सत्तेत असल्यावर महिला सबलीकरणाची व्याख्या बदलते का? चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंना सवाल

योगेश बोरसे

| Edited By: |

Updated on: Sep 05, 2021 | 7:50 PM

महिला सरपंचांच्या मान मर्यादा भंग झाल्या आहेत.महिलांवर झालेल्या अत्याचारसंदर्भात आरोपीना जामीन मिळता कामा नये, यावर कायदा करायला पाहिजे, असं चित्रा वाघ म्हणाल्या.

सत्तेत असल्यावर महिला सबलीकरणाची व्याख्या बदलते का? चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंना सवाल
Chitra-Wagh
Follow us

पुणे: भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पुण्यातील महिला सरपंच गौरी गायकवाड यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी गौरी गायकवाड यांची विचारपूस करत महाविकास आघाडी सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं. मुख्यमंत्र्यांना माझा सवाल आहे, महिलांना मारहाण करणाऱ्यावर काही कारवाई केली जात नाहीय, असा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे.

महिलांना मरणयातना झाल्यावर गुन्हे दाखल होणार का?

चित्रा वाघ यांनी निलेश लंकेमुळे आरोग्य सेविका रजेवर गेलीय, याच उत्तर सरकारने द्यायला पाहिजे. महिलांना मरणयातना झाल्यावरच गुन्हे दाखल होतील का ?, असा सवाल चित्रा वाघ यांनी केला. महिला सरपंचांच्या मान मर्यादा भंग झाल्या आहेत.महिलांवर झालेल्या अत्याचारसंदर्भात आरोपीना जामीन मिळता कामा नये, यावर कायदा करायला पाहिजे.गौरी गायकवाडची केस ही राज्यातील प्रातिनिधिक स्वरूपाची आहे. ज्योती देवरेची एक क्लिप व्हायरल झाली लगेच तिला त्रास दयायला सुरुवात झाली. यासंदर्भात मी सीपीशी बोलले आहे, असं चित्रा वाघ म्हणाल्या.

सत्तेत आल्यावर महिला सबलीकरणाची व्याख्या बदलते का?

चित्रा वाघ यांनी सत्तेत आल्यानंतर महिलांच्या सबलीकरणाची व्याख्या बदलते का ?, असा सवाल केला. विरोधात असताना घसा कोरडा होईपर्यंत महिला सबलीकरणावर बोलायचे ते कुठे गेलेत असा टोला वाघ यांनी सुप्रिया सुळेंना लगावला. आत्ताची राष्ट्रवादी साहेबाची राष्ट्रवादी नाही, असंच दिसतंय, असं चित्रा वाघ म्हणाल्या.

भाजपमध्ये सन्मान मिळतोय

मंदा म्हात्रे यांच्या संदर्भात विचारलं असता. मला असं काही वाटत नाही भाजपामध्ये सम्मान मिळत नाही, मी भाजपमध्ये काम करतोय, मला सम्मान मिळतोय, मला माहित नाही मंदा म्हात्रे यांना कसा सम्मान अपेक्षित आहे ? भारती पवार यांना केंद्रीय मंत्री केले, असल्याचा दाखला चित्रा वाघ यांनी दिला.

रुपाली चाकणकर यांच्याकडून विचारपूस नाही

मारहाण झालेल्या सरपंच गौरी गायकवाड यांनी राष्ट्रवादीकडून मला त्रास दिला जातो. ग्रामपंचायतीमध्ये काम करताना मला त्रास दिला जातो, असं म्हटलं. लसीकरणावरून राष्ट्रवादीकडून माझ्यावर दबाव आहे.मात्र उद्यापासून मी पुन्हा ग्रामपंचायतीचे जोमाने काम करणार असल्याचं गौरी गायकवाड म्हणाल्या. रुपाली चाकणकर यांनीही विचारपूस केली नाही, असं गायकवाड म्हणाल्या.

इतर बातम्या

मग तालिबानमध्ये जा, केंद्रीय मंत्री कपिल पाटलांचा जावेद अख्तर यांना अजब सल्ला

IND vs ENG : विराटची शतकाची प्रतिक्षा लांबली, ड्रेसिंग रुममध्ये परतताना विराट कमालीचा नाराज, पाहा PHOTO

Chitra Wagh ask question over stand NCP on women empowerment

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI