आम्हाला घरं फोडण्याचं काही कारण नाही; भूषण सुभाष देसाई यांच्या पक्षप्रवेशावरून शिवसेनेने आपली बाजू सांगितली

भरत गोगावले यांनी घर फोडण्याच्या आरोपावर ठाकरे गटाला उत्तर देताना ते म्हणाले की, आता हजारो कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. त्यांना आम्ही जाऊन सांगतो का असा प्रतिसवाल त्यांनी केला आहे.

आम्हाला घरं फोडण्याचं काही कारण नाही; भूषण सुभाष देसाई यांच्या पक्षप्रवेशावरून शिवसेनेने आपली बाजू सांगितली
Follow us
| Updated on: Mar 13, 2023 | 8:22 PM

मुंबई : राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांचे सुपुत्र भूषण देसाई यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने चर्चेला उधाण आले आहे. भूषण सुभाष देसाई यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केल्याने आता ठाकरे गटाकडून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून घर फोडण्याचे काम सुरू असल्याची टीका केली जात आहे. ठाकरे गटाकडून शिवसेनेवर ही टीका केली जात असल्याने आता शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांनी जोरदार पलटवार केला आहे. भूषण सुभाष देसाई यांनी स्वतःच्या मनाने आणि एकनाथ शिंदे यांच्या कामाकडे बघून त्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे.

त्यामुळे आम्ही घर फोडण्याचे वगैरे काम करत नसून ज्यांना शिवसेनेचे काम पटते, ज्यांना एकनाथ शिंदे यांचे काम भावते ते एकनाथ शिंदे यांच्याबरोबर येत आहेत अशा शब्दात भरत गोगावले यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

भूषण सुभाष देसाई यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केल्यानंतर राजकीय चर्चेना उधाण आले आहे. त्यामुळे भूषण देसाई यांच्यावर चौकशीमुळे त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात आली आहे.

त्यांच्याविषयी बोलताना भरत गोगावले यांनी सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची सूरु असलेली वाटचाल आणि राज्यातील महायुतीचे सरकार करत असलेल्या कामाच्या प्रभावामुळेच पक्षप्रवेश करत असल्याचे गोगावले यांनी सांगितले.

तर एकनाथ शिंदे यांच्य कामामुळे आपण शिवसेनेत पक्षप्रवेश करत असल्याचेही भूषण देसाई यांनी यावेळी सांगितले. कोणत्याही दबावाखाली किंवा चौकशीला घाबरून पक्षप्रवेश करत नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

भूषण सुभाष देसाई यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केल्यामुळे घर फोडण्याचा आरोप ठाकरे गटाने शिवसेनेवर केला आहे. त्यावर बोलताना शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांनी सांगितले की, एकनाथ शिंदे यांच्या कामाला अनेक माणसं प्रभावित झाली आहेत. त्यामुळे अनेक जण आता शिवसेनेच्या वाटेवर आहेत.

भरत गोगावले यांनी घर फोडण्याच्या आरोपावर ठाकरे गटाला उत्तर देताना ते म्हणाले की, आता हजारो कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. मग त्या सगळ्यांना आम्ही काही थेट सांगितले नाही. कारण एकनाथ शिंदे यांच्या कामावर प्रभावित झाल्यामुळे लोकं शिवसेनेत प्रवेश करत आहे असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.