Pune | पुण्यात कोरोनाच्या संसर्गातून वाचल्यानंतर नागरिकांना जाणवतायत ‘या’ समस्या

कोरोनाच्या दुसऱ्या व तिसऱ्या लाटेटनंतर बाधित लोकांमध्ये रोग प्रतिकार शक्ती मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. यामुळे अनेक रुग्णांना पोस्ट कोविड सांधेदुखी , हृदयाच्या समस्या, रक्‍ताच्या गुठळ्या होणे आणि श्‍वसनाच्या समस्येचा जाणवत आहेत. रुग्ण सांधेदुखी , स्नायू दुखी , मायल्जिया, अत्यंत थकवा, संधिवात  तक्रार करत असल्याचे डॉक्‍टरांच्या निरक्षणात आले आहे.

Pune | पुण्यात कोरोनाच्या संसर्गातून वाचल्यानंतर नागरिकांना जाणवतायत 'या'  समस्या
ठाणे ग्रामीण कोरोनामुक्त
Follow us
| Updated on: Feb 18, 2022 | 1:31 PM

पुणे – शहरातील कोरोनाची(corona ) तिसरी लाट ओसरल्यात जमा आहे. कोरोनाच्या रुग्णाची संख्याही आटोक्यात आली आहे. मात्र कोरोनाच्या संसर्गातून बरे झाल्यानंतर रुग्णांमध्ये अशक्तपणा जाणवत आहे. या रुग्णांमधील रोगप्रतिकार शक्ती (Immunity) कमी झाल्याने अनेक रुग्णांना विविध आजारांचा सामना करावा लागत असलयाचे समोर आले आहे. इतकंच नव्हे वेगवेगळ्या व्याधींचा त्रास वाढत असल्याचे समोर आले आहे. यामध्ये प्रामुख्याने नागीण या रोगाची(Herpes labialis)  लक्षणे जाणवत असल्याचे समोर आले आहे. त्वचेवर पुरळ येणे, लालसरपणा येणे, डोळ्यांभोवती तसेच नाक, ओठ यासारख्या भागात त्वचारोग दिसून येणे यासारख्या तक्रारी वाढल्या आहेत. हे संक्रमण ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिलांमध्ये आढळून येते. ज्या रूग्णांना पूर्व इतिहास आहे, अशा रूग्णांमध्ये नागीण आणि त्वचेच्या इतर गुंतागुंत निर्माण होत आहेत. पुरळ उठणे, त्वचेचा लालसरपणा आणि ठिपके उठणे यासारख्या कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. तातडीने डॉक्टारांना दाखवा असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

आरोग्याच्या ‘या’ तक्रारी वाढल्या

कोरोनाच्या दुसऱ्या व तिसऱ्या लाटेटनंतर बाधित लोकांमध्ये रोग प्रतिकार शक्ती मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. यामुळे अनेक रुग्णांना पोस्ट कोविड सांधेदुखी , हृदयाच्या समस्या, रक्‍ताच्या गुठळ्या होणे आणि श्‍वसनाच्या समस्येचा जाणवत आहेत. रुग्ण सांधेदुखी , स्नायू दुखी , मायल्जिया, अत्यंत थकवा, संधिवात  तक्रार करत असल्याचे डॉक्‍टरांच्या निरक्षणात आले आहे. हर्पीज लाबियालिस (नागीण) हा रोग ओठाच्या ठिकाणी होऊ शकतो, त्यामुळे चट्टे पडून आग होते. हर्पीज झोस्टर यात नागिणीचा व्हॅरिसेला झोस्टर विषाणू पुन्हा डोकेवर काढतो. त्यामुळेही चट्टे उमटतात शिवाय वेदनाही होतात. एचएसव्ही नागीण प्रकारापेक्षा हर्पीज झोस्टर हा नागिणीचा प्रकार करोनानंतर जास्त बघायला मिळाला आहे.

अशी घ्या काळजी

कोरोनानंतर तसेच प्रतिबंधक लस घेतल्यानंतरही रुग्णांना नागिन होत असल्याच्या तक्रारी आहेत. यामध्ये प्रतिकारशक्‍ती कमी झाल्याने रुग्णाच्या शरीरातील सुप्तावस्थेत असलेले नागिणीचे विषाणू पुन्हा सक्रिय होतात. त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून नागिणीची लस घेणे हा पर्याय उपलब्ध आहे. कोरोनावर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या स्टिरॉइड आणि अँटीव्हायरल औषधांचा परिणामामुळं संधीवातासारख्या समस्या जाणवत आहेत. नागरिकांनी या समस्या जाणवल्यानंतर तातडीने वैद्यकीय तज्ज्ञांना दाखवावे.

ही वधू नव्हे..! मग आहे तरी कोण? ‘ही’ बातमी सविस्तर वाचा आणि Viral झालेला ‘हा’ Video पाहा…

Nagpur Crime | आई रागावली म्हणून घेतले विष, पंधरा वर्षीय विद्यार्थिनीने संपविले जीवन, नेमकं काय घडलं?

VIDEO: संजय राऊत म्हणाले, सोमय्या वेडा झालाय; किरीट सोमय्या म्हणतात, होय, मी…

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.