नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्याचा ठाकरी बाणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दाखवू शकत नाहीत कारण … – प्रवीण दरेकरांची खोचक टीका

संजय राठोड )यांच्यामुळे निष्पाप मुलीला आत्महत्या करावी लागली. ती केस दाबली गेली, हा सत्तेचा गैरवापर आहे. नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत वक्तव्य केल्यावर अटकेचे वॉरंट काढले. नाना पटोले यांनी पंतप्रधानांचा एकेरी उल्लेख केला, तरी कारवाई नाही. राज्य सरकार सूड भावनेने करत आहे.

नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्याचा ठाकरी बाणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दाखवू शकत नाहीत कारण ...  - प्रवीण दरेकरांची खोचक टीका
प्रवीण दरेकर
| Edited By: | Updated on: Mar 01, 2022 | 6:51 PM

पुणे – ‘नवाब मलिक यांना अटक झाल्यावर नवाब जणू काही साधू संत, अहिंसेचे पुजारी असल्यासारखे महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर राज्य सरकारने (State Government) आंदोलन केले. हे महाराष्ट्रात कधी घडले नव्हते. भाजपवर (BJP)सातत्याने आरोप केला जातो की भाजपा यंत्रणा गैरवापर करते. अनिल देशमुख यांच्यावरील कारवाईची मागणी भाजपने केली नाही. सरनाईक निधी गैरव्यवहार प्रकरण, आव्हाड मारहाण प्रकरण यात भाजपने काय केले? संजय राठोड ( sanjay  rathod)यांच्यामुळे निष्पाप मुलीला आत्महत्या करावी लागली. ती केस दाबली गेली, हा सत्तेचा गैरवापर आहे. नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत वक्तव्य केल्यावर अटकेचे वॉरंट काढले. नाना पटोले यांनी पंतप्रधानांचा एकेरी उल्लेख केला, तरी कारवाई नाही. राज्य सरकार सूड भावनेने करत आहे. पोलिस यंत्रणेचा गैरवापर सुरू आहे. चोराच्या उलट्या बोंबा सुरू आहेत. अशी टीका विरोधी पक्ष नेतेप्रवीण दरेकर यांनी केली आहे.

दोषी आढळल्यावर ईडीने अटक

3 फेब्रुवारी २०२२ रोजी दाऊद विरोधात एफआयआर , छाप्यामध्ये जबाब आले. त्यात कुर्ला जागेचा विषय पुढे आला आहे. बॉम्बस्फोटामधील आरोपीची जागा नवाब मलिकने विकत घेतली. दोषी आढळल्यावर ईडीने अटक केली. नैतिकतेच्या मुद्द्यावर याआधी महाराष्ट्रात मंत्र्यांनी राजीनामे दिले पाहिजेत. आता ठाकरी बाणा कुठे गेला? त्यांना पटत असेल, पण बोलणार कसे? राष्ट्रवादीने पाठिंबा काढला तर सत्तेचे काय होणार, त्यामुळे मुख्यमंत्री हतबल आहेत. नवाब मलिक देशभक्त असल्याप्रमाणे आव आणला जात आहे. नवाब हटाओ, देश बचाओ.

Russia-Ukraine War: युक्रेनमधील अडकलेल्या सर्व विद्यार्थ्यांना परत आणा; प्रचितीच्या आई-वडिलांचा टाहो
शरीरात काही लक्षणं दिसताच करू नका दुर्लक्ष, वेळीच व्हा सावध, अन्यथा लिव्हर होऊ शकते खराब!

युक्रेनमध्ये ठार झालेल्या नवीनच्या कुटुंबीयांचं मोदींकडून सांत्वन; पंतप्रधानांनी बोलावली तातडीची बैठक