Pune Crime | भ्रष्टाचार, लाचखोरीनंतर आता ‘या’ गंभीर गुन्ह्यांमुळे पोलीसदल बदनाम ; तीन वर्षात पोलिसांवरील गंभीर गुन्ह्यांची आकडेवारी आलीसमोर

पोलिसांच्या विरुद्ध दाखल गुन्ह्यात 63 जणांना अटक देखील करण्यात आली आहे. सर्व गुन्हे न्यायालयात प्रलंबित आहेत. कायदा व सुव्यवस्था निर्माण करण्याची सर्व जबाबदारी असणाऱ्या पोलीस दलाची गुन्हगार अशी निर्माण होणारी प्रतिमा निश्चितच हानीकारक आहे.

Pune Crime | भ्रष्टाचार, लाचखोरीनंतर आता 'या' गंभीर गुन्ह्यांमुळे पोलीसदल बदनाम ; तीन वर्षात पोलिसांवरील गंभीर गुन्ह्यांची आकडेवारी आलीसमोर
Police
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: प्राजक्ता ढेकळे

Feb 01, 2022 | 5:32 PM

प्राजक्ता ढेकळे , पुणे – भ्रष्टाचार, लाचखोरपणा(Bribery), दमदाटीचे वागणे या सगळयामुळे आधीच बदनाम झालेले पोलीसदल (police)आता गंभीर गुन्ह्यांमुळे(crime)  त्या बदनामीला आणखीनच भर पडली आहे. सर्व सामान्यांचे रक्षणकर्ते पोलीस दलाकडे पाहिले जाते. याच पोलीस दलातील काम करणाऱ्या पोलीस दलातील कर्मचाऱ्यांमुळे पोलीस दलाची मान शरमेने खाली गेली आहे. मागील काही दिवसांपूर्वी शहरातील पूर्ववैमनस्यातून शहर पोलिस दलातील एका कर्मचार्‍याने दुसर्‍या कर्मचार्‍याच्या खुनाची सराईत गुन्हेगाराला सुपारी दिल्याचे प्रकरण असो की 50 लाखांच्या खंडणी प्रकरणातील मुख्यालयातील कर्मचार्‍याची अटक किंवा पोलिस अधिकार्‍याने महिला पोलिस अधिकार्‍यावर लग्नाच्या आमिषाने लैंगिक अत्याचार, अनैसर्गिक कृत्य करून केलेला खुनाचा प्रयत्न, या गंभीर घटना घडलेल्या आहेत. गततीन वर्षात 63 जणांवर गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत.

भ्रष्टाचाराचे ग्रहण सुटेना पोलीस दलात दिवसेंदिवस लाचखोरीचे प्रमाण वाढले आहे. तीन वर्षांत पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर दाखल झालेल्या 34 गुन्ह्यांमध्ये 12 लाचखोरीचे गुन्हे आहेत. आर्थिक प्रलोभनाला बळी पडून पोलिस लाचलुचपत विभागाच्या सापळ्यात अडकत आहेत. पोलिसांच्या विरुद्ध दाखल गुन्ह्यात 63 जणांना अटक देखील करण्यात आली आहे. सर्व गुन्हे न्यायालयात प्रलंबित आहेत. कायदा व सुव्यवस्था निर्माण करण्याची सर्व जबाबदारी असणाऱ्या पोलीस दलाची गुन्हगार अशी निर्माण होणारी प्रतिमा निश्चितच हानीकारक आहे.

पुण्यात आतापर्यंत व्याजाने घेतलेल्या पैशासाठी एकाचे अपहरण खंडणी मागितल्याची गुन्हा पोलिस कर्मचाऱ्याने केला होता. फरासखान पोलीस स्टेशनमधील कर्मचाऱ्याने दत्तवाडीतील कर्मचाऱ्याच्या हत्येची सुपारी एकासराईत गुंडाला दिली होती . त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून एका पोलिस कॉन्स्टेबलने महिला वकिलाशी शरीर संबंध ठेवून तिच्यावर अत्याचारकेल्याची घटनाही घडली होती. खंडणीसाठी डॉकटरला मारहाण केली होती. विवाहित असूनही पोलीस उपनिरीक्षकाने तरुणीला लग्नाचेआमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला होते. हे सर्व गुन्हे 2019 ते 2021  या कालावधीत घडले आहेत.

साल 2019 गुन्हे 10  , अटक 26

साल 2020 गुन्हे 10 , अटक 15  

साल 2021  गुन्हे 13 , अटक 22

मोठी बातमी | औरंगाबादेत अब्दुल सत्तारांचा रावसाहेब दानवेंना आणखी एक झटका, सोयगावात भाजपचे 4 नगरसेवक शिवसेनेत

Raju Patil : प्रभाग रचना तर आधीच फोडली आहे, शिवसेनेचे उमेदवारही ठरलेले; मनसे आमदार राजू पाटील यांची प्रतिक्रिया सोलापूर दूध संघाच्या निवडणुकीत दिग्गज नेत्यांना धक्का; माजी अध्यक्षासह 26 जणांचे उमेदवारी अर्ज बाद

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें