AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डार्ट चुकला, मग शार्प शूटरने थेट…; पुण्यात मध्यरात्री थरार, 3 जणांचा बळी घेणारा नरभक्षक बिबट्या अखेर ठार

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक बिबट्याला वनविभागाने अखेर ठार केले. पिंपरखेड येथे दोन मुले व एका वृद्ध महिलेला बळी घेणाऱ्या या बिबट्याला दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश होते.

डार्ट चुकला, मग शार्प शूटरने थेट...; पुण्यात मध्यरात्री थरार, 3 जणांचा बळी घेणारा नरभक्षक बिबट्या अखेर ठार
Pune leopard killed
| Updated on: Nov 05, 2025 | 8:15 AM
Share

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून दहशत पसरवणाऱ्या नरभक्षक बिबट्याला अखेर ठार मारण्यात वनविभागाला मोठे यश मिळाले आहे. पिंपरखेड परिसरात दोन लहान मुले आणि एका वृद्ध महिलेला आपला बळी बनवणाऱ्या या बिबट्याला दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिले होते. आता अखेर शार्प शूटरच्या पथकाने ही कारवाई पूर्ण केली. त्यामुळे शिरूर, पिंपरखेड परिसरातील रहिवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावात बिबट्याच्या हल्ल्याने काही दिवसांपूर्वी रोहन विलास बोंबे या १३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर ग्रामस्थ प्रचंड संतप्त झाले होते. त्यांच्याकडून नरभक्षक बिबट्याला जागीच ठार मारण्याची मागणी केली होती. याप्रकरणी वनविभागाने या बिबट्याचा शोध घेण्यासाठी दिवसभर कॅमेरा ट्रॅप आणि ड्रोन सर्वे सुरू ठेवला होता. रात्रीच्या वेळी थर्मल ड्रोनच्या मदतीने तपास सुरू असताना, घटनास्थळापासून सुमारे ४०० ते ५०० मीटर अंतरावर बिबट्याचे लोकेशन सापडले.

पाच ते सहा वर्षांचा नर बिबट्या ठार

वन विभागाने त्याला बेशुद्ध करण्यासाठी डार्ट (Dart) मारण्याचा प्रयत्न केला, मात्र बिबट्या आणखी चवताळला आणि त्याने वन कर्मचाऱ्यांवर प्रतिहल्ला सुरू केला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून, तैनात असलेल्या शार्प शूटरने गोळीबार केला आणि बिबट्या जागीच ठार झाला. वन विभागाने ठार झालेल्या बिबट्याच्या पावलांचे ठसे नरभक्षक बिबट्याच्या ठशांसोबत जुळत असल्याचे समोर आले आहे. हा बिबट्या अंदाजे पाच ते सहा वर्षांचा नर बिबट्या होता.

आता मृत बिबट्याचे शव ग्रामस्थांना दाखवल्यानंतर, पुढील तपासणीसाठी ते माणिकडोह बिबट निवारा केंद्रात हलवण्यात आले आहे. या यशस्वी संयुक्त कारवाईमुळे स्थानिक ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

पुण्यातील बिबटे पकडून वनतारा येथे हलवले जाणार

दरम्यान पुणे जिल्ह्यातील बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील बिबटे पकडून त्यांना वनतारा येथे हलवले जाणार आहेत. राज्याच्या सचिवांनी केंद्राच्या वन विभागाच्या सचिवांशी संवाद साधून बिबटे हलवण्यासाठी मान्यता मिळवली आहे. पुणे जिल्ह्यात जवळपास २ हजार बिबटे असल्याचा अंदाज आहे. या बिबट्यांना रेस्क्यू करण्यासाठी ७०० पिंजरे मागवले गेले आहेत. जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या मागणीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

शिर्डीत चमत्कार? साईबाबाचं दर्शन अन् अंध मुलाला दृष्टी! दावा नेमका काय
शिर्डीत चमत्कार? साईबाबाचं दर्शन अन् अंध मुलाला दृष्टी! दावा नेमका काय.
पार्थ अजित पवारांचे 42 कोटीही वाचवणार? दमानियांचा दावा काय?
पार्थ अजित पवारांचे 42 कोटीही वाचवणार? दमानियांचा दावा काय?.
महाआघाडीचं सरकार दाखवणारा एक्झिट पोल! निकालापूर्वीच चुरशीची लढत
महाआघाडीचं सरकार दाखवणारा एक्झिट पोल! निकालापूर्वीच चुरशीची लढत.
ड्रग्स तस्करीचे आरोपी भाजपवासी; विरोधकानी घेरल, सुळेंचं थेट CMला पत्र
ड्रग्स तस्करीचे आरोपी भाजपवासी; विरोधकानी घेरल, सुळेंचं थेट CMला पत्र.
लालकिल्ला 26 जानेवारीला अतिरेक्याच्या टार्गेटवर, धक्कादायक खुलासे समोर
लालकिल्ला 26 जानेवारीला अतिरेक्याच्या टार्गेटवर, धक्कादायक खुलासे समोर.
ज्यांचे पती, वडील नाही अशा 'बहिणीं'साठी मोठे बदल, तटकरेंची मोठी माहिती
ज्यांचे पती, वडील नाही अशा 'बहिणीं'साठी मोठे बदल, तटकरेंची मोठी माहिती.
अंजली दमानियांचा अजित दादांच्या 69 कंपन्यांबाबत गंभीर आरोप काय?
अंजली दमानियांचा अजित दादांच्या 69 कंपन्यांबाबत गंभीर आरोप काय?.
मोदींकडून स्फोटातील जखमींची विचारपूस, दिल्लीतील LNJP रूग्णालयात दाखल
मोदींकडून स्फोटातील जखमींची विचारपूस, दिल्लीतील LNJP रूग्णालयात दाखल.
सांगली हादरली, बर्थडे पार्टीत काय घडलं? नेत्याची 'मुळशी पॅटर्न'न हत्या
सांगली हादरली, बर्थडे पार्टीत काय घडलं? नेत्याची 'मुळशी पॅटर्न'न हत्या.
दिल्ली स्फोट... जैशचं हेडक्वार्टर उडवल्याचा बदला! कनेक्शन नेमकं काय?
दिल्ली स्फोट... जैशचं हेडक्वार्टर उडवल्याचा बदला! कनेक्शन नेमकं काय?.