शीतल म्हात्रे प्रकरणी महिला आयोगाने उचलले हे धाडसी पाऊल; थेट कारवाईचे दिले आदेश

| Updated on: Mar 13, 2023 | 9:10 PM

लोकप्रतिनिधींबाबत जर असे प्रकार होत असतील तर समस्त महिलावर्ग राज्यात सुरक्षित आहेत का असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. महिलांना सायबर सुरक्षा प्रदान करणे हे ही तितकेच गरजेचे असल्याचेही रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे.

शीतल म्हात्रे प्रकरणी महिला आयोगाने उचलले हे धाडसी पाऊल; थेट कारवाईचे दिले आदेश
Follow us on

मुंबई :  शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा व्हिडीओ सोशल मीडियावरून प्रचंड व्हायरल करण्यात आला होता. त्यावर आक्षेप नोंदवत शीतल म्हात्रे यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आता सार्वजनिक ठिकाणी अश्लिल कृत्य केल्याच्या आरोपाखाली म्हात्रे यांच्यावरच गुन्हा दाखल करण्याची मागणी ठाकरे गटाने केली होती. त्यामुळे आता दोन्ही गटाचा हा वाद चालू असतानाच महिला आयोगाने धाडसी निर्णय घेत आता या प्रकरणातील सत्यता तपासून त्याची चौकशी करण्याची मागणी गृह विभागाकडे करण्यात आली आहे. त्यामुळे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ठोस भूमिका घेत शीतल म्हात्रे यांच्या व्हिडीओ प्रकरणी आता गृह विभागाने कडक भूमिका घेऊन त्याची चौकशी करावी अशी मागणी केली आहे.

त्यामुळे आता हे प्रकरण गृह विभागाकडे गेल्याने या प्रकरणातून नेमकं काय बाहेर पडणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विट करत शीतल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वे यांच्या प्रकरणी महिला आयोग गांभीर्याने विचार करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

या प्रकरणी त्या म्हणाल्या की, शीतल म्हात्रे यांच्याबाबतीतचा व्हिडिओ समाज माध्यमांवरून प्रसारित केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे.

 

या प्रकारामुळे राज्यातील महिला लोकप्रतिनिधींना माध्यमांवरून ट्रोल करण्याचे प्रकारही सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे महिलांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्नही केला जात आहे.

त्यामुळे अशा प्रकारामुळे लोकप्रतिनिधींबाबत जर असे प्रकार होत असतील तर समस्त महिलावर्ग राज्यात सुरक्षित आहेत का असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. महिलांना सायबर सुरक्षा प्रदान करणे हे ही तितकेच गरजेचे असल्याचेही रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे.

शीतल म्हात्रे यांच्या या प्रकरणामुळे राज्यातील महिला आणि महिला लोकप्रतिनिधींच्याही सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. त्यामुळे या प्रकरणांमध्ये सायबर गुन्हे विभागाने गांभीर्याने आणि तातडीने कारवाई करावी तरच त्यावर वेळीच पायबंद बसणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

त्यामुळे शीतल म्हात्रे यांच्या व्हिडिओ प्रकरणी गृह विभागाने योग्य ती कारवाई तात्काळ करावी व त्यामागील नेमके सत्य समोर आणावे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.