Mumbai corona update : आज मुंबईत तब्बल 6 हजार 347 नवे कोरोना रुग्ण, संकट अधिक गडद

आज मुंबईत (Mumbai) तब्बल 6 हजार 347 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर एका रुग्णाचा मृत्यूही झाला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस मुंबईवरील कोरोनचे संकट अधिकच गडद होत चालले आहे. कालही मुंबईत साडे पाच हजार रुग्ण आढळून आले होते, त्यामुळे मुंबईतील अॅक्टिव्ह रुग्णांची आकडेवारी वाढत चालली आहे.

Mumbai corona update : आज मुंबईत तब्बल 6 हजार 347 नवे कोरोना रुग्ण, संकट अधिक गडद
मुंबई कोरोना अपडेट
मंजिरी धर्माधिकारी

| Edited By: दादासाहेब कारंडे

Jan 01, 2022 | 6:49 PM

मुंबई : आज मुंबईत (Mumbai) तब्बल 6 हजार 347 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर एका रुग्णाचा मृत्यूही झाला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस मुंबईवरील कोरोनचे संकट अधिकच गडद होत चालले आहे. कालही मुंबईत साडे पाच हजार रुग्ण आढळून आले होते, त्यामुळे मुंबईतील सक्रिय रुग्णांची आकडेवारी वाढत चालली आहे. मुंबईतल्या (Mumbai Corona Update) रुग्णसंख्येचा अभ्यास केला असता बहुतांश रुग्ण हे उच्चभ्रू इमारती आणि वस्तीमधील असल्याचं समोर आलंय. आरोग्य विभागकडून ही माहिती देण्यात आलीय. ए विभागातील कुलाबा-फोर्ट, डी विभागातील ग्रॅण्ट रोड-गिरगाव परिसर, अंधेरी पूर्व पश्चिम. आणि वांद्रे पूर्व पश्चिम भागातील रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर असल्याचं समोर आलंय.

महापालिकेकडून काळजी घेण्याचं आवाहन

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर मुंबईतील रुग्णसंख्या 100 पर्यंत खाली आली होती. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढू लागलीय. मुंबईतील रुग्णसंख्येनं 6 हजारांचा टप्पा देखील पार केलाय. मुंबईतल्या उच्चभ्रू वस्ती आणि इमारतीमधील रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. परदेशातून केलेला प्रवास, बैठका आणि सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहिल्यानं कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याच समोर आलं आहे.

मुंबईतील गेल्या काही दिवसातील रुग्णसंख्या

1  जानेवारी -6347 (आज)

31 डिसेंबर – 5428
30 डिसेंबर – 3671
29 डिसेंबर – 2510
28 डिसेंबर – 1377
27 डिसेंबर – 809
26 डिसेंबर – 922
25 डिसेंबर – 757
24 डिसेंबर – 683
23 डिसेंबर – 602
22 डिसेंबर – 490
21 डिसेंबर – 327

लॉकडाऊनबद्दल आरोग्यमंत्री काय म्हणाले?

लॉकडाऊनचा विषय अजूनतरी नाहीच. निर्बंध वाढवले पाहिजे, यावर विचार सुरु आहे, असं राजेश टोपे यांनी सांगितलंय. त्याचप्रमाणे लॉकडाऊनची भाषा आम्ही तेव्हाच केली, जेव्हा 700 मेट्रिक टन इतकं ऑक्सिजन कन्झ्मशन सुरु आहे. त्यामुळे इतक्या प्रचंड प्रमाणात पुन्हा ऑक्सिजन कन्झमशन सुरु झालं, तर ऑटोमॅटिक लॉकडाऊन लागेल. तशा परिस्थिती लॉकडाऊन ऑटोमोडवर असेल, असंदेखील राजेश टोपे यांनी म्हटलंय.

Ration grain | रेशनच धान्य गरिबांना कमी, बाजारात जास्त; नागपुरात नेमकं चाललंय काय?

बॉबी देओलसोबत ‘आश्रम’मध्ये दिसणाऱ्या सुपर हॉट ईशाने प्रियकरासोबतचे Liplock चे फोटो केले पोस्ट

Stampede | वैष्णवदेवी मंदिराप्रमाणेच या 7 मंदिरात झाली होती चेंगराचेंगरी, ज्यात महाराष्ट्रातीलही 1 मंदिर!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें