पुण्यात 70 लाख कोरोना लसीकरणाचा टप्पा पार; अजित पवारांकडून कोव्हिड-19 च्या परिस्थितीसह उपाययोजनांचा आढावा

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 20, 2021 | 9:00 PM

पुणे जिल्ह्यात कोव्हिड-19 प्रतिबंधक लसीकरणाचा 70 लाखांचा टप्पा पार झाला आहे. ग्रामीण भागात धडक सर्वेक्षण मोहिमेंतर्गत 2 लाख 83 हजार 327 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे.

पुण्यात 70 लाख कोरोना लसीकरणाचा टप्पा पार; अजित पवारांकडून कोव्हिड-19 च्या परिस्थितीसह उपाययोजनांचा आढावा
ज्या मोदी सरकारच्या निर्णयाला अजित पवारांनी विरोध केला, आता त्यांच्यावरच 'सुधारणे'ची जबाबदारी

पुणे : जिल्ह्यात कोव्हिड-19 प्रतिबंधक लसीकरणाचा 70 लाखांचा टप्पा पार झाला आहे. ग्रामीण भागात धडक सर्वेक्षण मोहिमेंतर्गत 2 लाख 83 हजार 327 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. ग्रामीण कार्यक्षेत्रातील हॉटस्पॉट गावांमध्ये कोव्हिड-19 बाबत जनजागृती, शोध चाचणी उपचार, कोव्हिड केअर सेंटर, शासकीय योजना व कोव्हिड लसीकरण या पाच कृतीदलाच्या माध्यमातून कोव्हिडमुक्त गाव अभियानास सुरुवात करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकंमत्री अजित पवार यांनी आज दिली, तसेच टास्क फोर्सच्या मार्गदर्शनानुसारच शाळा सूरु करण्याबाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. (70 lakh corona vaccination completed in Pune; Review of measures including situation of Covid-19 by Ajit Pawar)

पुणे विधान भवनाच्या विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती व उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. अजित पवार यावेळी म्हणाले की, जिल्ह्यात मागील चार आठवड्यांमध्ये रुग्णसंख्या कमी होताना दिसून येत आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी प्रशासन तयारी करत असून नागरिकांनीही नियमांचे पालन करावे. पुणे मनपामध्ये 10, पिंपरी चिंचवडमध्ये 3, पुणे ग्रामीण मध्ये 12 ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित झाले आहेत. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने अपेक्षित ऑक्सिजनची गरज लक्षात घेता जिल्हा ऑक्सिजनबाबत स्वयंपूर्ण करण्यात येत आहे.

कोव्हिड लसीकरणाचा 70 लाखांचा टप्पा पार

जिल्ह्यात पहिल्या डोस आधी दुसऱ्या डोसला प्राधान्य देण्यात येत आहे. जिल्ह्यात लसीकरणाचा वेग समाधानकारक आहे. जवळपास कोव्हिड लसीकरणाचा 70 लाखांचा टप्पा पूर्ण केला आहे. जास्तीत जास्त लस उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न सूरु आहेत. खासगी रुग्णालय लसीकरणावरही शासनाचे नियंत्रण आहे. तसेच खासगी रुग्णालयाच्या वैद्यकीय देयकांचे लेखा परिक्षणही वेळोवेळी सुरु आहे. रुग्णसंख्या कमी होत असली तरी चाचण्यांचे प्रमाण कमी केलेले नाही.

हॉटस्पॉट गावांची संख्या कमी झाली

सुपर स्प्रेडर सर्वेक्षण नमुना तपासणीमध्ये एम.आय. डी. सी. कारखाने क्षेत्रातील कामगार व मजूर, बँक कर्मचारी तसेच सामाजिक पदाधिकारी व कार्यकर्ते यांची आरटीपीसीआर नमुना तपासणी करण्यात येत आहे. धडक सर्वेक्षण मोहिमेमुळे हॉटस्पॉट गावांची संख्या 109 वरुन 95 पर्यंत कमी झाली आहे. ग्रामीण भागातील हॉटस्पॉट गावांवरही विशेष लक्ष देण्यात येत आहे. शाळा सुरु करण्याबाबत टास्क फोर्सचे तज्ज्ञ जे मार्गदर्शन देतील त्यानुसारच निर्णय घेणार असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

नेते आणि अधिकाऱ्यांची उपस्थिती

यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, जि. प. अध्यक्षा निर्मला पानसरे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार सुप्रिया सुळे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार ॲड. अशोक पवार, आमदार सुनील शेळके, आमदार सुनिल टिंगरे, आमदार सिध्दार्थ शिरोळे, तसेच विभागीय आयुक्त सौरभ राव, यशदाचे महासंचालक एस. चोक्कलिंगम, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे आदिंसह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

इतर बातम्या

शुद्धीकरणसाठी ब्राह्मण लागतो, आम्हाला मागायला हवा होता. आमच्याकडे खूप आहेत; राणेंचा शिवसेनाला खोचक टोला

राज्यपाल म्हणाले, 12 सदस्यांच्या नियुक्तीसाठी सरकारचा आग्रह नाही; अजितदादा म्हणतात, मुख्यमंत्री आणि मी त्यांना पुन्हा भेटणार

पवार म्हणाले, जेवायचं निमंत्रण दिलं, पण हातपाय बांधले; राणे म्हणतात, परिपक्व राजकारणी आहात, हात सोडवून घ्या

(70 lakh corona vaccination completed in Pune; Review of measures including situation of Covid-19 by Ajit Pawar)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI