पुण्यातील गरीब मुलांच्या स्वप्नांना बळ देणाऱ्या तरुणीचा अपघात, कोमात गेलेल्या धनश्रीच्या मदतीसाठी अनेकांचं आवाहन

प्रशासकीय सेवेचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या मुळच्या कराडच्या धनश्री कुंभार हिचा पुण्यातील शिवणे परिसरात गंभीर अपघात झाला.

पुण्यातील गरीब मुलांच्या स्वप्नांना बळ देणाऱ्या तरुणीचा अपघात, कोमात गेलेल्या धनश्रीच्या मदतीसाठी अनेकांचं आवाहन

पुणे : प्रशासकीय सेवेचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या मुळच्या कराडच्या धनश्री कुंभार हिचा पुण्यातील शिवणे परिसरात गंभीर अपघात झाला. एका भरधाव रिक्षाने धडक दिल्याने डोक्याला मार लागून 27 वर्षीय धनश्री थेट कोमात गेली. त्यामुळे तिच्या कुटुंबाकडून तिच्यावर उपचारासाठी शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत. ते एकिकडे आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने उपचारासाठी मदत गोळा करत आहेत, तर दुसरीकडे धनश्रीला गंभीर दुखापत करणाऱ्या रिक्षाचालकावर कारवाईचीही मागणी करत आहेत. तब्बल 11 दिवस उलटूनही आरोपी रिक्षाचालकाला अटक न झाल्याने पोलिसांवरही टीका होत आहे (Accident of teacher of UPSC aspirant Dhanashri Kumbhar in Pune appeal of financial help).

धनश्रीला रिक्षाचालकाने इतकी जोराची धडक दिली की ती जाग्यावरच बेशुद्ध झाली. याच अवस्थेत स्थानिकांनी धनश्रीला स्थानिक दवाखान्यात दाखल केले. यानंतर सध्या तिच्यावर नवले रुग्णालयात दाखल करण्यात आले. आतापर्यंत तिच्या उपचारावर 2 लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च झालाय. तिच्या उपचारासाठी जवळपास 15 लाख रुपये खर्च येण्याची शक्यता आहे. डॉक्टरांनी धनश्रीच्या प्रकृतीत सुधारणा होण्यास वेळ लागणार असल्याचं सांगितलंय. सध्या ती केवळ आपल्या हाताची बोटांची हालचाल करत आहे. त्यामुळे ती कोमातून बाहेर येऊपर्यंत तिच्यावरील उपचाराचा खर्च हे मोठं आव्हान असल्याची भावना तिच्या नातेवाईकांनी व्यक्त केलीय.

कोण आहे धनश्री?

धनश्री कुंभार मुळची सातारा जिल्ह्यातील कराड येथील रहिवासी आहे. ती शिक्षणासाठी पुण्यात आली. तिने पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात उच्च शिक्षण घेतलं. धनश्रीने पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पत्रकारितेचंही शिक्षण घेतलं होतं.

तिला स्पर्धा परीक्षेतून अधिकारी व्हायचं होतं. यासाठी ती पुण्यातील शिवणे-उत्तमनगर येथे राहत होती. विशेष म्हणजे ती स्वतः स्पर्धा परीक्षेची तयार करत असताना असंच स्वप्न उराशी बाळगणाऱ्या अनेक गरीब विद्यार्थ्यांनाही मदत करत होती. त्यांच्या अडचणींसाठी नेहमी लढत होती आणि या गरीब मुलांना मोफत शिकवतही होती.

सामाजिक संवेदना जाग्या असलेल्या धनश्रीने अनेक सामाजिक लढ्यांमध्ये देखील सहभाग नोंदवला आहे. धनश्रीने स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे पुणे शहर सचिव म्हणूनही काम केलं आहे. तसेच ‘राईट टू लव’ मोहिमेत समन्वयक म्हणूनही काम केलंय. सध्या ती राज्य सेवेचा अभ्यास करत होती.

धनश्रीच्या उपचारासाठी आर्थिक मदतीचं आवाहन

धनश्रीच्या कुटुंबाची उपचारासाठी 15 लाख इतकी मोठी रक्कम खर्च करण्याची परिस्थिती नसल्याने त्यांनी मदतीचं आवाहन केलंय. विशेष म्हणजे धनश्रीच्या मदतीला सामाजिक क्षेत्रातील अनेक लोक पुढे आलेत. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना धनश्रीला शक्य ती आर्थिक मदत करण्याचं आवाहन केलंय.

धनश्रीने तिचा अभ्यास सांभाळून जमेल तशी समाजाची आणि गोरगरीब मुलांच्या शिक्षणासाठी मदत केली. आता समाजाने तिला मदत करण्याची गरज आहे, अशीही भावना व्यक्त केली जातेय.

मदत कशी कराल?

गुगल पे नंबर : 9922778408 (सुनिल कुंभार – धनश्रीचे वडील)

बँक खाते तपशील

Sunil Anant Kumbhar
Bank of India Brand
Warje Malwadi (Pune)
SAVING ACCOUNT NO.
053310110008792
IFSC : BKID0000533

मिलाप या संस्थेच्या माध्यमातूनही मदत करु शकता

https://milaap.org/fundraisers/support-dhanashri-kumbhar-1

हेही वाचा :

वर्ध्यात भरधाव टिप्परला आग, उडी घेतल्याने चालक बचावला, टिप्पर जळून खाक

VIDEO: बीचवर गाडी पार्क करण्याची चूक नडली; भरतीनंतर स्कॉर्पिओ भाईंदरच्या समुद्रात

कोलकातामध्ये रेल्वेच्या इमारतीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांसह 9 जणांचा होरपळून मृत्यू

व्हिडीओ पाहा :

Accident of teacher of UPSC aspirant Dhanashri Kumbhar in Pune appeal of financial help

Published On - 4:41 pm, Sat, 13 March 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI