Pune crime : आणखी एका वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश! बालेवाडीतल्या लॉजवर छापा टाकत हिंजवडी पोलिसांनी चौघींची केली सुटका

मिळालेल्या माहितीवरून संबंधित लॉजवर बनावट ग्राहक पाठवून पडताळणी करण्यात आली. यावेळी वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे समोर आले. यावेळी चार पीडित महिलांची सुटका करण्यात आली. दोन पश्चिम बंगाल, एक उत्तर प्रदेश तर एक हरयाणा येथील या महिला आहेत.

Pune crime : आणखी एका वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश! बालेवाडीतल्या लॉजवर छापा टाकत हिंजवडी पोलिसांनी चौघींची केली सुटका
हिंजवडी पोलीस ठाणेImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 06, 2022 | 3:49 PM

पिंपरी चिंचवड : हिंजवडी पोलिसांनी (Hinjewadi Police) आणखी एका वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. बालेवाडी येथे एका लॉजवर वेश्याव्यवसाय (Prostitution) सुरू असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार लॉजवर धाड टाकत पोलिसांनी 4 महिलांची सुटका केली आहे. याप्रकरणी विजय थोरात याला अटक करण्यात आली आहे. तर तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कक्षेतील हिंजवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हा प्रकार सुरू होता. स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी अवैधरित्या (Illegally) मुलींकडून वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या तसेच जास्त पैशाचे आमिष दाखवून वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या दलालांवर कारवाई करण्यात आली आहे. बनावट ग्राहक पाठवून या अवैध धंद्याचा पर्दाफाश करण्यात आला आहे. त्यांच्याकडून काही मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे.

वेगवेगळ्या लॉजवर पाठवत होते मुली

3 जून रोजी अनैतिक मानवी वाहतूक विभागातील पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांना हिंजवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येथील लॉजवर विजय साहेबराव थोरात (वय 31, रा. मानस हेरिटेज, बालेवाडी, मूळ रा. माळरान चिंचोली फाटा, अहमदनगर) त्याचा साथीदार राज उर्फ भागवत गुंडरे, निलेश मारवाडी उर्फ राजू आणि युसुफ सरदार शेख यांच्या सांगण्यावरून विजय आणि राज हे त्यांच्या मोबाइलवरून व्हाट्सअॅप कॉल करून वेगवेगळ्या लॉजवर मुली पाठवून वेश्याव्यवसाय करवून घेतात अशी माहिती मिळाली होती.

हे सुद्धा वाचा

विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल

मिळालेल्या माहितीवरून संबंधित लॉजवर बनावट ग्राहक पाठवून पडताळणी करण्यात आली. यावेळी वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे समोर आले. यावेळी चार पीडित महिलांची सुटका करण्यात आली. दोन पश्चिम बंगाल, एक उत्तर प्रदेश तर एक हरयाणा येथील या महिला आहेत. त्यांना जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले जात होते, असे निदर्शनास आले आहे. तर आरोपी विजय थोरात याच्याकडून चार हजार रोख, 35 किंमतीचे दोन मोबाइल आणि 40 रुपये किंमतीचे इतर साहित्य असा एकूण 39,040 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींवर कलम 370 (3), 34 यासह अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम 1956चे कलम 4,5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.