Vaishnavi Patil: “अर्धवट ज्ञानातून आमच्याकडून चूक झाली, माफ करा”; लाल महालात लावणीप्रकरणी वैष्णवी पाटीलचा माफीनामा

ऐतिहासिक लाल महालात डान्स करणाऱ्या डान्सर वैष्णवी पाटीलसह (Vaishnavi Patil) चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी वैष्णवीने 'चंद्रमुखी' या चित्रपटातील 'चंद्रा' या गाण्यावर लावणीचा व्हिडीओ लाल महालात शूट केला होता.

Vaishnavi Patil: अर्धवट ज्ञानातून आमच्याकडून चूक झाली, माफ करा; लाल महालात लावणीप्रकरणी वैष्णवी पाटीलचा माफीनामा
Vaishnavi PatilImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 21, 2022 | 12:12 PM

पुण्यातील (Pune) लाल महालमध्ये (Lal Mahal) लावणी नृत्याचा व्हिडीओ शूट केल्याप्रकरणी राज्यभरात त्यावर निषेध व्यक्त होतोय. ऐतिहासिक लाल महालात डान्स करणाऱ्या डान्सर वैष्णवी पाटीलसह (Vaishnavi Patil) चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी वैष्णवीने ‘चंद्रमुखी’ या चित्रपटातील ‘चंद्रा’ या गाण्यावर लावणीचा व्हिडीओ लाल महालात शूट केला होता. हा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर पोस्ट करताच त्यावरून विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या. वैष्णवीच्या या कृत्यावर सोशल मीडियावरून टीका झाली. तर संभाजी ब्रिगेडसग पुरोगामी संघटनांनी या घटनेविषयी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आता याप्रकरणी वैष्णवीने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत जाहीर माफी मागितली आहे. “अनवधानाने माझ्याकडून चूक झाली, मला माफ करा”, असं ती या व्हिडीओत म्हणाली आहे.

काय म्हणाली वैष्णवी पाटील?

“काही दिवसांपूर्वी मी पुण्यातील लाल महालात चंद्रा लावणी या डान्सचा व्हिडीओ केला होता. तो व्हिडीओ करत असताना माझ्या ध्यानीमनीसुद्धा आलं नव्हतं की असं काही होईल. मी एक डान्सर म्हणून तो व्हिडीओ केला. शिवप्रेमींचं आणि तुम्हा सर्वांचं मन दुखावण्याचा माझा अजिबात हेतू नव्हता. मी स्वत: शिवप्रेमी आहे. माझ्याकडून चूक झाली हे मला कळलं आणि ज्याक्षणी मला ते कळलं त्याक्षणी मी तो व्हिडीओ डिलिट केला होता. परंतु तो डिलिट करण्याआधीच तो व्हिडीओ व्हायरल झाला आणि खूप ठिकाणी शेअर झाला. आताही मी चाहत्यांना विनंती करतेय की तो व्हिडीओ डिलिट करा. मी लाल महालात व्हिडीओ करण्याची चूक केली. मी जाणूनबुजून ती चूक केली नव्हती. मी माझी चूक मान्य करते. मी सर्वांची माफी मागते. एक मराठी मुलगी आणि शिवकन्या असल्याचा मला अभिमान आहे. मी पुन्हा कधीच अशी चूक करणार नाही असं वचन देते. फेमस होण्यासाठी हा व्हिडीओ केला असा आरोप अनेकांनी केला. पण असं काहीच नाही”, असं ती या व्हिडीओत म्हणताना दिसतेय.

हे सुद्धा वाचा

वैष्णवीसोबत या व्हिडीओत कोरिओग्राफर आणि डान्सर केदार अवसरे यानेसुद्धा जाहीर माफी मागितली. “अर्धवट ज्ञानातून आणि बालबुद्धीने आमच्याकडून ही चूक झाली. यातून कोणालाही दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता. मोठ्या मनाने आमची चूक पदरात घ्या आणि आम्हाला माफ करा”, असं तो म्हणाला.

पहा व्हिडीओ-

दरम्यान लाल महालात अखिल भारतीय मराठा महासंघाकडून शुद्धीकरण करण्यात आलं आहे. ज्याठिकाणी गाण्याचे शूटिंग झाले, त्या संपूर्ण परिसराचे शुद्धीकरण अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे करण्यात आले आहे. माँ जिजाऊंच्या पुतळ्याला यावेळी दुग्धाभिषेक घालून अन् शूट झालेल्या ठिकाणी गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण करण्यात आलं.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.