AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंदापुरात अजितदादा म्हणाले, तर समोरच्याचं डिपॉजिट जप्त झालं असतं !

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी इंदापुरात जोरदार राजकीय फटकेबाजी केली.

इंदापुरात अजितदादा म्हणाले, तर समोरच्याचं डिपॉजिट जप्त झालं असतं !
| Updated on: Feb 06, 2021 | 3:54 PM
Share

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी इंदापुरात जोरदार राजकीय फटकेबाजी केली. इंदापूरमधील सभेसाठी आल्यावर अजित पवार यांनी समोर उपस्थित लोकांची मोठी गर्दी पाहून चांगलेच चिमटे काढले. “इथं हजर असणाऱ्यांनी मागील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांना पाठिंबा दिला असता, मतदान केलं असतं तर त्या निवडणुकीत विरोधी उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झालं असतं, असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं. दत्तात्रय भरणे यांचा विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्याकडून अवघ्या 3100 मतांनी पराभव झाला होता. हाच पराभव अजित पवार यांच्या जिव्हारी लागल्याचं यातून दिसून आलं (Ajit Pawar comment on Dattatray Bharane Assembly election defeat by Harshawardhan Patil).

अजित पवार म्हणाले, “कोरोनाच्या संकटामुळे विकासकामे करण्यावर अनेक मर्यादा येत आहेत. हळूहळू सर्व परिस्थिती रुळावर येईल. त्यानंतर कामांचा झपाटा सुरु होईल. आता इंदापूर नगरपालिका निवडणूक येतेय. तुम्ही त्यांना संधी देवून पाहिलं. आता आम्हाला संधी द्या. इंदापूरचा चेहरामोहरा बदलून नाही दाखवलं, तर अजित पवार नाव सांगणार नाही. आता कुणी गाफील राहू नका. कोणी चुकीचं सांगत असेल तर त्याचं रेकॉर्डींग मला पाठवा. मग मी बघतो. आता आम्हाला साथ द्या. आम्ही इंदापूरचा चेहरामोहरा बदलून दाखवू. बारामतीकर आम्हाला का निवडून देतात? कारण त्यांनी आमचं काम पाहिलंय. काहीजण साथ सोडून तिकडं गेले आणि त्यांची सत्ताच गेली. आता ते परत यायचं म्हणतील. त्यांना अजिबात येऊ द्यायचं नाही.”

“भाजपचा एकही नेता शेतकऱ्यांच्या बाजूने बोलत नाही”

“शेतकरी पुढे येऊ नयेत म्हणून तुम्ही खिळे मारता, जमाव रेटत नसेल तर पाणी फवारता, अश्रूधुराच्या नळकांड्या वापरतात. खासदार सुप्रिया सुळे आणि अन्य खासदारांची अडवणूक केली जाते. मीडियातून आवाज उठल्यानंतर खिळे काढण्यात येत आहेत. शेतकऱ्यांना किती कष्ट पडतात याचा विचार व्हायला नको? आताचे केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या जीवावर सत्तेत आलं. आताही शेतकऱ्यांच्याच बळावर आहे. पण तरीही शेतकरी प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं जातंय. भाजपचा एकही नेता शेतकऱ्यांच्या बाजूने बोलत नाही हे दुर्दैव आहे. जगातल्या कोणत्याच देशात असं संकट शेतकऱ्यांवर ओढवलेलं नाही इतकी भयानक स्थिती भारतात आहे. परदेशातील सेलिब्रेटीनं ट्विट केलं म्हणून तुम्ही त्यांना ट्रोल करता? इतके दिवस तुम्ही का बोलला नाही,” असंही अजित पवार यांनी नमूद केलं.

“5 वर्षाच्या आत लाकडी निंबोडी योजनेला पाणी आणून मगच मते मागायला येणार”

अजित पवार म्हणाले, “भाजप सरकारने धरणात पाणी असूनही निरा डाव्या कालव्याला पाणी न सोडण्याची भूमिका घेतली. आमचं सरकार आल्यावर हा निर्णय बदलला. त्यामुळे आता आपल्याला मुबलक पाणी आहे. आता कोणी कोर्टात गेलं तरी पाणी बंद होणार नाही. विना वापराचं पाणी वाया जाणार नाही, अशी व्यवस्था केलीय. मागच्या सरकारने केवळ त्रास देण्याची भूमिका घेतली. त्यातून आपलं पाणी बंद केलं. तरी इथले नेते भाजपातच गेले. इंदापूरमधील 22 गावांच्या पाण्याचा प्रश्न तयार झाला. 5600 हेक्टर क्षेत्राचं सर्वेक्षण होणार आहे. आता महाविकास आघाडीला एक वर्ष झालंय. पाच वर्षाच्या आत लाकडी निंबोडी योजनेला पाणी आणून मगच मते मागायला येणार आहे.”

“45 हजार कोटी वीजबिल थकबाकी आहे. 30 हजार कोटी माफ करण्यात आलेत. वीजबिलाची थकीत रक्कम भरलेली रक्कम विकास कामांसाठी होणार खर्च आहे. बिबट्यांचं प्रमाण वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर वनविभागाला अत्याधुनिक वाहने देऊ, काळजी करु नका. बिबट्याची चाहूल लागताच वनखात्याला कळवण्याची जबाबदारी पार पाडा,” असंही अजित पवार म्हणाले.

हेही वाचा :

जेव्हा अजितदादा म्हणतात, एका झटक्यात बाटली रिचवली अन्…

Ajit Pawar | अजितदादा व्यासपीठावर, कार्यकर्त्याची घोषणाबाजी, दादा का म्हणाले, तुझी ग्रामपंचायत आली का?

साहेब-दादांच्या सभेला वडील नेहमी यायचे, मी मंत्री असताना मात्र हयात नाहीत, अजितदादांसमोर दत्ता भरणे भावूक

व्हिडीओ पाहा :

Ajit Pawar comment on Dattatray Bharane Assembly election defeat by Harshawardhan Patil

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.