सीरम इन्स्टिट्यूट पुणे महापालिकेला लस देण्यास तयार, मात्र केंद्राची परवानगी मिळणार?

पुणे महापालिका सीरम इन्स्टिट्यूटकडे सातत्याने पाठपुरावा करत आहे. अशावेळी महापालिकेच्या मागणीला सीरमकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

सीरम इन्स्टिट्यूट पुणे महापालिकेला लस देण्यास तयार, मात्र केंद्राची परवानगी मिळणार?
सीरम इन्स्टिट्यूटची कोविशील्ड लस आणि पुणे महापालिका
Follow us
| Updated on: May 25, 2021 | 3:43 PM

पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून कोरोना लसीकरणावर अधिक भर दिला जात आहे. मात्र, लसीच्या तुटवड्यामुळे लसीकरण मोहीम अतिशय संथ गतीने सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. अशावेळी काही महानगरपालिकांनी स्वबळावर लस मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं ग्लोबल टेंडर काढलंय. तर पुणे महापालिका सीरम इन्स्टिट्यूटकडे सातत्याने पाठपुरावा करत आहे. अशावेळी महापालिकेच्या मागणीला सीरमकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. मात्र, आता महापालिकेला केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे. (Serum Institute ready to give corona vaccine to Pune Municipal Corporation)

सीरम इन्स्टिट्यूटने पुणे महापालिकेला लस देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, लसीसाठी पुणे महापालिकेला केंद्र सरकारकडून आवश्यक परवानगी घ्यावी लागणार आहे. तसं पत्र सीरम इन्स्टिट्यूटकडून पुणे महापालिकेला देण्यात आलंय. सीरम इन्स्टिट्यूटकडून लस मिळावी यासाठी पुणे महापालिका गेल्या 3 आठवड्यापासून पाठपुरावा करत आहे. अशावेळी सीरमने परवानगी दिली आहे. पण केंद्र सरकार परवानगी देणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना पत्र

सीरम इन्स्टिट्यूटकडून पत्र प्राप्त झाल्यानंतर पुणे महापालिकेनं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना पत्र लिहिलं आहे. त्यामध्ये सीरम इन्स्टिट्यूटकडून लसीच्या खरेदीची परवानगी मिळावी अशी मागणी महापालिकेकडून करण्यात आलीय. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका दोन दिवसांत जागतिक निविदा काढणार असल्याची माहितीही महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिलीय.

सिरम इन्स्टिट्युटची तयारी पण तांत्रिक अडचणीमुळे विलंब

सिरम इन्स्टिट्युटची पुण्याला लस देण्याची तयारी आहे. पण त्यासाठी काही तांत्रिक अडचणी आहेत. या अडचणी सोडविण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडे पाठपुरावा केला जात आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली होती. तसेच यासंदर्भात मुरलीधर मोहोळ, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने आणि आयुक्त विक्रम कुमार यांनी सीरम इन्स्टिट्युटला भेट देऊन येथील अधिकार्‍यांशी चर्चा केल्याचे बोललं जात आहे. यावेळी पुण्याला लस देण्याचा आग्रही मागणी करण्यात आली.

पुण्यात म्युकरमायकोसीसचे 20 बळी

पुणे जिल्ह्यात म्युकोरमायकोसिसने आतापर्यंत 20 जणांचा बळी गेला आहे. पुण्यात एकूण 353 म्युकोरमायकोसिस रुग्ण आढळले आहेत. पुणे शहर हद्दीत आतापर्यंत 11 मृत्यू झाले आहेत. सुदैवाने 212 रुग्ण म्युकोरमायकोसिस मधून बाहेर पडले आहेत. तर पुण्यात सद्यस्थितीत 115 जणांवर उपचार सुरु आहेत.

संबंधित बातम्या :

पुण्यात लसीकरणाच्या नावाने भाजप नगरसेवकांकडून नागरिकांची गोपनीय माहिती चोरी, राष्ट्रवादीचा गंभीर आरोप

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा वाढता धोका, लहान मुलांसाठी स्वतंत्र कक्ष राखीव ठेवा : अजित पवार

Serum Institute ready to give corona vaccine to Pune Municipal Corporation

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.