नाकात ऑक्सिजनची नळी घालून गिरीश बापट प्रचारात; कसब्याचा उमेदवार म्हणाला, आज प्रचार नकोच!

बापट यांनी व्हिलचेअरवर बसूनच अत्यंत छोटं भाषण केलं. मतदारांशी संवाद साधला. बापट बोलत असताना समोर बसलेले भाजपच्या महिला पदाधिकारी रडत होत्या. अश्रू पुसत होत्या. ही निवडणूक चुरशीची वगैरे नाही.

नाकात ऑक्सिजनची नळी घालून गिरीश बापट प्रचारात; कसब्याचा उमेदवार म्हणाला, आज प्रचार नकोच!
girish bapatImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Feb 17, 2023 | 9:43 AM

पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. हा मतदारसंघ राखण्यासाठी भाजपने चांगलाच जोर लावला आहे. तर काँग्रेसनेही या मतदारसंघात जोर लावला आहे. कसब्यात दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबीयांना तिकीट न दिल्याने टिळक समर्थकांमध्ये नाराजी आहे. ही नाराजी टिळक कुटुंबीयांनी उघड केली होती. त्यामुळे भाजपने पक्षातील ही नाराजी दूर करण्यासाठी आणि हा मतदारसंघ राखण्यासाठी आजारी असलेल्या खासदार गिरीश बापट यांना प्रचाराच्या मैदानात उतरवले होते. गिरीश बापट नाकात ऑक्सिजनच्या नळ्या घालून प्रचारात सहभागी झाले होते. बापट यांना या अवस्थेत पाहून हिंदू महासंघाचे उमेदवार आनंद दवे अस्वस्थ झाले आहेत. त्यांनी आज निवडणूक प्रचार न करण्याचा निर्णय घेतला आहे.

हिंदू महासंघाचे नेते आनंद दवे यांनी आज निवडणूक प्रचार न करण्याचा निर्णय घेतला आहे. काल गिरीश बापट यांना प्रचार करताना पाहिले. ते ऑक्सिजन लावून प्रचारासाठी आले होते. त्यांना पाहून मला गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आठवले. त्रास बापट साहेबांना होत होता… पण यातना आम्हाला जाणवत होत्या. त्यामुळे आज मी व्यक्तिशः प्रचार करणार नाही. आमच्या भूमिकेमुळे हे घडत आहे याचा मानसिक त्रास आम्हाला होत असल्यामुळे मी आज व्यक्तिशः प्रचार करणार नसल्याचं ठरवलं आहे, असं आनंद दवे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

दरम्यान, काल गिरीश बापट कसब्यात प्रचारासाठी आले होते. भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारसभेत बापट यांनी भाग घेतला. यावेळी बापट यांच्या नाकात ऑक्सिजनची नळी होती. हाताला ऑक्सिमीटर लावले होते. त्यांची प्रकृती अत्यंत खालावलेली दिसत होती. तरीही बापट प्रचारासाठी आले होते.

आपण जिंकणार आहोत

यावेळी बापट यांनी व्हिलचेअरवर बसूनच अत्यंत छोटं भाषण केलं. मतदारांशी संवाद साधला. बापट बोलत असताना समोर बसलेले भाजपच्या महिला पदाधिकारी रडत होत्या. अश्रू पुसत होत्या. ही निवडणूक चुरशीची वगैरे नाही. ही निवडणूक आपण जिंकणार आहोत. कार्यकर्त्यांच्या जीवावर आपण निवडणूक जिंकणार आहोत. कार्यकर्ता हा पक्षाचा आत्मा आहे, असं बापट म्हणाले.

पेढे घ्यायला येणार आहे

हेमंतचं काम चांगलं आहे. महापालिकेच्या माध्यमातून त्याने चांगलं काम केलं आहे. हेमंतला निवडून द्या. थोडी जास्त ताकद लावा. निवडून आल्यावर मी पेढा घ्यायला परत येणार आहे, असं त्यांनी सांगितलं.

जनाची नाही तर मनाची…

दरम्यान, भाजपने आजारी असतानाही गिरीश बापट यांना प्रचारात उतरवल्याने त्यांच्यावर रिपाइं खरात गटाचे नेते सचिन खरात यांनी टीका केली आहे. आमदार मुक्ता टिळक यांच्या अकाली निधनामुळे पोटनिवडणूक होत आहे. परंतु ज्या वेळेस मुक्ता टिळक आजारी होत्या त्यावेळेस भाजपाने राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मुक्ता टिळक यांना मुंबईत आणले होते.

आता कसबा पोटनिवडणूक होत आहे. यामध्ये सुद्धा भाजपाने गिरीश बापट आजारी असताना सुद्धा त्यांना प्रचारात उतरवल्याचे दिसत आहे. यामुळे भाजपने माणुसकी नसल्याचे स्पष्टपणे दाखवून दिले आहे, भाजपने थोडी जनाची नाही तर मनाची तर लाज बाळगावी, अशी टीका सचिन खरात यांनी केली आहे.

Non Stop LIVE Update
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल.
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य.
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ.
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या...
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या....
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका.
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण.
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल.
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा.
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.