AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवारांचे धक्क्यावर धक्के, भाजपला दुसरा मोठा झटका, पुण्यात राजकीय गणितं बदलणार?

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पश्चिम महाराष्ट्रात भाजपला मोठे धक्के बसताना दिसत आहेत, तर दुसरीकडे शरद पवार गटात इन्कमिंग वाढल्याने पक्षाची ताकद वाढत आहे. पक्षातून जाणाऱ्या नेत्यांना थांबवणं हेच भाजपसाठी सध्या मोठा आव्हान असणार आहे.

शरद पवारांचे धक्क्यावर धक्के, भाजपला दुसरा मोठा झटका, पुण्यात राजकीय गणितं बदलणार?
शरद पवारImage Credit source: tv9 marathi
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Oct 10, 2024 | 6:46 PM
Share

लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग सुरु आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्यासाठी नेत्यांच्या रांगा लागल्या आहेत. हर्षवर्धन पाटील यांच्यानंतर आता पुणे जिल्ह्यात भाजपला दुसरा धक्का बसणार आहे. राज्यसभेचे माजी खासदार आणि भाजप प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे लवकरच भाजपला सोडचिठ्ठी देत शरद पवार गटात दाखल होणार आहेत. काकडेंच्या पक्षप्रवेशामुळे पुणे जिल्ह्यातील राजकीय गणितं बदलण्याची शक्यता आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी जी परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेसची होती, तीच आता भाजपची झाली आहे. निवडणुकीच्या तोंडावर दिग्गज नेते भाजपला सोडचिठ्ठी देताना दिसत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात भाजपला मोठे धक्के बसताना दिसत आहेत. समरजीत घाडगे, हर्षवर्धन पाटील, त्यानंतर आता संजय काकडे शरद पवार गटाच्या वाटेवर आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी औपचारिक बैठक करून दसऱ्यानंतर पक्षप्रवेश करणार असल्याचं काकडे यांनी स्पष्ट केलंय.

संजय काकडे यांनी यापूर्वी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षावर नाराजी व्यक्त केली होती. भाजपमध्ये मला सध्या कुठलंही काम नसून नुसतं पदावर राहण्यात काहीच अर्थ नाहीय. त्यामुळे मंगळवारी ते भाजप राज्य उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार आहेत. माझ्यासोबत पुण्यातील 10 ते 15 माजी नगरसेवक आणि आणि काही माजी आमदार संपर्कात असल्याचा दावा काकडेंनी केलाय.

कोण आहेत संजय काकडे?

  • संजय काकडे हे सध्या भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत
  • राज्यसभेचे माजी खासदार होते
  • अपक्ष खासदार म्हणून काकडेंनी भाजपला केंद्रात पाठींबा दिला होता.
  • काकडे यांचे पुण्यातील आठही विधानसभा मतदारसंघात समर्थक आहेत.
  • पुणे महानगरपालिका निवडणुकीत विजय काकडे यांची निर्णायक भूमिका असते.
  • संजय काकडे यांचे सर्वपक्षीय नेत्यांसोबत चांगले संबंध आहेत.
  • पुणे जिल्ह्यातील मराठा चेहरा म्हणून संजय काकडे यांची ओळख आहे.

भाजपला मोठा धक्का

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर संजय काकडे भाजपला सोडचिठ्ठी देत असल्यामुळे भाजपाला हा मोठा धक्का आहे. याचा परिणाम विधानसभा निवडणुकीत दिसणार असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पश्चिम महाराष्ट्रात भाजपला मोठे धक्के बसताना दिसत आहेत, तर दुसरीकडे शरद पवार गटात इन्कमिंग वाढल्याने पक्षाची ताकद वाढत आहे. पक्षातून जाणाऱ्या नेत्यांना थांबवणं हेच भाजपसाठी सध्या मोठा आव्हान असणार आहे.

Follow Us
मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला
Abhijeet Dipke : मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला, मेट्रो-रेल्वे बंदीवरून सरकारवर निशाणा
रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने....
CJP Protest : सीजेपीचं उद्या दिल्लीत आंदोलन, रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने केंद्राला काय सांगितलं?
गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा
Gajanan Kirtikar : Shivsena : गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले...
एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर दीपकेंचा सरकारला टोला
Abhijeet Dipake : एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर अभिजित दीपकेंचा सरकारला टोला
ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच....
Shivsena : ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच, सर्वोच्च न्यायालयाकडून तारीख जाहिर
गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा बण यांच्यावर....
Vivekanand Patil : गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा नवनाथ बण यांच्यावर पलटवार, फडणवीसांनाही केलं आवाहन
CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
CJP Delhi Andolan : CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ?
Thackeray Group On Delhi Andolan : दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ? राष्ट्रपतींच्या भेटीवेळीही प्रतिनिधी....
सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून राऊतांनी...
Sanjay Raut : सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून संजय राऊतांनी सरकारला घेरलं
SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; सिब्बलांचा जुना व्हिडिओ
Devendra Fadnavis : SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; कपिल सिब्बलांचा जुना व्हिडिओ शेअर करत म्हणाले...