AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

… तर मागच्या सारखा कडक लॉकडाऊन लावावा लागेल : अजित पवार

लोकांनी सहकार्य न केल्यास नाईलाजास्तव मागच्यावेळी लावला तसा कडक लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल असा सज्जड दम अजित पवार यांनी दिलाय.

... तर मागच्या सारखा कडक लॉकडाऊन लावावा लागेल : अजित पवार
अजित पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
| Updated on: Apr 16, 2021 | 8:43 PM
Share

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी नागरिकांना सहकार्य करत नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलंय. लोकांनी सहकार्य न केल्यास नाईलाजास्तव मागच्यावेळी लावला तसा कडक लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल असा सज्जड दमही त्यांनी दिलाय. पहिल्या लाटेपेक्षा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अधिक लोकांना कोरोनाची बाधा होत आहे, असंही त्यांनी यावेळी नमूद केलं. ते पुण्यात कोरोनाच्या जिल्हा प्रशासनासोबतच्या आढावा बैठकीनंतर माध्यमांशी बोलत होते (Ajit Pawar warn people about strict lockdown in future if not follow rules).

अजित पवार म्हणाले, “पुणेकरांनी मागच्यावेळी शनिवार रविवारच्या लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद दिला होता. तेव्हा मी पण त्यांचं कौतुक केलं. आता यावेळीही शनिवार रविवार दोन दिवस पुणेकर हीच गोष्ट दाखवतील. एकंदरित मागच्यावेळी लॉकडाऊन होतं तेव्हा बऱ्याच लोकांना बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागलं. त्यावेळी आपण खूप मोठा काळ थांबलो. मात्र, दुसऱ्या लाटेत पहिल्या लाटेपेक्षा कोरोना बाधितांची संख्या वाढलीय. त्यामुळे कठोर वाटतील असे निर्णय घेण्याची वेळ आली. म्हणूनच नागरिकांना सहकार्याची भूमिका घ्यावी. गुरुवारी (15 एप्रिल) माझ्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनीही सांगितलंय की दोन दिवसांचा लॉकडाऊन पाळला नाही तर मागच्या सारखा कडक लॉकडाऊन आणावा लागेल, तशी वेळ येऊ नये अशी विनंती आहे.”

“इलेक्ट्रॉनिक मीडियाने देखील नागरिकांना कोरोनाची संख्या किती वाढतेय हे सांगावं. लाखो रुग्ण असले तरी त्यातील 75 टक्के रुग्ण आपआपल्या घरीच आहेत. 25 टक्के रुग्ण रुग्णालयात आहेत. तरीही रुग्णालयांमध्ये बेडची किती मागणी आहे हे सर्वांना माहिती आहे. बहुतेकांना ठराविक रुग्णालयातच बेड हवे आहेत,” असंही अजित पवार यांनी नमूद केलं.

“आरोग्य व्यवस्था कोलमडलेली नाही”

अजित पवार म्हणाले, “आरोग्य व्यवस्था कोलमडलेली आहे हे म्हणणं चूक. तसं काहीही घडलेलं नाही. आरोग्य यंत्रणा मागील वर्षभरापेक्षा अधिक काळ जीवाचं रान करतेय. पोलीस राबतायेत, डॉक्टर्स राबतायेत. नव्याने पुण्यात 900 वैद्यकीय कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आलीय. त्यांना भरती करण्याचे अधिकार देण्यात आलेत. प्रातांना चतुर्थ आणि तृतीय श्रेणी स्टाफ भरण्याची परवानगी दिलीय. एमबीबीएस डॉक्टर जेवढे मिळायला पाहिजे तेवढे मिळत नाहीये. त्याबद्दलचं कारण मी वैद्यकीय तज्ज्ञांना विचारलं. त्यांनी सांगितलेली कारणं योग्य असतील तर सरकार त्यात जरुर काही मार्ग काढण्याचा प्रयत्न करेल.”

“कुंभमेळा, निवडणुका यामुळे देशभरातच कोरोना वाढताना दिसतोय. कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढतेय. कर्नाटक, उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना कोरोनाचा संसर्ग झालाय. अनेक वरिष्ठांना कोरोना झालाय. यावेळचा कोरोना आजूबाजूच्या लोकांना लवकर बाधित करतोय. त्यामुळे कुटुंबंच्या कुटुंब बाधित होत आहेत,” असं अजित पवार यांनी सांगितलं.

हेही वाचा :

Maharashtra health department recruitment 2021 : महाराष्ट्रात 10 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांची तातडीने भरती

चंद्रकांतदादांची सूचना अजित पवारांना मान्य, आमदार निधीतून कोरोना खर्चासाठी 350 कोटी

चंद्रकांत पाटलांनी कधी शेती केली का? अजित पवारांनी पाटलांना पुन्हा डिवचलं

व्हिडीओ पाहा :

Ajit Pawar warn people about strict lockdown in future if not follow rules

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.