फ्लॅट बुक करण्यासाठी जबरदस्ती, फ्लॅट न देता पैसे भरण्यासाठी धमकी, भाजप नेते मंगलप्रभात लोढांवर गुन्हा दाखल

भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांच्यासह त्यांचा मुलगा आणि इतरांवर न्यायालयाच्या आदेशाने खंडणी आणि फसवणूक केल्याच्या आरोपाखाली पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे (case file against BJP MLA Mangal Prabhat Lodha).

फ्लॅट बुक करण्यासाठी जबरदस्ती, फ्लॅट न देता पैसे भरण्यासाठी धमकी, भाजप नेते मंगलप्रभात लोढांवर गुन्हा दाखल

पुणे : भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांच्यासह त्यांचा मुलगा आणि इतरांवर न्यायालयाच्या आदेशाने खंडणी आणि फसवणूक केल्याच्या आरोपाखाली पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका 54 वर्षीय महिलेने तक्रार दिली होती. संबंधित प्रकार 2013 ते मार्च 2021 या कालावधीत घडल्याचा दावा तक्रारदार महिलेने केला आहे (case file against BJP MLA Mangal Prabhat Lodha).

नेमकं प्रकरण काय?

तक्रारदार महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, मगलप्रभात लोढा, त्यांचा मुलगा आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी महिलेला वरळी येथे फ्लॅट बुक करण्यास भाग पाडले. पैसे भरण्यासाठी धमकी दिली. त्यानंतर फ्लॅट न देतो फसवणूक केली, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे (case file against BJP MLA Mangal Prabhat Lodha).

याप्रकरणी मंगलप्रभात लोढा, अभिषेक लोढा (रा. अपोलो मिल कंपाउंड, महालक्ष्मी, मुंबई) तसेच ज्वाला रियल इस्टेट प्रायव्हेट लि. आणि मायक्रोटेक डेव्हलपर्स लि. यांच्याद्वारे सुरेंद्रन नायर यांच्यावर चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याविरोधात कलम 384, 385, 406, 420, 120 (ब), 34 सह इतर कलमानव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोण आहेत मंगलप्रभात लोढा? 

  • मंगल प्रभात लोढा हे मुंबईतील उच्चभ्रू मलबार हिल विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत
  • मुंबईतील सर्वात मोठ्या लोढा ग्रुपचे (बिल्डर्स ग्रुपचे) ते संस्थापक आहेत.
  • मंगल प्रभात लोढा हे स्वांतत्र्य सैनिक आणि निवृत्त न्यायमूर्ती गुमान माल लोढा यांचे सुपुत्र आहेत.
  • त्यांचा जन्म 1 डिसेंबर 1955 रोजी जैन कुटुंबात झाला.
  • अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते म्हणून त्यांनी काम केलं.
  • 1995 पासून सलग पाच वेळा मलबार हिल या उच्चभ्रू मतदारसंघातून ते निवडून येत आहेत.
  • देशातील सर्वात श्रीमंत बिल्डर्सपैकी एक म्हणून मंगलप्रभात लोढा ओळखले जातात

हेही वाचा : गोड बोलून भोळ्या मुलींसोबत मैत्री, नंतर नातेवाईक आजारी असल्याचं सांगत पैशांसाठी याचना, भयानक चोरटा अखेर जेरबंद

Published On - 9:45 pm, Fri, 12 March 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI