Pune crime : दुचाकीचा धक्का लागल्याचा जाब विचारला म्हणून भररस्त्यावर तरुणीचा विनयभंग; पुण्यातल्या चंदननगरात गुन्हा दाखल

फिर्यादी तरुणी ही खराडी परिसरातील एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीत संगणक अभियंता म्हणून नोकरीस आहे. शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास संबंधित तरुणी नेहमीप्रमाणे तिच्या सहकाऱ्यांसोबत चहा पिण्यासाठी कंपनीबाहेर आली होती. त्याचवेळी हा प्रकार घडला.

Pune crime : दुचाकीचा धक्का लागल्याचा जाब विचारला म्हणून भररस्त्यावर तरुणीचा विनयभंग; पुण्यातल्या चंदननगरात गुन्हा दाखल
फेसबुकवर फ्रेंड रिक्वेट स्वीकारली नाही, माथेफिरुने अल्पवयीन मुलीसह तिच्या आईला भोसकले
Image Credit source: tv9
प्रदीप गरड

|

Jun 19, 2022 | 11:14 AM

पुणे : भररस्त्यावर धक्का देऊन तरुणीचा विनयभंग झाल्याचा प्रकार पुण्यात घडला आहे. आपल्या सहकाऱ्यांसोबत चहा घेतल्यानंतर संबंधित तरुणी रस्ता ओलांडत होती. त्याचवेळी एका तरुणाने तिला धक्का दिला. एवढेच नाही, तर मारहाण (Beaten) करून तिचा विनयभंगदेखील केला आहे. तरुणीच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकण्याची धमकी या तरुणाने दिली आहे. त्यानंतर हा प्रकार उघड झाला. शुक्रवारी (दि. 17 जून) संध्याकाळी सहादरम्यान खराडी (Kharadi) परिसरात हा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे. चंदननगर पोलिसांनी ही कारवाई केली. रोहित शरद माने (वय 27, रा. शास्त्रीनगर, येरवडा) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. रोहितसह त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध विनयभंग, धमकाविणे, मारहाण केल्याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandan nagar police) गुन्हा दाखल झाला आहे.

खराडातील घटना

वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी ही खराडी परिसरातील एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीत संगणक अभियंता म्हणून नोकरीस आहे. शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास संबंधित तरुणी नेहमीप्रमाणे तिच्या सहकाऱ्यांसोबत चहा पिण्यासाठी कंपनीबाहेर आली होती. चहा प्यायल्यानंतर तरुणी सहकाऱ्यांसोबत रस्ता ओलांडत होती. त्याचवेळी रोहित माने हा तरूण त्याच्या साथीदारांसोबत दुचाकीवरून तेथून जात होता. यावेळी मानेच्या दुचाकीचा तरुणीला धक्का लागला. त्याबाबत तरुणीने मानेला जाब विचारला.

हे सुद्धा वाचा

दहा मिनिटांमध्येच आरोपीला अटक

या प्रकारानंतर मानेने या तरुणीला भररस्त्यातच हात पकडून मारहाण करायला सुरुवात केली. विनयभंग करून संबंधित तरुणीला ढकलून दिले. एवढ्यावरच न थांबता चेहऱ्यावर अॅसिड टाकण्याची धमकीही दिली. या घटनेनंतर तरुणीने थेट पोलीस ठाणे गाठले. पोलिसांकडे फिर्याद देण्यात आली. पोलिसांनी दहा मिनीटांमध्येच रोहित मानेला अटक केली. त्याच्यासोबतच्या दोन अल्पवयीन साथीदारांनाही ताब्यात घेतले. दरम्यान, भररस्त्यात घडलेल्या या प्रकारामुळे वाहतुकीची कोंडी काही काळ झाली होती.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें