसांच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार पेठ स्थित माचिस बिल्डिंग आणि बाजूच्या परिसरातील चौकशी सुरु असताना, पोलिसांनी काही महिलांच्या बोलण्यात काहीसा फरक जाणवला… ज्यावर पोलिसांनी संशय व्यक्त केला. महिलांची भाषा पश्चिम बंगाल येथील बंगालीपेक्षा थोडी वेगळी होती. महिलांच्या बोलण्यात बांगलादेशी लहेजा स्पष्ट जाणवत होता…

जेव्हा पोलिसांनी चौकशी करण्यास सुरुवात केली, तेव्हा दोन महिलांनी पश्चिम बंगाल येथील असल्याचा दावा केला. संशय दूर करण्यासाठी पोलिसांनी महिलांना दोन प्रश्न विचारले. जेव्हा महिलांना विचारण्यात आलं की, भारताचं राष्ट्रगीत काय आहे? यावर त्या गप्प झाल्या, त्यांना राष्ट्रगीताच्या ओळी देखील येत नव्हत्या.. त्यानंतर पोलिसांनी त्यांनी भारताचे पंतप्रधान कोण आहेत? असा प्रश्न विचारला. याचं देखील महिलांना समाधानकारक उत्तर देता आलं नाही.

एवढंच नाही तर, पश्चिम बंगाल येथील त्यंच्या कथित गावांबद्दल विचारण्यात आल्यानंतर देखील त्यांनी काहीही बोलता आलं नाही आणि महिला घाबरल्या… या प्रश्नांमुळे स्पष्ट झालं की, महिला भारतीय नागरीक नव्हत्या, त्या बेकायदेशीरपणे सीमा पार करून भारतात वास्तव्य करत होत्या.

वेश्याव्यवसायाचा बेकायदेशीर व्यापार

डीसीपी कृषिकेश रावले यांनी याप्रकरणी माहिती दिली आहे. पाच महिला बेकायदेशीरपणे सीमा पार करून भारतात दाखल झालेल्या. चौकशीत असं देखील समोर आलं आहे की, स्वतःच्या इच्छेने त्या वेश्याव्यवसायात सक्रिय होत्या. त्यांच्याकडे भारतात राहण्यासाठी कोणत्याच प्रकारचा पासपोर्ट, व्हिजा किंवा ओळखपत्र नव्हतं…

पुण्यात वाढतीये बांगलादेशीयांची संथ्या

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध स्थलांतरितांविरोधात ही मोहीम आक्रमकपणे राबवली जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे, गेल्या 11 महिन्यांत पुणे शहरात एकूण 95 बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. एवढ्या मोठ्या संख्येने स्थलांतरित सापडल्याने शहराच्या अंतर्गत सुरक्षेबद्दल गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत

Follow Us
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल