AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Baramati Result : अजित पवारांनी बदला घेतला, बारामतीत मोठा उलटफेर, महाराष्ट्राचा निकाल काय?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपने अपेक्षेपेक्षा जास्त जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीचा बहुतेक जागांवर पराभव होताना दिसतोय. बारामती मतदारसंघात अजित पवार यांचा विजय जवळपास निश्चित आहे. युगेंद्र पवार मोठ्या मतांनी पराभूत होताना दिसत आहेत.

Baramati Result : अजित पवारांनी बदला घेतला, बारामतीत मोठा उलटफेर, महाराष्ट्राचा निकाल काय?
बारामती निकाल
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Nov 23, 2024 | 2:04 PM
Share

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल आज समोर येतोय. या निवडणुकीत मोठा उलटफेर झालेला बघायला मिळतोय. एक्झिट पोलच्या आकडेवारीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात सरकार स्थापनेत काँटे की टक्कर होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत होता. पण महायुतीने सर्व अंदाजांना फोल ठरवत निवडणुकीत क्लीप स्वीप मिळवली आहे. विशेष म्हणजे बारामतीच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष होतं. बारामतीत काय होईल? याकडे सर्वांचं लक्ष होतं. अखेर बारामतीचा निकाल जवळपास स्पष्ट झाला आहे. अजित पवार विजयाच्या दिशेला मार्गक्रमण करत आहेत.

मतमोजणीच्या आतापर्यंत 20 पैकी 12 फैऱ्या पूर्ण झाल्या आहेत. यामध्ये अजित पवार यांनी तब्बल 60,636 मतांनी आघाडी घेतली आहे. अजित पवार यांना आतापर्यंत बाराव्या फेरीच्या अखेरपर्यंत 1 लाख 9 हजार 848 मते मिळाली आहे. तर शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार यांना केवळ 49 हजार 212 मतांवर समाधान मानावं लागलं आहे.

लोकसभेचा वचपा काढला

बारामतीत अजित पवारांनी लोकसभा निवडणुकीचा वचपा काढला आहे. लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी निवडणूक लढवली होती. त्यांच्या विरोधात शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचा विजय झाला होता. त्यामुळे अजित पवारांना मोठा फटका बसला होता. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत शरद पवारांनी बारामतीत नातू युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली होती. शरद पवारांनी आपली पूर्ण ताकद युगेंद्र पवार यांच्या बाजूने लावली होती. तर दुसरीकडे अजित पवार यांनी देखील बारामतीत प्रचारासाठी ठाण मांडलं होतं. अखेर या प्रतिष्ठेच्या लढतीत अजित पवार यांचा विजय झाला आहे.

महाराष्ट्राचा निकाल काय?

महाराष्ट्र विधानसभेचा पूर्ण निकाल अद्याप स्पष्ट झालेला नाही. पण आतापर्यंत समोर आलेल्या कौलनुसार, महायुतीचे उमेदवार तब्बल 220 जागांवर आघाडीवर आहेत. तर महाविकास आघाडीला केवळ 52 जागांवर विजय मिळताना दिसतोय. तर इतर अपक्षांना 18 जागांवर यश मिळताना दिसतोय. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांचा पराभव झाला आहे.

Follow Us
हे जैनांचं नाही, आगरी-कोळी, मराठी बांधवांचं शहर; मनसेचा कोणाला टोला?
MNS On Narendra Mehata : मीरा-भाईंदरच्या ओळखीवरून राजकीय रणकंदन! हे जैनांचं नाही, आगरी-कोळी आणि मराठी बांधवांचं शहर; मनसेचा नेमका कोणाला टोला?
मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने...
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने खळबळ; संजय राऊतांनी थेट...
ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग
LPG Price : ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग; ऑक्टोबरमधील हे मोठे बदल जाणून घ्या
मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी
Mumbai Toll Tax : मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी टोल महागले....
ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि...
Raj Thackeray : Uddhav Thackeray : ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि संविधान.....
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड