AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde : युद्धपातळीवर काम करून उपायोजना करणार, चांदणी चौक परिसराच्या पाहणीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही

चौकात काम सुरू असल्याने मुंबईकडून येणाऱ्या एकेरी मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. आता वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सूचना केल्या आहेत.

Eknath Shinde : युद्धपातळीवर काम करून उपायोजना करणार, चांदणी चौक परिसराच्या पाहणीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
महामार्गांवरील वाहतूक कोंडीची मुख्यमंत्र्यांकडून दखल, गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिकाImage Credit source: tv9
Pradeep Garad
Pradeep Garad | Updated on: Aug 28, 2022 | 5:09 PM
Share

पुणे : चांदणी चौकात (Chandani Chowk) युद्धपातळीवर काम करून उपायोजना केली जाईल. पूल तोडण्याचे काम होईपर्यंत 100 ट्रॅफिक वॉर्डन याठिकाणी तैनात असतील. जड वाहतुकीचे नियोजन करण्यासाठीही उपाययोजना करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून चांदणी चौक परिसराची पाहणी करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, की उद्यापासून मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ याठिकाणी लागणार आहे. सर्व्हिस रोड (Service road) एकमेकांना जोडला जाईल. अधिक लेन सुरू होतील. हद्द नंतर पाहा. आधी नागरिकांना दिलासा द्या, अशा सूचना सर्व विभागांना दिल्याचे शिंदे म्हणाले. मात्र मुख्यमंत्र्यांसमोरच एकेरी मार्गावर वाहतूक कोंडी झाल्याचे दृश्य पाहायला मिळाले. या सर्व समस्यांवर लवकरच तोडगा निघेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे.

एकेरी मार्गावर वाहतूक कोंडी

चौकात काम सुरू असल्याने मुंबईकडून येणाऱ्या एकेरी मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. आता वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सूचना केल्या आहेत. ते चांदणी चौक परिसरात आले. त्यांनी पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की परवाच्या दिवशी मी इथून साताऱ्याकडे जात होतो, त्यावेळी येथील प्रवासी मला भेटले. त्यांनी येथील वाहतुकीची जी काही समस्या होती, ती माझ्या कानावर घातली. त्याचवेळी मी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, एनएचएआयचे अधिकारी या सर्व संबंधित विभागाशी फोनवरून संपर्क केला. काल साडेअकरा वाजता ही संपूर्ण टीम याठिकाणी येवून गेली. त्यांनी पाहणी केली, असे ते म्हणाले.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

‘संबंधित विभागांनी केली सर्व तयारी’

याठिकाणचा मधील पूल आहे, तो काढण्याची आवश्यकता आहे. चांदणी चौकातील वाहतूककोंडीतून स्थानिकांना दिलासा देण्यासाठी ज्या काही उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे, ती सर्व तयारी संबंधित विभागांनी केलेली आहे. त्या पार्श्वभूमीवर येथील सर्व परिसर पाहिला पाहिजे, या हेतूने आलो असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. इथल्या समस्या आहेत. काही बाबी कोर्टात प्रलंबित आहेत. यासर्व प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या हेतूने आमची टीम काम करत आहे, असे यावेळी त्यांनी सांगितले.

Follow Us
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज ठाकरेंचा मोठा निर्णय! यंदा...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज ठाकरेंचा मोठा निर्णय! यंदा शिवाजी पार्कचा दीपोत्सव रद्द
भारतीय जनता पक्षाविरुद्ध देशात तिरस्कार निर्माण झालाय आता... संजय राऊत
भारतीय जनता पक्षाविरुद्ध देशात तिरस्कार निर्माण झालाय आता... संजय राऊत आक्रमक
व्हायरल व्हिडिओवर श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'तो केवळ...
व्हायरल व्हिडिओवर श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'तो केवळ थट्टा-मस्करीचा भाग, नेमकी भानगड काय?
राजू शेट्टींसह शेतकरी आक्रमक, पुणे-बंगळूर महामार्ग रोखला; वाहतुक कोंडी
राजू शेट्टींसह शेतकरी आक्रमक, पुणे-बंगळूर महामार्ग रोखला; मोठी वाहतुक कोंडी
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून डिस्चार्ज
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून डिस्चार्ज आता प्रकृती स्थिर, डॉक्टरांनी...
शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; कोणत्या मुद्द्यावर होणा
Shivsena Hearing : शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; कोणत्या मुद्द्यावर होणार युक्तीवाद?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या हालाचाली? कोअर कमिटीची बैठक
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या हालाचाली? कोअर कमिटीची अत्यंत महत्त्वाची बैठक, नेमकं कारण...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! हिंगोलीतील बडा नेता शिंदे गटात...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! हिंगोलीतील बड्या नेत्याचा समर्थकांसह शिंदे गटात प्रवेशाचा निर्णय
Donald Trump: अमेरिकेतही आकडे फिरले? मध्यवर्ती निवडणूकांच्या प्राथमिक
Donald Trump: अमेरिकेतही आकडे फिरले? मध्यवर्ती निवडणूकांच्या प्राथमिक कलांमध्ये ट्रम्प यांना मोठा धक्का
अनिल अंबानी समूहाला मोठा दणका! 510 कोटींची मालमत्ता जप्त, मोठं कारण...
अनिल अंबानी समूहाला मोठा दणका! 510 कोटींची मालमत्ता जप्त, मोठं कारण समोर