Pune Corona Update : महापालिका अलर्टवर, सोमवारी महत्वाची बैठक; निर्बंध आणि शाळांबाबत निर्णयाची शक्यता

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सोमवारी, 3 जानेवारी रोजी महापालिका आयुक्त आणि आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध आणि अन्य महत्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Pune Corona Update : महापालिका अलर्टवर, सोमवारी महत्वाची बैठक; निर्बंध आणि शाळांबाबत निर्णयाची शक्यता
पुणे महापालिका
Follow us
| Updated on: Jan 01, 2022 | 8:33 PM

पुणे : राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या (Corona Outbreak) मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पुण्यातही कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. पुण्यात आज 399 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे माहापालिका (Pune Municipal Corporation) अलर्ट झाली आहे. महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी सोमवारी, 3 जानेवारी रोजी महापालिका आयुक्त आणि आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध आणि अन्य महत्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महापौरांनी बोलावलेल्या बैठकीत पुणे शहरात कोरोना निर्बंधांमध्ये वाढ करावी का? तसंच शाळा पुन्हा एकदा ऑनलाईन पद्धतीने कराव्यात का? याबाबत चर्चा होणार असल्याची माहिती मिळतेय. दुसरीकडे 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांच्या लसीकरणाची तयारीही करण्यात आली आहे. पुणे शहरात 40 ठिकाणी लसीकरण होणार आहे. त्यासाठी जवळपास अडीच लाख पात्र विद्यार्थ्यांचं लसीकरण होणार असल्याची माहिती मिळतेय.

पुण्यात दिवसभरात 399 नवे कोरोना रुग्ण

पुण्यात आज दिवसभरात 399 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 127 कोरोना रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. आज पुणे शहरात एक तर शहराबाहेर एक अशा दोन कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेनं दिली आहे. पुण्यात 2 हजार 70 सक्रीय रुग्ण आहेत. त्यातील 92 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळतंय.

इतर बातम्या :

Breaking : पंकजा मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण! मुंबईतील निवासस्थानी क्वारंटाईन

Mumbai corona update : आज मुंबईत तब्बल 6 हजार 347 नवे कोरोना रुग्ण, संकट अधिक गडद

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.