AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Breaking : पंकजा मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण! मुंबईतील निवासस्थानी क्वारंटाईन

भाजप नेते आणि राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. पंकजा मुंडे या दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत. दरम्यान, त्यांची प्रकृती चांगली आहे. त्या सध्या मुंबईतील निवासस्थानी क्वारंटाईन आहेत.

Breaking : पंकजा मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण! मुंबईतील निवासस्थानी क्वारंटाईन
पंकजा मुंडे, भाजप नेत्या.
| Edited By: | Updated on: Jan 01, 2022 | 9:51 PM
Share

मुंबई : राज्यात कोरोनाचा फैलाव (Corona Outbreak) पुन्हा एकदा वेगानं सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. त्यातच नेतेमंडळीही मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह येत आहेत. आता भाजप नेते आणि राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. पंकजा मुंडे या दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) आल्या आहेत. दरम्यान, त्यांची प्रकृती चांगली आहे. त्या सध्या मुंबईतील निवासस्थानी क्वारंटाईन आहेत. त्यामुळे काळजीचं कारण नसल्याचं मुंडे यांच्याकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, चार दिवसांपूर्वीच पंकजा मुंडे या परभणीच्या जिंतूर तालुक्यातील धमधम इथं एका कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. भगवानबाबा यांच्या मंदिराचा कलशारोहणासाठी त्या हेलिकॉप्टरने धमधममध्ये पोहोचल्या होत्या. या कार्यक्रमात भाषण केल्यानंतर त्यांनी जोरात भूक लागल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच आपण कुठल्या बंद खोलीत जेवणार नसल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर उपस्थित लोकांसोबतच त्यांना स्टेजवर जेवण वाढण्यात आलं होतं. त्यानंतर चार दिवसांनी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानं आता चिंता वाढली आहे.

पंकजा मुंडे एप्रिल 2021 मध्ये पहिल्यांना कोरोना पॉझिटिव्ह

यापूर्वी एप्रिल 2021 मध्ये पंकजा मुंडे या कोरोना पॉझिटिव्ह आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी आपली प्रकृती चांगली असून घरीच उपचार सुरु असल्याची माहिती दिली होती. माझ्या कोरोनाचा चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी आधीच सावधगिरी बाळगून स्वत:ला विलग केलं होतं. मी गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या बऱ्याच कुटुंबियांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. त्याच वेळी कदाचित मला कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असेल. त्यामुळे या काळात जे कोणी माझ्या संपर्कात आले आहेत. त्यांनी स्वत:ची कोरोना चाचणी करुन घ्यावी. तसेच काळजी घ्या, असं ट्वीट त्यांनी त्यावेळी केलं होतं.

10 मंत्री, 20 आमदार कोरोना पॉझिटिव्ह

वाढत्या कोरोना रुग्णसंख्येचा विचार करता अधिक कठोर निर्बंध लावण्यात येतील, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत. कोरोना विषाणू संसर्गाच्या रुग्णांच्या वाढीच्या प्रमाणाचा अंदाज घेऊन नियम लागू करण्याबाबत विचार केला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. धक्कादायक बाब म्हणजे हिवाळी अधिवेशनानंतर पाच दिवसांत 10 मंत्री आणि 20 पेक्षा जास्त आमदार पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे काळजी घेणं गरजेचं आहे, असं आवाहनही अजितदादांनी केलंय.

कोण-कोणत्या नेत्यांना कोरोनाची लागण?

बाळासाहेब थोरात, महसूल मंत्री

वर्षा गायकवाड, शालेय शिक्षणमंत्री

सुप्रिया सुळे, खासदार

के.सी. पाडवी, आदिवासी विकास मंत्री

यशोमती ठाकूर , महिला व बालकल्याण मंत्री

प्राजक्त तनपुरे, ऊर्जा राज्यमंत्री

राधाकृष्ण विखे पाटील, भाजप नेते

हर्षवर्धन पाटील, भाजप नेते

डॉ. दीपक सावंत, माजी आरोग्यमंत्री, शिवसेना नेते

समीर मेघे, भाजप आमदार

इतर बातम्या :

साडे दहा हजार एसटी कर्मचाऱ्यांचे परतीचे दोर तुटले?, आगार प्रमुखांकडून रुजू करुन घेण्यास नकार!

कामगार क्षेत्रात सुधारणेचे वारे; कायदे संहिता ते सामाजिक निधी, 38 कोटी श्रमिकांच्या भवितव्याचा निर्णय

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.