CCTV : लेडिज वेअरमधून हजारोंच्या मालावर चोरट्यानं केला हात साफ; पुण्याच्या तळेगाव दाभाडेतली चोरी सीसीटीव्हीत कैद

मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) येथे भरदिवसा कपडा दुकानात एकाने हजारो रुपयांच्या कपड्यावर केला हात साफ केला. अज्ञात चोरट्याने चोरी करून चोरीचा माल घेऊन जात असताना हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

CCTV : लेडिज वेअरमधून हजारोंच्या मालावर चोरट्यानं केला हात साफ; पुण्याच्या तळेगाव दाभाडेतली चोरी सीसीटीव्हीत कैद
दुकानात घुसताना चोर सीसीटीव्हीत कैद
Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Apr 23, 2022 | 9:41 AM

मावळ, पुणे : मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) येथे भरदिवसा कपडा दुकानात एकाने हजारो रुपयांच्या कपड्यावर केला हात साफ केला. अज्ञात चोरट्याने चोरी करून चोरीचा माल घेऊन जात असताना हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. तळेगाव दाभाडे येथील एक लेडीज वेअरच्या (Ladies wear) दुकानातून भरदिवसा तीस हजाराचे कपडे एका कापड चोराने लंपास केलेला माल घेऊन जात असतानाचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV) कैद झाला आहे. दुकानात महिला असतानाच या चोराने संधी साधून महिलांच्या कपड्यावर हात साफ केला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे आता चोराचा तपास करत आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आपल्याला स्पष्ट दिसत आहे, की एक व्यक्ती दुकानाच्या आत शिरत आहे. त्या व्यक्तीचा चेहरा स्पष्ट दिसत नसला तरी पोलीस याच फुटेजच्या सहाय्याने त्याचा शोध घेत आहेत.

आणखी वाचा :

Ulhasnagar Mockdrill : उल्हासनगरात पोलिसांकडून दंगल नियंत्रणाचं मॉकड्रिल, भोंग्यांच्या मुद्द्यावर पोलिसांना सज्ज राहण्याच्या सूचना?

Mumbai Crime : मुंबईच्या झवेरी बाजारात जीएसटी विभागाची कारवाई, भिंतीत 10 कोटींची रोकड, 19 किलो चांदीच्या विटा हस्तगत

धक्कादायक! मंत्री शंकरराव गडाख यांच्या स्वीय सहाय्यकावर गोळीबार