AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकही काच ठेवणार नाही…; मनसेकडून हायप्रोफाईल पार्टीचा पर्दाफाश, पबवाल्यांना मोठा इशारा

पुण्यातील राजा रावबहादूर मिल्स येथील किकी नावाच्या पबमध्ये झालेल्या फ्रेशर्स पार्टीवर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने छापा टाकला. या पार्टीत अल्पवयीन मुलांना प्रवेश देण्यात आल्याचे आणि त्यांना मोठ्या प्रमाणात मद्य पुरवण्यात आल्याचे समोर आले आहे.

एकही काच ठेवणार नाही...; मनसेकडून हायप्रोफाईल पार्टीचा पर्दाफाश, पबवाल्यांना मोठा इशारा
raj thackeray
| Updated on: Aug 24, 2025 | 8:42 AM
Share

गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात विविध गैरप्रकार वाढल्याचे दिसत आहे. पुण्यात सध्या अनेक ठिकाणी विविध दारु पार्ट्यांचे आयोजन केले जात आहे. यात सर्रासपणे कॉलेजला जाणाऱ्या अल्पवयीन मुलांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच आता पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. पुणे शहरातील राजा रावबहादूर मिल्स येथील किकी नावाच्या पबवर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने (मनविसे) धडक कारवाई केली आहे. या पबमध्ये सुरु असलेल्या एका फ्रेशर्स पार्टीवर मनसेने छापेमारी करत ती बंद पाडली. यावेळी पब चालकाला मनसे स्टाईल दमही देण्यात आला.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात राजा रावबहादूर मिल्स येथील किकी नावाच्या पबमध्ये एक फेशर्स पार्टी आयोजित करण्यात आली होती. ही पार्टी एमआयटी-वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, सिम्बायोसिस आणि व्हीव्हीआयटी सारख्या नामांकित कॉलेजमधील विद्यार्थ्यांसाठी होती. शुक्रवारी २२ ऑगस्ट रोजी ही पार्टी आयोजित करण्यात आली होती. संध्याकाळी ५ वाजल्यापासून सुरू असलेल्या या पार्टीमध्ये शेकडो तरुण-तरुणी सहभागी झाले होते. यावेळी पब चालकांनी विद्यार्थ्यांचे ओळखपत्र न तपासता एंट्री दिली. तसेच एंट्रीचे रेकॉर्डही ठेवण्यात आले नाही.

या पार्टीत १७ ते २१ वयोगटातील अल्पवयीन मुलांना प्रवेश देण्यात आला. विशेष म्हणजे या मुलांना मोठ्या प्रमाणात मद्य पुरवण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच मनसेने आक्रमक पावित्रा घेतला. मनविसेच्या पदाधिकाऱ्यांनी तात्काळ राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यानंतर मनविसेचे पदाधिकारी आणि उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे किकी पबवर छापा टाकला. त्यावेळी पार्टी पूर्णपणे सुरु होती.

संपूर्ण पब बार फोडून टाकला जाईल

यानंतर अधिकाऱ्यांनी तातडीने ही पार्टी बंद पाडली. पार्टीचे आयोजक व पब चालकांवर कडक कारवाई करण्यास सुरुवात केली. रात्री दोन वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती. मनविसेचे शहराध्यक्ष धनंजय दळवी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी मनविसे राज्य कार्यकारिणी सदस्य अभिषेक थिटे, उप शहर अध्यक्ष विक्रांत भिलारे, परिक्षीत शिरोळे यांच्यासह अनेक पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने फ्रेशर्स पार्टीच्या नावाखाली तरुण-तरुणींना व्यसनाधीन करण्याच्या या प्रवृत्तीचा तीव्र निषेध केला आहे. “यापुढे कोणत्याही पब किंवा रेस्टॉरंटने जर फ्रेशर्स पार्टी आयोजित करून अल्पवयीन मुलांना दारु दिली, तर त्या पबची एकही काच शिल्लक ठेवणार नाही. संपूर्ण पब बार फोडून टाकला जाईल”, असा इशारा मनसेने दिला.

अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय
अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय.
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?.
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन.
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार.
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल.
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट.
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले.
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना...
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना....
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला.
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार.