पुण्याच्या ग्रामीण भागात 55 टक्के लसीकरण, मुळशी आणि वेल्हा तालुक्याची लसीकरणात आघाडी

Covid vaccine | ग्रामीणमधील 13 तालुक्‍यांत एकूण लसीकरण लाभार्थ्यांची संख्या 27 लाख 57 हजार 621 इतकी आहे. यापैकी11 लाख 89 हजार 427 लाभार्थ्यांनी घेतला लसीचा पहिला डोस मिळाला आहे.

पुण्याच्या ग्रामीण भागात 55 टक्के लसीकरण, मुळशी आणि वेल्हा तालुक्याची लसीकरणात आघाडी
लसीकरण मोहीम
Follow us
| Updated on: Jul 05, 2021 | 9:59 AM

पुणे: पुण्याच्या ग्रामीण भागातील 13 तालुक्यांमध्ये आतापर्यंत 54.84 टक्‍के नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. मुळशी आणि वेल्हा तालुक्‍यात सर्वाधिक तर हवेली तालुक्‍यात सर्वांत कमी लसीकरण झाले. (Coronavirus vaccination in Pune)

ग्रामीणमधील 13 तालुक्‍यांत एकूण लसीकरण लाभार्थ्यांची संख्या 27 लाख 57 हजार 621 इतकी आहे. यापैकी11 लाख 89 हजार 427 लाभार्थ्यांनी घेतला लसीचा पहिला डोस मिळाला आहे. तर 3 लाख 22 हजार 708 जणांना कोरोना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. दरम्यान, एकूण लाभार्थींच्या तुलनेत पहिला डोस घेणाऱ्यांमध्ये 15 लाख 40 हजार 492 लाभार्थी शिल्लक आहेत. तर तर दुसरा डोस घेणाऱ्यांची शिल्लक लाभार्थी संख्या 8 लाख 66 हजार 719 इतकी आहे.

पुण्यातील लसीकरणाचा वेग वाढला, जून महिन्यात सर्वाधिक लसीकरण

गेल्या सहा महिन्यापासून संथगतीने सुरु असणाऱ्या पुण्यातील लसीकरणाचा वेग जून महिन्यात वाढल्याचे दिसून आले आहे. जून महिन्यात 7लाख 33 हजार 82 जणांचे लसीकरण (Vaccination) करण्यात आले. यामध्ये 18 वर्षांपुढील नागरिकांचा समावेश आहे. जून महिन्यात झालेले लसीकरण हे पुण्यात आतापर्यंत एकाच महिन्यात झालेले सर्वाधिक लसीकरण आहे. जानेवारी ते मे अखेरपर्यंत शहरातील लसीकरण अडखळत सुरू होते. त्यामुळे 10 लाख लसींचा टप्पा गाठण्यासाठी 28 मे पर्यंतची वाट पहावी लागली होती. 2 जुलैपर्यंत शहरात 18 लाख 13 हजार 516 जणांनी लस घेतली आहे, अजूनही शहरासाठी 46 लाख डोसची आवश्‍यकता आहे.

आगामी काळात लसीकरणाचा वेग आणखी वाढवण्याची रणनीती पुणे महानगरपालिकेने आखली आहे. कोरोनाचे सुपर स्प्रेडर ठरण्याची शक्यता असलेल्या व्यापाऱ्यांना दुकानात जाऊन लस देण्यात येईल.महापालिकेच्या वतीने लक्ष्मी रस्त्यावरील व्यापार्‍यांसाठी लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. ही मोहिम गुरुवारपासून लसीच्या (Coronavirus Vaccine) उपलब्धतेनुसार राबविली जाईल, अशी माहिती पालिकेच्यावतीने देण्यात आली. याशिवाय सध्या पुणे महानगरपालिकेकडून दिव्यांग, रस्त्यांवरील नागरिक, झोपडपट्ट्यांमधील नागरिकांचे लसीकरण सुरु असल्याचेही अतिरिक्त महापालिका आयुक्त रुबल अग्रवाल यांनी सांगितले.

संबंधित बातम्या : 

पुण्याच्या ‘या’ भागातील 81 टक्के लोकांमध्ये कोरोनाच्या अँटीबॉडीज; सिरो सर्वेक्षणाचा निष्कर्ष

लसीकरणात महाराष्ट्राची रेकॉर्डब्रेक कामगिरी सुरुच, दिवसभरात आठ लाख नागरिकांचे लसीकरण

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आरोग्ययंत्रणा बळकट करा, अजित पवारांचे निर्देश

(Coronavirus Vaccination in Pune)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.