Russia-Ukraine War: युक्रेनमधील अडकलेल्या सर्व विद्यार्थ्यांना परत आणा; प्रचितीच्या आई-वडिलांचा टाहो

क्रेनमधील खारकीव येथे प्रचिती आंगणे ही विद्यार्थीनी अजूनही अडकलेली आहे. चार दिवसांपूर्वी तिने एक व्हिडीओ व्हायरल करून आपण बंकर्समध्ये अडकलो असून आपल्याला मदत करावी, असं आवाहन केलं होतं.

Russia-Ukraine War: युक्रेनमधील अडकलेल्या सर्व विद्यार्थ्यांना परत आणा; प्रचितीच्या आई-वडिलांचा टाहो
युक्रेनमधील अडकलेल्या सर्व विद्यार्थ्यांना परत आणा; प्रचितीच्या आई-वडिलांचा टाहो
Follow us
| Updated on: Mar 01, 2022 | 5:57 PM

मुंबई: युक्रेनमधील (Russia-Ukraine War) खारकीव येथे प्रचिती आंगणे (prachiti angane) ही विद्यार्थीनी अजूनही अडकलेली आहे. चार दिवसांपूर्वी तिने एक व्हिडीओ व्हायरल करून आपण बंकर्समध्ये अडकलो असून आपल्याला मदत करावी, असं आवाहन केलं होतं. मात्र, प्रचितीची अजूनही युक्रेनहून मायदेशी परतली नसल्याने तिचे आईवडील चिंतेत आहेत. आपली मुलगी कधी परत येईल हिच चिंता प्रचितीच्या आईवडिलांना सतावत आहे. सध्या खारकीव येथे रशियन सैन्याचा हल्ला वाढला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi)  यांनी प्रचिती आणि तिच्या सोबत अडकलेल्या आपल्या देशातील इतर विद्यार्थ्यांना देखील लवकरात लवकर सुखरूप मायदेशी आणावे अशी विनंती प्रचितचे वडील प्रशांत आंगणे यांनी केली आहे. रशियाकडून युक्रेनवर प्रत्येक दिवशी आक्रमकपणे हल्ले करण्यात येत आहेत. त्यामुळेही प्रचितीच्या आईवडिलांना चिंता लागून राहिली आहे.

प्रचिती आणि इतर विद्यार्थ्यांना बंकरमध्येच ठेवण्यात आले आहे. आमची काळजी वाढू नये म्हणून तिला होत असलेला त्रास ती संगत नाहीये. पण तिच्या आवाजाहून कळत की त्यांना आता व्यवस्थित खायला मिळत नाहीये. त्यांच्या अडचणी वाढू लागल्या आहेत, असं प्रचितीची आई पल्लवी आंगणे यांनी सांगितलं. पल्लवी या आता रोज देवा समोर प्रार्थना करत आहेत. आपली मुलगी सुखरूप घरी परत यावी हेच साकडं त्या देवाला घालत आहेत.

प्रचितीचा तो व्हिडीओ काय?

चार दिवसांपूर्वी प्रचितीने एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यावेळी तिने आम्हाला मायदेशी न्या असं आवाहन भारत सरकारला केलं होतं. आम्हाला बंकर्समध्ये ठेवलंय. भारतीय आणि पाकिस्तानी विद्यार्थी या बंकर्समध्ये आहेत. यूपीचे विद्यार्थीही आमच्यासोबत आहेत. महाराष्ट्रातील इतर विद्यार्थी दुसऱ्या बंकर्समध्ये आहेत. संध्याकाळी 4 वाजता आम्हाला या बंकर्समध्ये आणलं. आम्हाला खायला दिलंय. आम्ही सुरक्षित आहोत. पण भीतीदायक परिस्थिती आहे. ब्लास्टचे आवाज अधूनमधून ऐकायला येत आहेत. कुठेही जाण्यास आम्हाला मज्जाव करण्यात आला आहे. आम्हाला वॉशरुमलाही एकएकट्या पाठवलं जातंय. परिस्थिती खूपच खराब होत चालली आहे. आमची भारताचे पंतप्रधान आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, आम्हाला लवकरात लवकर बाहेर काढा. आमची परिस्थिती समजून घ्या, आम्ही खूप घाबरलो आहोत, असं प्रचितीने म्हटलं होतं.

संबंधित बातम्या:

Russia Ukraine War: आहे त्या साधनांसह क्यीव सोडा, असं काय घडण्याची भीतीय भारत सरकारला? असा निर्वाणीचा इशारा द्यावा लागला

नवीनचा मृतदेह शक्य तितक्या लवकर भारतात आणू, परराष्ट्र मंत्रालयाकडून नवीनच्या कुटुंबीयांचं सांत्वन

Russia Ukraine War: तो किराणा आणण्यासाठी बाहेर पडला अन्..यूक्रेनमध्ये नवीनचा मृत्यू कसा झाला? परराष्ट्र मंत्रालयानं घटना सांगितली

Non Stop LIVE Update
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.