स्वर्णव सापडल्याच्या आनंदात भेटायला येत असलेल्या आत्यावर काळाचा घाला ; ; मुले गंभीर जखमी

स्वर्णव सापडल्याच्या आनंदात भेटायला येत असलेल्या आत्यावर काळाचा घाला ; ; मुले गंभीर जखमी
सांकेतिक फोटो

स्वर्णवचे अपहरण झाल्यानंतर त्यांचे सर्व कुटुंबीय अत्यंत काळजीत होते. काल स्वर्णव सापडल्यनंतर कुटुंबियांसहपै-पाहुण्यांनाही खूप आनंद झाला होता. नांदेड येथे वास्तव्यास असलेल्या स्वर्णवची आत्यालाही आनंद झाला होता. तो सुखरूप सापडल्याची माहिती मिळताच आत्या त्याला भेटन्यासाठी पुण्याला यायला निघाली. नांदेडवरून आपल्या कुटुंबियांच्या सोबत येत असताना नगररोडला त्यांच्या गाडीला दुर्दैवी अपघात झाला.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: प्राजक्ता ढेकळे

Jan 20, 2022 | 2:30 PM

पुणे – शहरातील बालेवाडी परिसरातून अपहरण झालेला चार वर्षीय चिमुकलया स्वर्णव चव्हाणचे (swarnav chavan) 9 दिवसांपूर्वी अपहरण झाले होते. त्यानंतर काल तो सुखरूप सापडल्याचा आनंद कुटुंबिय साजरा करत असताना असताना चव्हाण कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. स्वर्णव सापडल्यानंतर आनंदाने त्याला भेटायला नांदेडवरून (Nanded) येत असलेल्या त्याच्या आत्याचा अपघात होऊन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

नेमकं काय घडलं

स्वर्णवचे अपहरण झाल्यानंतर त्यांचे सर्व कुटुंबीय अत्यंत काळजीत होते. काल स्वर्णव सापडल्यनंतर कुटुंबियांसहपै-पाहुण्यांनाही खूप आनंद झाला होता. नांदेड येथे वास्तव्यास असलेल्या स्वर्णवची आत्यालाही आनंद झाला होता. तो सुखरूप सापडल्याची माहिती मिळताच आत्या त्याला भेटन्यासाठी पुण्याला यायला निघाली. नांदेडवरून आपल्या कुटुंबियांच्या सोबत येत असताना नगररोडला त्यांच्या गाडीला दुर्दैवी अपघात झाला. या अपघातात सुनीता संतोष राठोड चव्हाण (वय 36 ) यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांची मुले दोन मुले व पती गंभीर जखमी झाले आहेत.समर राठोड (वय 14 ) अमन राठोड (वय 6) हे दोघे या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. पती संतोष राठोड यांना किरकोळ दुखापत झाली आहे. दोन्ही लहान मुलांना उपचारासाठी पुण्यात बाणेर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावरती अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. कालच स्वर्णव चव्हाण सापडल्याचा आनंद सर्व कुटुंबीय व बाणेर परिसरात साजरा केला जात होता. या घटनेमुळे बाणेर परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांनी हळहळ व्यक्त केली.

येथून झाले होते अपहरण शहरातील उच्चभ्रु परिसर असलेल्या बाणेर परिसरातून आठवडाभरापूर्वी (दि. 11 जानेवारी) ला डुग्गू उर्फ स्वर्णम चव्हाण या मुलाचे अपहरण झाले होते. चार वर्षाच्या बालकाच्या अपहरणाने शहरात सर्वत्र खळबळ निर्माण झाली होती. ठिकठिकाणी या चिमुरड्याची माहिती असलेले फलकही लावण्यात आलं होते. त सोशल मीडियावर त्याच्या फोटोसह त्याचे अपहरण झालेल्या वाहनाचा फोटोही प्रसिद्ध करण्यात आला होते. सर्वत्र केवळ बालकाच्या अपहरणाची चर्चा होती.

UP Elections: योगी आदित्यनाथ विरोधात भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद लढणार, गोरखपूर मतदारसंघात सामना!

NEET UG PG Counselling 2021 : वैद्यकीय प्रवेशातील 27 टक्के ओबीसी आरक्षणावर सुप्रीम मोहोर; केंद्राच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयानं ठरवलं योग्य

Sugarcane Crop: अतिरिक्त ऊसाचे गाळप रखडले पण क्षेत्र मोजायचे कसे? जानेवारी अखेरीस अहवालातून चित्र स्पष्ट

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें