AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवार एकटे नाही तर हा मोठा नेताही अपघाताच्या दिवशी जाणार होता बारामतीला, शेवटच्या क्षणी…

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने मोठी खळबळ उडाली. सर्वांनाच मोठा धक्का बसला. अजित पवार यांचे जाणे चटका लावू जाणारे आहे. यादरम्यान राज्यातील एका मोठ्या नेत्याने एक दावा केला.

अजित पवार एकटे नाही तर हा मोठा नेताही अपघाताच्या दिवशी जाणार होता बारामतीला, शेवटच्या क्षणी...
Ajit Pawar plane accident
| Updated on: Feb 05, 2026 | 2:40 PM
Share

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने मोठी खळबळ उडाली. अजित पवार मुंबईहून बारामतीकडे निघाले असता त्यांच्या विमानाचा मोठा अपघात झाला. सुरूवातीला सांगितले गेले की, अजित पवार विमान अपघातात गंभीर जखमी झाले. त्यानंतर थेट त्यांच्या निधनाची बातमी आली. अजित पवार यांचे विमान आकाशात एका बाजूला झुकताना दिसले. काही क्षणात मोठा अपघात या विमानाचा झाला आणि मोठे चार ते पाच स्फोट झाले. विमान अपघाताबद्दल दररोज वेगवेगळे खुलासे होताना दिसत आहेत. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर संपूर्ण पवार कुटुंब एकत्र दिसले. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि संपूर्ण पक्षाची धुरा आपल्या हातात घेतली. मात्र, पवार कुटुंबियांसोबत कोणतीही चर्चा न करता सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचे सूत्रे आपल्या हातात घेतले. ज्यावर शरद पवार स्पष्टपणे बोलताना दिसले.

आता नुकताच अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर अत्यंत मोठी माहिती पुढे येताना दिसत आहे. अजित पवार यांच्यासोबत राज्यातील अजून एक मोठा नेता मुंबईहून बारामतीसाठी जाणार होता. विशेष म्हणजे दोघेही एकाच विमानातून प्रवास करणार होते. मात्र, त्यांना पोहोचण्यास उशीर झाल्याने अजित पवार पुढे निघून गेले.

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री महादेव जानकर यांनी याबाबत खळबळजनक माहिती दिली आहे. ज्यादिवशी भीषण अपघात झाला, त्यादिवशी महादेव जानकर हे देखील त्यांच्यासोबत विमानातून जाणार होते. महादेव जानकर यांनी म्हटले की, त्यादिवशी अजित पवार यांनी मला बारामतीमध्ये येण्यासाठी निमंत्रण दिले होते. मी आणि अजित पवार एकाच विमानातून जाणार होतो.

पण मला पोहोचायला उशीर झाला. अजित पवार यांचे विमान ठरलेल्या वेळेत निघून गेले. मला पोहोचण्यासाठी उशीरा झाला आणि मी बारामतीला जाणे रद्द केले. मला विमानतळावर जाण्यास उशीर झाल्याने माझा जीव वाचला असला तरीही राज्याने एक मोठा नेता नक्कीच गमावले आहे. अजित पवार यांच्या अपघातानंतर दु:ख व्यक्त करताना महादेव जानकर हे दिसले.

Follow Us
तुम्ही वेळ घ्या, पंतप्रधान तुम्हालादेखील भेटतील; शिंदे गटातील बड्या...
तुम्ही वेळ घ्या, पंतप्रधान तुम्हालादेखील भेटतील; शिंदे गटातील बड्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला
बापरे! चप्पल, बूट अन् चिखलाचा मारा; ममता बॅनर्जींच्या दौऱ्यादरम्यान
बापरे! चप्पल, बूट अन् चिखलाचा मारा; ममता बॅनर्जींच्या दौऱ्यादरम्यान धक्कादायक घटना, व्हिडीओच आला समोर
जरांगेंना मिरची लागली, ते हवेवर...गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंवर संताप
जरांगेंना मिरची लागली, ते हवेवर...गुणरत्न सदावर्ते  मनोज जरांगेंवर भडकले; सडकून टीका!
मोठी बातमी! पुण्यातील नामांकित पबवर कारवाई; तब्बल 62 जणांची...
मोठी खळबळ! पुण्यातील नामांकित पबवर कारवाई; तब्बल 62 जणांची... नेमकी भानगड काय?
रक्तदान महादान! 1200 शिवसैनिकांचा समावेश; दिल्लीत शिवसेनेकडून 'सिंदुर'
रक्तदान महादान! 1200 शिवसैनिकांचा समावेश; दिल्लीत शिवसेनेकडून 'सिंदुर' महारक्तदान शिबीराचे आयोजन
पंढरपूरात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत! पहा Video
Manoj Jarange Patil | पंढरपूरात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत! फुलांचा वर्षाव अन्... पहा व्हिडीओ
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील नेत्याचा एकाच विमानाने प्रवास
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील बड्या नेत्याचा एकाच विमानाने प्रवास, फोटो आले समोर
मी समाजासाठी जीवघेणं उपोषणही करु शकतो तर कोणाचा जीवही घेऊ शकतो- जरांगे
मी समाजासाठी जीवघेणं उपोषणही करु शकतो तर कोणाचा जीवही... भर मंचावरून मनोज जरांगे कडाडले; आता...
Big Breaking| बारामती विमान दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर
Big Breaking | बारामती विमान दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर; नेमकं काय घडलं? पहा व्हिडीओ