Ulhasnagar Mockdrill : उल्हासनगरात पोलिसांकडून दंगल नियंत्रणाचं मॉकड्रिल, भोंग्यांच्या मुद्द्यावर पोलिसांना सज्ज राहण्याच्या सूचना?

सध्या भोंगे, हनुमान चालीसा यांवरून सुरू असलेलं राजकारण पाहता राज्यात सध्या धार्मिक, सामाजिक तेढ निर्माण होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर पोलिसांना कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठीच आजचं हे मॉकड्रिल घेण्यात आल्याची माहिती उल्हासनगरचे सहाय्यक पोलीस आयुक्त मोतीचंद राठोड यांनी दिली.

Ulhasnagar Mockdrill : उल्हासनगरात पोलिसांकडून दंगल नियंत्रणाचं मॉकड्रिल, भोंग्यांच्या मुद्द्यावर पोलिसांना सज्ज राहण्याच्या सूचना?
उल्हासनगरात पोलिसांकडून दंगल नियंत्रणाचं मॉकड्रिलImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 23, 2022 | 12:41 AM

उल्हासनगर : उल्हासनगरात पोलिसांनी शुक्रवारी अचानक दंगल नियंत्रणा (Riot control)चं मॉकड्रिल (Mockdrill) घेतलं. सध्याच्या परिस्थितीत पोलिसांना दंगलसदृश्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याच अनुषंगाने हे मॉकड्रिल घेण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. उल्हासनगर शहराचं मध्यवर्ती ठिकाण असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात शुक्रवारी संध्याकाळी अचानक पोलिसांच्या गाड्या येऊन धडकल्या. त्यामागोमाग फायर ब्रिगेड आणि अँबुलन्सही आल्या. हे चित्र पाहून काहीतरी मोठं घडल्याचा अंदाज येऊन नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकला. पण नंतर हे मॉकड्रिल असल्याचं स्पष्ट झालं आणि नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. (Mock drill of riot control by police in Ulhasnagar considering the current social situation in the state)

पोलिसांना कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना

सध्या भोंगे, हनुमान चालीसा यांवरून सुरू असलेलं राजकारण पाहता राज्यात सध्या धार्मिक, सामाजिक तेढ निर्माण होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर पोलिसांना कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठीच आजचं हे मॉकड्रिल घेण्यात आल्याची माहिती उल्हासनगरचे सहाय्यक पोलीस आयुक्त मोतीचंद राठोड यांनी दिली. या मॉकड्रिलमध्ये पोलीस कंट्रोल रुमकडून वायरलेसवर एक मेसेज देण्यात आला. त्यानंतर चार मिनिटात त्या परिसरातले बिट मार्शल तिथे पोहोचले. तर 15 मिनिटांच्या आत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह 100 पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला. या सर्वांना दंगलसदृश्य परिस्थिती उद्भवल्यास जमावाचा सामना कसा करायचा? याचं प्रात्यक्षिकही दाखवण्यात आलं. या मॉकड्रिलमुळे सध्या राज्यात सुरू असलेल्या परिस्थितीत काही विपरीत घडू नये, यासाठी पोलिसांनी मोर्चेबांधणी सुरू केल्याचं पाहायला मिळालं. (Mock drill of riot control by police in Ulhasnagar considering the current social situation in the state)

इतर बातम्या

Mumbai Crime : मुंबईच्या झवेरी बाजारात जीएसटी विभागाची कारवाई, भिंतीत 10 कोटींची रोकड, 19 किलो चांदीच्या विटा हस्तगत

Gunratna Sadavarte : गुन्ह्यांची यादी वाढता वाढता वाढे! सोलापुरात सदवर्तेंविरोधात आणखी एक गुन्हा

Non Stop LIVE Update
कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी, कशेडी बोगद्यातून तुम्ही प्रवास करताय?
कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी, कशेडी बोगद्यातून तुम्ही प्रवास करताय?.
शिंदेंच्या उमेदवारांची ठाकरे गटाशी थेट लढत, शिंदेंनी कुणाला दिली संधी?
शिंदेंच्या उमेदवारांची ठाकरे गटाशी थेट लढत, शिंदेंनी कुणाला दिली संधी?.
चिन्ह वेगळं, नावात साम्य, तुतारीवरून संभ्रम? कोल्हेंचा हल्लाबोल काय?
चिन्ह वेगळं, नावात साम्य, तुतारीवरून संभ्रम? कोल्हेंचा हल्लाबोल काय?.
2 दिवसात 6 सभा... मुस्लीम आरक्षण ते मंगळसूत्र, मोदींची काँग्रेसवर टीका
2 दिवसात 6 सभा... मुस्लीम आरक्षण ते मंगळसूत्र, मोदींची काँग्रेसवर टीका.
भटकती आत्मा... लोकसभेचा प्रचार तापला, मोदींची शरद पवारांवर सडकून टीका
भटकती आत्मा... लोकसभेचा प्रचार तापला, मोदींची शरद पवारांवर सडकून टीका.
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय.
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण.
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी.
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय.
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....