PM Modi Dehu Visit : नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्याला भाजपाच्या कार्यकर्त्याचाच जाहीर विरोध; भाजपा म्हणतं, आम्ही त्यांना काढून टाकलंय…

| Updated on: Jun 12, 2022 | 2:21 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अतीतातडीने हा प्रश्न स्वतः लक्ष घालून सोडवावा, संरक्षण क्षेत्रातील बाधित जमीन क्षेत्र कमी करून स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी सचिन काळभोर यांनी केली आहे.

PM Modi Dehu Visit : नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्याला भाजपाच्या कार्यकर्त्याचाच जाहीर विरोध; भाजपा म्हणतं, आम्ही त्यांना काढून टाकलंय...
पंतप्रधान नरेंद्र मोदी/सचिन काळभोर
Image Credit source: tv9
Follow us on

पिंपरी चिंचवड : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या पुणे दौऱ्याला भाजपाच्या युवा मोर्च्याच्या माजी उपाध्यक्षानेच विरोध केला आहे. संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिर (Sant Tukaram Maharaj Mandir) लोकार्पण सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 जूनला देहूमध्ये येणार आहेत. त्या कार्यक्रमास भाजपा युवा मोर्चाचे माजी उपाध्यक्ष सचिन काळभोर (Sachin Kalbhor) यांनी जाहीर विरोध केला आहे. देहूरोड, देहूगाव, तळवडे, मोशी, दिघी, बोपखेल, निगडी, चिखली, चऱ्होली, भोसरी, कासारवाडी, पिंपरी या गावातील संरक्षण क्षेत्रातील बाधित जमीन असून सातबारा उताऱ्यावर रेड झोन शिक्का मारण्यात आले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून रेड झोनप्रश्नी अनेक आंदोलने, मोर्चे काढण्यात आले. मात्र अद्याप यावर तोडगा निघालेला नाही, असे सचिन काळभोर यांचे म्हणणे आहे.

‘भूमिपुत्रांना न्याय द्या’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अतीतातडीने हा प्रश्न स्वतः लक्ष घालून सोडवावा, संरक्षण क्षेत्रातील बाधित जमीन क्षेत्र कमी करून स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी सचिन काळभोर यांनी केली आहे. रेड झोन क्षेत्र कमी केल्यामुळे नागरिकांना बांधकाम परवाना मिळेल तसेच लाइट, पाणी, गटार, नवे रस्ते, मेट्रो रेल्वे इतर सुविधा उपलब्ध होतील, असे त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संरक्षण मंत्रालयातील रेड झोन प्रश्न लवकर सोडवावा, या मागणीसाठी त्यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देत जाहीर विरोध दर्शविला आहे.

काय आहे पत्रात?

सचिन काळभोर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेलं पत्र

पिंपरी चिंचवड पोलिसांनी पाठवली नोटीस

या पत्राच्या अनुषंगाने सचिन काळभोर यांना पिंपरी चिंचवड पोलिसांकडून सीआरपीसी कलम 149 अंतर्गत नोटीस देण्यात आली आहे. सचिन काळभोर यांनी तीन वर्षांपूर्वी पक्षविरोधी भूमिका घेतल्याने पक्षातून त्यांचे निलंबन केले असल्याची माहिती पिंपरी चिंचवड भाजपा प्रवक्ते अमोल थोरात यांनी दिली आहे.

हे सुद्धा वाचा

काय म्हटले आहे नोटिशीत?

सचिन काळभोर यांना पोलिसांची नोटीस

पोस्टरनंतरचा आणखी एक वाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 जून रोजी श्री क्षेत्र देहू येथे येणार आहेत. त्यांच्या हस्ते जगद्गुरू संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण होणार आहे. या कार्यक्रमाची तयारीही सध्या देहू नगरीत सुरू झाली आहे. सकाळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याचा आढावाही घेतला. एकीकडे देहूतील भाजपाच्या पोस्टरवरून वाद सुरू असताना आणखी एक वाद आता समोर आला आहे.