PM Modi Dehu Visit : भक्तांचा प्रताप विरोधकांना ताप, मोदींची देहू वारी आत्तापासूनच वादात, बॅनरवरील फोटोंच्या साईजची चर्चा

वारकरी संप्रदायामध्ये विठ्ठलापेक्षा कोणीही मोठा नसताना मोदींचा फोटो मोठा दाखवून वारकरी संप्रदायाचा अपमान केला आहे, असा आरोप आता राष्ट्रवादीकडून करण्यात आलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांनी या बॅनरचे काही फोटो ट्विट करत भाजपवर हल्लाबोल चढवला आहे.

PM Modi Dehu Visit : भक्तांचा प्रताप विरोधकांना ताप, मोदींची देहू वारी आत्तापासूनच वादात, बॅनरवरील फोटोंच्या साईजची चर्चा
भक्तांचा प्रताप विरोधकांना ताप, मोदींची देहू वारी आत्तापासूनच वादात, बॅनरवरील फोटोंच्या साईजची चर्चाImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 11, 2022 | 9:44 PM

पुणे : काही दिवसात पंतप्रधान मोदी (PM Modi) हे देहूत (Dehu) येणार आहेत. भाजपच्या नेत्यांनी काही दिवसांपूर्वीच दिल्लीत दाखल होत मोदींना वारीसाठी निमंत्रण दिलं होतं. मोदींचा दौरा अनेक दिवसांपासून गाजतोय, मात्र आता या दौऱ्याआधी लागलेले बॅनरच आणि त्या बॅनरवरील फोटोंची जास्त चर्चा होतेय. संत ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी (Warkari) संप्रदायाचा पाया रचून संत तुकाराम महाराजांनी त्यावर कळस चढविला. पिंपरी-चिंचवड शहरात भाजपाने जाणीवपूर्वक मोदींचा फोटो पांडुरंगापेक्षा जाणीवपूर्वक मोठा दाखवून वारकरी संप्रदायाचा अवमान केला आहे. वारकरी संप्रदायामध्ये विठ्ठलापेक्षा कोणीही मोठा नसताना मोदींचा फोटो मोठा दाखवून वारकरी संप्रदायाचा अपमान केला आहे, असा आरोप आता राष्ट्रवादीकडून करण्यात आलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांनी या बॅनरचे काही फोटो ट्विट करत भाजपवर हल्लाबोल चढवला आहे. त्यामुळे हा वाद आता आणखी वाढण्याची शक्यता आहे.

रविकांत वरपे यांचं ट्विट

माफी मागण्याचीही मागणी

राष्ट्रवादीकडून एवढे फोटोच ट्विट गेले नाहीतर तर विटेवरी उभा बा विठ्ठलापेक्षा मोठा कोणी नाही. पिंपरी चिंचवड शहर भाजपाने मोदींना विठ्ठलापेक्षाही मोठे दाखवण्याचे पाप केले आहे. वारकरी संप्रदायाची बदनामी वारकरी संप्रदाय खपवून घेणार नाही. भाजपाने वारकरी संप्रदायाची माफी मागावी. असा इशारा देत त्यांनी माफी मागावी अशी मागणीही आता राष्ट्रवादीकडून करण्यात आलीय.

वरपे यांचं दुसरं ट्विट

मोदींच्या स्वागताची जोरदार तयारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याच्या 14 तारखेला देहू दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचं लोकार्पण करण्यात येणार आहे. यावेळी देहू संस्थानच्या वतीने खास डिझायनर तुकाराम पगडी आणि उपरणं देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सत्कार करण्यात येणार आहे. पुण्यातील मुरूडकर झेंडेवाले यांनी देहू देवस्थानच्या मागणीनुसार ही खास डिझायनर तुकाराम पगडी आणि उपरणं तयार केल आहे. पूर्ण रेशीम सिल्कचा वापर करून ही पगडी तयार करण्यात आलीये.

मंदिरही उद्यापासून दर्शनासाठी बंद असणाऱ

तसेच पंतप्रधान मोदी येत आहेत म्हटल्यावर त्यांच्या सुरक्षेचीही पुरेपूर काळजी घेण्यात येत आहे. त्यासाठी उद्यापासून मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. कोरोनाने दोन वर्षाचा ब्रेक लावल्यानंतर यंदा पायी वारी निघत आहे. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र आता हा फोटोचा वाद राजकारण तापवतोय.

Non Stop LIVE Update
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.