
पुणे : एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना पुण्यातील खराडी येथे सुरू असलेल्या रेव्ह पार्टीतून ताब्यात घेण्यात आलंय. पुणे पोलिसांनी मध्यरात्री ही कारवाई केली. या पार्टीत दोन महिला पाच पुरुषांचाही समावेश होता. या पार्टीदरम्यानचा धक्कादायक व्हिडीओ पुढे आल्याने खळबळ उडाली. यावर प्रतिक्रिया देताना एकनाथ खडसे यांनी स्पष्टपणे सांगितले की, दोषी असणाऱ्याला शासन झाले पाहिजे. खरी रेव्ह पार्टी असेल आणि त्या रेव्ह पार्टीमध्ये आमचे जावई त्याठिकाणी गुन्हेगार असतील तर मी त्याठिकाणी त्यांचे समर्थन करणार नाही.
एकनाथ खडसेंच्या जावयाचे पाय खोलात पावत्या पुढे
आता एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांचे पाय खोलात असल्याचे बघायला मिळातंय. थेट काही पावत्याच पुढे आल्या आहेत. यामुळे नाथा भाऊंच्या जावयाच्या समस्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. प्रांजल खेवलकर यांच्या नावाने बुकिंग करण्यात आल्याचे पावतीवरून दिसत आहे. हॉटेलच्या बुकिंगच्या पावत्यामध्ये प्रांजल खेवलकर यांच्या नावाचा स्पष्टपणे उल्लेख दिसतोय.
बुकिंग प्रांजल खेवलकर यांच्याच नावाने असल्याचे स्पष्ट
प्रांजल खेवलकर यांच्या नावाने 25 ते 28 जुलैपर्यंत हे बुकिंग करण्यात आले होते. रूम नंबर 101 आणि रूम नंबर 102 खेवलकर यांच्या नावाने बुक होत्या. 10 हजार 357 रुपये असे याचे भाडे होते. एका रूमचे बुकिंग 25 ते 28 तर दुसऱ्या रूमचे बुकिंग 26 ते 27 पर्यंत करण्यात आले. गिरीष महाजन यांनी आरोप करताना अगोदरच म्हटले होते की, या रेव्ह पार्टीचे आयोजन खडसेंच्या जावयाने केले होते.
पुणे पोलिसांनी खराडी येथे मध्यरात्री छापेमारी
त्यामध्येच आता बुकिंगच्या पावत्या पुढे आल्याने हे स्पष्ट होतंय की, रूम बुकिंग प्रांजल खेवलकर यांच्याच नावाने करण्यात आले, यासोबतच पैसेही देण्यात आली. पुण्यातील उच्चभ्रू खराडी येथे पोलिसांनी मध्यरात्री छापेमारी केली. या ठिकाणी पार्टीच्या नावाखाली रेव्ह पार्टी सुरू असल्याचा दावा पोलिसांनी केला. या ठिकाणी पोलिसांनी हुक्का, दारू, अंमली पदार्थ जप्त केल्याचीही माहिती मिळत आहे.