AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Crime: पुण्यात थरार! आरोपींना पकडायला गेलेल्या पोलिसांवरच गोळीबार…थरारक पाठलाग… काळजाचा थरकाप… पुढे झालं काय?

Attacked on Police Team at Ranjangaon Ganpati: पुणे जिल्ह्यात गुंडांची दहशत वाढल्याचे सातत्याने समोर येत आहे. आता तर थेट पोलिसांवरच गोळीबार करण्याइतपत त्यांची हिंमत वाढली आहे. काल शिरूरच्या वाघाळे-पिंपरी दुमाला परिसरात गोळीबाराचा मोठा थरार घडला. त्यामुळे अनेकांच्या काळजाचा थरकाप उडाला.

Pune Crime: पुण्यात थरार! आरोपींना पकडायला गेलेल्या पोलिसांवरच गोळीबार...थरारक पाठलाग... काळजाचा थरकाप... पुढे झालं काय?
पोलिसांवर आरोपींचा गोळीबारImage Credit source: फाईल फोटो
| Updated on: May 17, 2026 | 9:38 AM
Share

Attacked on Police Team at Ranjangaon Ganpati: पुण्याच्या रांजणगाव गणपती येथे पोलिस आणि फरार आरोपींमध्ये थरारक पाठलाग आणि कथित गोळीबाराची घटना घडल्याने रांजणगाव गणपती परिसरात एकच खळबळ उडाली. गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी डोके वर काढल्याने पोलीस पथक त्यांच्या मागावर होते. पुणे जिल्ह्यात कोयता गँग आणि स्थानिक भाई-दादांच्या टोळक्यांचा उच्छाद दिसून येत आहे. पुण्यातील गुन्हेगारीचीच आता अधिक चर्चा होत आहे. आता तर थेट पोलिसांवर गोळीबार करण्याइतपत या गुंडांची हिंमत वाढली आहे. त्यामुळे गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी व्यापक मोहीम हाती घ्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

थरारक पाठलाग…गोळीबार आणि काळजाचा थरकाप

चऱ्होली गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपींचा शोध घेण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांचे विशेष पथक शिरूर तालुक्यात दाखल झाले होते. आरोपी सोनेसांगवी येथील शेळके वस्ती परिसरात लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. मात्र पोलिसांची चाहूल लागताच आरोपींनी दुचाकीवरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. यानंतर अष्टविनायक रोडवरील गणपती चौक परिसरात काही काळ पोलिस आणि आरोपींमध्ये थरारक पाठलाग रंगला.

हवेत गोळीबार की पोलिसांना टशन?

दरम्यान आरोपींची दुचाकी बंद पडल्याने त्यांनी वाहन रस्त्यातच सोडून दिले आणि अंधाराचा तसेच उसाच्या शेतांचा फायदा घेत पिंपरी दुमाला–वाघाळे परिसराच्या दिशेने पलायन केल्याची माहिती समोर येत आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार आरोपींकडून हवेत गोळीबार करण्यात आल्याची चर्चा असून त्यानंतर पोलिसांनीही स्वसंरक्षणासाठी हवेत काही राऊंड फायर केल्याचे सांगितले जात आहे. मात्र या घटनेबाबत पोलिस प्रशासनाकडून अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.

रात्रभर पोलिसांचे सर्च ऑपरेशन

घटनेनंतर रांजणगाव एमआयडीसी पोलीस, पुणे ग्रामीण पोलीस, स्थानिक गुन्हे शाखा आणि पिंपरी-चिंचवड पोलिसांची अतिरिक्त पथके घटनास्थळी दाखल झाली. परिसरात मोठ्या प्रमाणावर नाकाबंदी करण्यात आली होती उसाच्या शेतांमध्ये आणि वस्तीभागात रात्रभर सर्च ऑपरेशन सुरू होते. फरार आरोपींपैकी शेखर संभाजी जाधव या संशयिताचे नाव चर्चेत असून त्याच्यावर यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र याबाबतही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या संपूर्ण प्रकारामुळे सोनेसांगवी, पिंपरी दुमाला आणि वाघाळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मध्यरात्रीपर्यंत पोलिसांच्या वाहनांची धावपळ आणि सर्च ऑपरेशन सुरू असल्याने नागरिकांमध्ये एकच चर्चा सुरू आहे. तर परिसरातील आरोपींना कायमचा धडा शिकवण्याची मागणी करण्यात येत आहे.

Follow Us
उदय सामंत: 'एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य'
उदय सामंत: एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य
मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे
'मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे', रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेंची प्रतिक्रिया
मराठी न बोलल्यास परवाना रद्द करण्याच्या धमक्यांवरचा दुबेंचा इशारा
संजय दुबे यांचा प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषेच्या सक्तीला थेट विरोध
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल:
शरद पवार एनडीएमध्ये जाणार नाहीत, विरोधातच राहणार
पवारांकडून एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या; पक्ष कार्यकर्त्यांना दिले स्पष्ट निर्देश
देशमुखांचं कारागृह महानिरीक्षकांना पत्र; गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी
धनंजय देशमुखांचे बीड कारागृह महानिरीक्षकांना पत्र: गैरप्रकार चौकशी आणि आरोपी स्थलांतराची मागणी
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर? ठाण्यातील कार्यक्रमात भाजप नेत्यांची अनुपस्थिती
बेस्ट कामगारांचा बेमुदत संप; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
बेस्ट कामगारांचा मंगळवारपासून बेमुदत संप: प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
पालकमंत्री महाजनांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना मदत
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना अवयव प्रत्यारोपणासाठी मदत