मंचर उपजिल्हा रुग्णालयात 200 खाटांची व्यवस्था केली जाणार, उपमुख्यमंत्र्यांकडून तत्वत: मान्यता

मंचर उपजिल्हा रुग्णालयाचे 100 खाटांवरुन 200 खाटांच्या श्रेणीवर्धन करण्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज तत्वत: मान्यता दिली.

मंचर उपजिल्हा रुग्णालयात 200 खाटांची व्यवस्था केली जाणार, उपमुख्यमंत्र्यांकडून तत्वत: मान्यता
अजित पवार, उपमुख्यमंत्री

मुंबई : पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर या आदिवासीबहुल तालुक्यांसाठी मध्यवर्ती असणाऱ्या मंचर उपजिल्हा रुग्णालयाचे 100 खाटांवरुन 200 खाटांच्या श्रेणीवर्धन करण्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज तत्वत: मान्यता दिली. (Ajit Pawar approves in-principle upgrading of 200 beds in Manchar Sub-District Hospital)

पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या खाटांच्या श्रेणीवर्धनाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ही बैठक मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती सभागृहात पार पडली.

यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास उपस्थित होते.

पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर तालुके हे आदिवासी बहुल आणि दुर्गम तालुके आहेत. या तिन्ही तालुक्यातून पुणे जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण दूर आहे. याचा विचार करुन या तिन्ही तालुक्यांसाठी मध्यवर्ती ठिकाण असणाऱ्या मंचर, (ता. आंबेगाव) येथील उपजिल्हा रुग्णालयाचे शंभर खाटांवरून दोनशे खाटांचे श्रेणीवर्धन करण्याच्या प्रस्तावाला आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तत्वत: मान्यता दिली. या उपजिल्हा रुग्णालयातील खाटांची संख्या वाढल्याने आदिवासी बांधवांसह या भागातील सामान्य जनतेची मोठी सोय होणार आहे. (Ajit Pawar approves in-principle upgrading of 200 beds in Manchar Sub-District Hospital)

पिंपरी चिंचवडमध्ये कोरोना निर्बंध शिथील

पिंपरी चिंचवड शहरातील (Pimpri Chinchwad) कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे शहरातील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे शहरातील जनजीवन पुन्हा पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. तर पिंपरी चिंचवड शहरातही 30 ते 44 वर्ष वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला सुरळीत सुरुवात झाली आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. नव्या नियमानुसार शहरात आता सर्व दुकाने सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. तर हॉटेल्स आणि बार रात्री 10 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. त्यामुळे शहरातील जनजीवन पुन्हा पूर्वपदावर येत आहे.

30 ते 44 वर्ष वयोगटातील लसीकरणाला सुरुवात

दुसरीकडे, पिंपरी चिंचवड शहरातही 30 ते 44 वर्ष वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. शहरातील 36 केंद्रांवर लसीकरण होत आहे. प्रत्येक केंद्रावर 200 डोस उपलब्ध असणार आहेत. पिंपरी चिंचवड शहरात गेले काही दिवस लसीकरणामध्ये मोठा गोंधळ होत होता, मात्र ॲपवर नोंदणी असल्यामुळे लसीकरण केंद्रावर ज्यांची नावे आहेत, तेच नागरिक येत आहेत. त्यामुळे लसीकरण सुरळीत असल्याचं चित्र चिंचवडमध्ये पाहायला मिळालं.

इतर बातम्या

शिवतारे 27 वर्षांपासून अलिप्त, एकीशी विवाहबद्ध, दुसरीसोबत पवईला राहतात, लेकीच्या आरोपांना आई मंदाकिनींचे उत्तर

संपत्तीसाठी भावांकडून वडील विजय शिवतारेंचा मानसिक छळ, कन्या ममता शिवदीप लांडेंच्या आरोपांनी खळबळ

(Ajit Pawar approves in-principle upgrading of 200 beds in Manchar Sub-District Hospital)