AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिक्षणाचा खेळखंडोबा, राज्यातील शेकडो शाळा अनधिकृत, तुमचा पाल्य तर त्या शाळांमध्ये नाही ना?

Pune News : राज्यात दरवर्षी अनधिकृत शाळांचे पीक तयार होते. शिक्षण विभाग त्या शाळांची संख्या जाहीर करते. परंतु धाडसी कारवाई होती नाही. यामुळे पुन्हा नवीन शैक्षणिक वर्षात अनिधिकृत शाळा तयार होतात.

शिक्षणाचा खेळखंडोबा, राज्यातील शेकडो शाळा अनधिकृत, तुमचा पाल्य तर त्या शाळांमध्ये नाही ना?
Image Credit source: tv9
| Updated on: Jul 14, 2023 | 2:56 PM
Share

योगेश बोरसे, पुणे, दिनांक 14 जुलै 2023 : राज्यातील शिक्षणाचा खेळखंडोबा सुरु आहे. पालक आपल्या पाल्यांचे प्रवेश शाळांमध्ये घेतात. परंतु त्या शाळा अधिकृत आहे की अनधिकृत आहे, त्याची माहिती पालकांना नसते. अचानक शिक्षण विभाग अनधिकृत शाळांची संख्या जाहीर करते. ग्रामीण भागातच नव्हे तर राज्याचे शिक्षण संचालक बसतात त्या पुणे शहरात आणि शिक्षण मंत्री असतात त्या मुंबईतही अनधिकृत शाळा आहेत. शाळा चालवण्यासाठी आवश्यक शासन मान्यता कागदपत्रे नसल्याचे या ठिकाणी शाळांमध्ये दिसून आले.

राज्यात किती शाळा अनधिकृत

राज्यात तब्बल 417 शाळा अनधिकृत आहेत. शिक्षण विभागाच्या तपासणीत ही माहिती उघड झाली. अनधिकृत शाळांची संख्या मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात सर्वाधिक आहे. मुंबईमध्येच 181 शाळा अनधिकृत आहेत. पुणे जिल्ह्यात 3 शाळा अनधिकृत आहेत.

का आहे अनधिकृत शाळा

शाळा सुरु करण्याची परवानी नसणे, शिक्षण मंडळाशी संलग्न नसणे, ना हरकत प्रमाणपत्र नसताना शाळा सुरु करण्यात आली. शाळा चालवण्यासाठी आवश्यक शासन मान्यता कागदपत्रे नसल्याचे पुण्यात दिसून आले. या प्रकरणात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

पुण्यात या शाळांवर गुन्हा दाखल

पुण्यात ब्लिस इंडीफाय इंटरनॅशनल शाळेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासनाची मान्यता नसताना विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन विद्यार्थ्यांकडून भरमसाट शुल्काची आकारणी या शाळेने केली. यामुळे शाळेचे मुख्याध्यापक सिझी अली खान, फाऊंडेशनचे मालक गौतम बुधराणी यांच्या गुन्हा दाखल केला आहे. तसेच मुळशी तालुक्यातील माण येथील रुडीमेट इंटरनॅशनल स्कुलवर गुन्हा दाखल केला आहे. शाळेविरोधात हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. शाळेचे मुख्याध्यापक विनीत भारद्वाज यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

ब्लिस इंडीफाय इंटरनॅशनल शाळा सप्टेंबर २०२२ पासून सुरु होती. या शाळेत पहिले ते आठवीपासूनचे वर्ग आहेत. शाळेत ११६ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. या प्रकारांमुळे पालकही संभ्रमात पडले आहे. सप्टेंबर २०२२ पासून शाळा सुरु असताना शिक्षण विभागाचे लक्ष कसे गेले नाही? हा प्रश्न पालकांना पडला आहे.

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.